
आधार हाऊसिंग फायनान्सचा नफा
गृहवित्त क्षेत्रातील कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स लि. ने 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या सहामाहीत 504 कोटी रुपयांचा करपूर्व नफा कमावला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबर सहामाहीतील करपूर्व नफा 428 कोटी रुपये इतका होता. थोडक्यात सहामाहीमधील करपूर्व नफ्यात 18 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता 21 टक्क्याने वाढून 22 हजार 817 कोटी रुपयांच्या तुलनेत 27 हजार 554 कोटी रुपयांवर गेली आहे. तर कर्जधारकांचे प्रमाण 3 लाख 15 हजारांच्या वर गेले आहे.
तुलनात्मक नफा
आधार हाऊसिंगचा सहामाहीतील करोत्तर नफा 17 टक्क्याने वाढून 228 कोटी रुपयांच्या तुलनेत 266 कोटी रुपयांवर गेला आहे. कंपनीची निव्वळ संपत्ती 6 हजार 894 कोटी रुपये इतकी झाली आहे. यात आयपीओद्वारे प्राप्त झालेल्या पैशातील एक हजार कोटी रुपयांचा समावेश आहे. कंपनीच्या सहामाहीतील मालमत्तेवरील परताव्याचे प्रमाण (आरओए) 4.2 टक्क्यांवर स्थिर आहे. दुसरीकडे भागभांडवलावरील परताव्याचे प्रमाण 16.5 टक्क्यांच्या तुलनेत 15.1 टक्के इतके नोंदवले गेले आहे. सप्टेंबर सहामाहीतील ढोबळ अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण 1.42 टक्के इतके असून निव्वळ अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण (एनपीए) एक टक्के इतके आहे.
आधार हाऊसिंग फायनान्सकडून आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत प्रगतीची नोंद
चांगली कामगिरी
परवडणाऱ्या गृहवित्त क्षेत्रातील सातत्यपूर्ण मागणी आणि सरस कामगिरीच्या आधारावर चांगली कामगिरी करता आल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ऋषी आनंद यांनी सांगितले. अलीकडील काळात जीएसटी करात झालेली कपात आणि गृहवित्त क्षेत्रातील सुधारणा यामुळे भविष्यात सातत्यपूर्ण कामगिरी राहण्याचा विश्वास आहे. पीएमएवाय – अर्बन 2 तसेच अंगीकार 2025 अंतर्गत च्या योजनांमुळे ईडब्ल्यूएस व एलआयजी घरांची मागणी वाढली आहे. याचा कंपनीला आगामी काळात नक्की फायदा होईल, असे आनंद म्हणाले.
Ans: आधार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ही २६-११-१९९० रोजी स्थापन झालेली एक खाजगी कंपनी आहे. ती एक गैर-सरकारी कंपनी म्हणून वर्गीकृत आहे आणि आरओसी-बंगलोर येथे नोंदणीकृत आहे.
Ans: आधार गृहनिर्माण वित्त - 2025 कंपनी प्रोफाइल, टीम, निधी... आधार हाउसिंग फायनान्सचे संस्थापक कपिल वाधवान, धीरज राजेशकुमार वाधवान, अरुणा राजेशकुमार वाधवान, सारंग वाधवान आणि राकेश कुमार वाधवान आहेत. ऋषी आनंद हे आधार हाउसिंग फायनान्सचे सीईओ आहेत.
Ans: आधार हाऊसिंग फायनान्सचा व्याजदर देखील स्पर्धात्मक आहे, जो वार्षिक १०.२५% पासून सुरू होतो आणि इतर शुल्क देखील सहज परवडणारे आहेत.