Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वतःच्या मेहनतीवर उभारलेला ब्रँड! मनीष कुमार यांची प्रेरणादायी कहाणी

स्वतःच्या मेहनतीवर आणि कष्टाने झारखंडचे मनीष कुमार यांनी त्यांचा व्यवसाय कसा वाढवला? कसा उभारला? सगळं जाणून घेण्यासाठी ही संघर्ष कथा नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2025 | 08:20 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

मनीष कुमार हे झारखंडमधील पालकोटचे रहिवासी असून आज ते स्वतःचा डेअरी व्यवसाय आणि दोन लोकप्रिय हॉटेल्स चालवत आहेत. परंतु, त्यांचा हा यशाचा प्रवास अगदी सामान्य सुरुवातीतून झाला आहे. 2003 साली गोस्नर कॉलेज, रांचीमध्ये ते पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होते. याच काळात त्यांच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा निर्माण झाली.

पुढील आठवड्यात शेअर बाजारात पडेल पैशांचा पाऊस! ‘या’ कंपन्या देतील गुंतवणूकदारांना लाभांश

त्या काळात पालकोटमध्ये दूध सहज मिळायचं नाही. गावात एखाददुसरा शेतकरीच गाय पाळायचा आणि दूध स्वतःपुरतंच वापरायचा. मनीष कुमार यांच्या घरी एक शेतकरी दूध द्यायला यायचा. एके दिवशी मनीष यांनी त्याच्याकडून विचारले, “मलाही गाय पाळायची आहे.” त्यांनी त्या शेतकऱ्याच्या मदतीने १८ हजार रुपयांना एक चांगल्या जातीची गाय विकत घेतली आणि त्यानंतर शिक्षण सोडून दूध विक्रीला सुरुवात केली.

सुरुवातीला ते पालकोटमध्ये सायकलवर दूध विकत होते. तेव्हा दूधाचा दर फक्त ८ रुपये लिटर होता. नंतर गुमला येथे जास्त मागणी पाहता त्यांनी प्रवासी बसमधून दूध नेणे सुरू केले आणि मोठा बाजार मिळवला. हळूहळू त्यांच्या घरी गाईंची संख्या वाढू लागली आणि दूध उत्पादनही वाढले. दूध विक्रीतून आलेल्या उत्पन्नातून मनीष यांनी ‘हिंदुस्तान डेअरी आणि मिष्ठान’ नावाने एक छोटा हॉटेल सुरू केला. स्वतःच्या गाईंपासून मिळणाऱ्या दुधातून ते विविध मिठाया बनवून विकू लागले. या व्यवसायाने उभारी घेतली आणि त्यांनी गुमलाच्या टॉवर चौकाजवळ २०१२ साली मोठं हॉटेल उघडलं. हळूहळू त्यांच्या मिठायांना आणि दुधाला चांगली मागणी येऊ लागली. त्यानंतर त्यांनी सिमडेगा जिल्ह्यातही दुसरं हॉटेल सुरू केलं.

गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी! पुढील आठवड्यात शेअर बाजारात लाभांश, बोनस आणि स्टॉक स्प्लिट्सची बहार

आज मनीष कुमार यांच्याकडे सुमारे १५० गाई आहेत. त्यांच्या डेअरी व्यवसायात त्यांच्या दोन लहान भावांचाही सहभाग आहे. फक्त कुटुंबापुरतंच नाही तर त्यांनी अनेक स्थानिक बेरोजगार तरुणांना गाय पालन, दूध प्रक्रिया आणि हॉटेलमध्ये नोकरी देऊन रोजगार दिला आहे.

Web Title: A brand built on his own hard work the inspiring story of manish kumar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Business

संबंधित बातम्या

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष
1

आघाडीचा फॅशन ब्रॅंड Libas चे मुंबईत नवे स्टोअर सुरु, वर्षाअखेरपर्यंत 50 पेक्षा जास्त शाखा उघडण्याचे लक्ष

Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट
2

Ambernath MIDC : “महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात का जातात?”, उद्योजकांच्या संघटनेचा मोठा गौप्यस्फोट

एका दिवसात भरमसाट नफा कमवायचाय? 12 ऑगस्टला ‘या’ Defence Share वर लक्ष ठेवा, 3 वर्षात दिलाय 311 टक्के रिटर्न
3

एका दिवसात भरमसाट नफा कमवायचाय? 12 ऑगस्टला ‘या’ Defence Share वर लक्ष ठेवा, 3 वर्षात दिलाय 311 टक्के रिटर्न

2030 पर्यंत ‘या’ कंपनीचा 3 लाख रोजगार निर्मितीचा संकल्प, ‘मेक इन इंडिया’ ला देणार चालना
4

2030 पर्यंत ‘या’ कंपनीचा 3 लाख रोजगार निर्मितीचा संकल्प, ‘मेक इन इंडिया’ ला देणार चालना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.