Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधार हाऊसिंग फायनान्सकडून आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत प्रगतीची नोंद

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत २२% वार्षिक नफा वाढ नोंदवली असून एयूएममध्ये २१% वाढ झाली आहे. कंपनीने ग्रामीण आणि उपनगरी भागांत सेवा विस्तार करून १२ नवीन शाखा उघडल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 07, 2025 | 06:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीतील आणि नऊमाहीतील आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाप्त झालेल्या या तिमाहीत कंपनीने उल्लेखनीय आर्थिक प्रगती साध्य केली आहे.

काय आहेत महत्त्वाचे आकडे? जाणून घेऊयात

  • Assets अंडर मॅनेजमेंट (एयूएम): २३,९७६ कोटी रुपये (२१% वार्षिक वाढ)
  • वितरण: ५,६२६ कोटी रुपये (१५% वार्षिक वाढ)
  • करोत्तर नफा (पीएटी): ६६७ कोटी रुपये (२२% वाढ)
  • निव्वळ मूल्य: ६,११४ कोटी रुपये (४४% वाढ)
  • आरओए: ४.३%
  • आरओई: १६.८%

Social Media Influencer: डिजीटल स्टार्स इन्‍फ्लूएंसर ठरतायत डोकेदुखी; ASCI चा धक्कादायक अहवाल

३१ डिसेंबर २०२४ रोजी कंपनीच्या कर्ज खात्यांची संख्या २,८६,००० हून अधिक झाली आहे. एकूण एनपीएचा दर १.३६% पर्यंत घटला आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ ऋषी आनंद यांनी सांगितले की, “आमच्या सततच्या प्रगतीमुळे आर्थिक वर्ष २०२५ च्या नऊमाहीची यशस्वी सांगता करण्यात आली आहे. एयूएममध्ये २१% वार्षिक वाढ नोंदवण्यात आली असून वितरणामध्येही तिसऱ्या तिमाहीत २०% वाढ दिसून आली आहे.” ते पुढे म्हणाले, “सरकारच्या धोरणांमुळे कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आयकर सवलतीसारख्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीय गटांची घर खरेदी करण्याची क्षमता वाढेल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बजेट वाढल्याने किफायतशीर गृहकर्जांमध्ये वाढ होईल.”

आधार हाऊसिंग फायनान्सने या तिमाहीत १२ नवीन शाखांचे उद्घाटन केले असून आता कंपनीच्या एकूण शाखांची संख्या ५५७ वर पोहोचली आहे. ही शाखा विस्तार प्रक्रिया देशभरातील आर्थिक सेवा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आली आहे. सध्या कंपनी २१ राज्ये आणि ५४५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून २८६ हजारांहून अधिक कार्यरत कर्ज खात्यांना सेवा पुरवत आहे. कंपनीच्या या व्यापक जाळ्यामुळे शहरी, उपनगरी तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना गृहकर्ज सेवा सुलभपणे उपलब्ध होत आहेत.

टिंडर आणि सेंटर फॉर सोशल रिसर्चने डेटिंग सेफ्टी गाईड केली सादर; मराठीसह इतर भाषांमध्ये उपल्बध

यासंदर्भात कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी सांगितले की, “आम्ही ‘डीपर इम्पॅक्ट’ या धोरणाद्वारे विशेषतः ग्रामीण व उपनगरी भागांमध्ये आमच्या सेवा विस्तारावर भर देत आहोत. प्रगत डेटा-केंद्रित तंत्रज्ञानाचा वापर करून जोखीम व्यवस्थापन अधिक सुसूत्र करत असून संसाधनांचे अधिक प्रभावी वाटप करण्यात येत आहे.” त्यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, “आम्हाला भविष्यातील आर्थिक संधींबाबत आत्मविश्वास आहे आणि वंचित समुदायांना किफायतशीर गृहकर्ज सेवा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या विस्तार धोरणामुळे कंपनीला गृहकर्ज क्षेत्रातील अधिक मजबूत स्थान मिळण्याची अपेक्षा असून ग्राहकांना अधिक सुलभ आणि तंत्रज्ञान-सक्षम सेवांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Aadhar housing finance reports progress in the third quarter of fy2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • aadhar card
  • Business News

संबंधित बातम्या

भारतात स्टील स्क्रॅपची मागणी वाढणार! २०४७ पर्यंत ५०० दशलक्ष टन पोलाद निर्मितीचे लक्ष्य
1

भारतात स्टील स्क्रॅपची मागणी वाढणार! २०४७ पर्यंत ५०० दशलक्ष टन पोलाद निर्मितीचे लक्ष्य

उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात ‘BeSafe’ परिषदेचा प्रारंभ; आशिष भंडारी यांनी दिला ‘झीरो-हार्म’चा संदेश
2

उद्योगांमध्ये सुरक्षिततेचा नवा मंत्र! पुण्यात ‘BeSafe’ परिषदेचा प्रारंभ; आशिष भंडारी यांनी दिला ‘झीरो-हार्म’चा संदेश

Loan Against Property: भारतात मालमत्तेच्या बदल्यात कर्ज का ठरते आहे फायनान्शियल गेम-चेंजर?
3

Loan Against Property: भारतात मालमत्तेच्या बदल्यात कर्ज का ठरते आहे फायनान्शियल गेम-चेंजर?

Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला; ४,१९३ कोटींची कमाई
4

Bank of India ची दमदार कामगिरी! तिसऱ्या तिमाहीत कामकाजाचा नफा १३ टक्क्यांनी वाढला; ४,१९३ कोटींची कमाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.