फोटो सौजन्य - Social Media
टिंडर आणि सेंटर फॉर सोशल रिसर्चने डेटिंग सेफ्टी गाईड केली सादर; मराठीसह इतर भाषांमध्ये उपल्बध
टिंडरने भारतातील वापरकर्त्यांसाठी मराठीसह हिंदी, कन्नड आणि बंगाली भाषांमध्ये डेटिंग सेफ्टी गाईड प्रकाशित केले आहे. 2023 मध्ये इंग्रजी भाषेत सुरू झालेल्या या गाईडचे आता इन-ऍप सेफ्टी मोहिमेद्वारे देशभरात प्रसार करण्यात येणार आहे. सुरक्षित इंटरनेट दिनाच्या पार्श्वभूमीवर सेंटर फॉर सोशल रिसर्च (CSR) या लैंगिक समानतेसाठी कार्यरत असलेल्या संस्थेसोबतच्या सहकार्याने हे गाईड विकसित करण्यात आले आहे.
टिंडरने CSR इंडियासोबत तंत्रज्ञान व महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेवर संशोधन केले आणि सुरक्षित डेटिंगसाठी अंतर्दृष्टी प्राप्त केली. या गाईडच्या माध्यमातून भारतातील विविध भाषिक वापरकर्त्यांना ऑनलाईन डेटिंगमध्ये सुरक्षितता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. ऑनलाईन डेटिंगसंबंधित जबाबदाऱ्यांची जाणीव वापरकर्त्यांना घडवून आणणार आहेत. टिंडरच्या सर्वेक्षणानुसार, भारतीय अविवाहितांपैकी बहुतांश जण डेटिंग ऍपमधून पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटीपूर्वी ‘सुरक्षितता’ हे प्राधान्य देतात. 37% लोक प्रत्यक्ष भेटीपूर्वी व्हिडीओ कॉल करणे पसंत करतात. त्यामुळे हा गाईड अधिक समावेशक करण्यासाठी स्थानिक भाषांमध्ये सादर करण्यात आला आहे.
डेटिंग सेफ्टी गाईडचे वैशिष्ट्ये:
मदतीचे स्रोत: वापरकर्त्यांसाठी विश्वसनीय संस्थांची माहिती उपलब्ध करून दिली जाते.
टिंडरचे विश्वास व सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष योल रोथ यांनी सांगितले की, “मॅच ग्रुपमध्ये, आम्ही जगभरातील लाखो लोकांसाठी डेटिंग अधिक सुरक्षित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त, आम्ही अनेक भाषांमध्ये टिंडर डेटिंग सुरक्षा मार्गदर्शक प्रस्तुत करत आहोत, भारतातील युवा डेटर्सना आवश्यक साधने आणि टिप्स देऊन सक्षम बनवत आहोत. सेंटर फॉर सोशल रिसर्चसोबत भागीदारी करून, आम्ही सुरक्षित डेटिंगसाठी लोक कोणती व्यावहारिक पावले उचलू शकतात याबद्दल जागरूकता वाढवत आहोत, आमच्या प्लॅटफॉर्म आणि समुदायांमध्ये आणि उद्योगांमध्ये मजबूत सुरक्षा मानकांबद्दल आमची वचनबद्धता बळकट करत आहोत.”