Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अदानी समूह खरेदी करणार रिलायन्स पॉवरचा प्लांट, 3000 कोटींमध्ये डील होण्याची शक्यता

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह रिलायन्स पॉवरचा प्लांट खरेदी करणार आहे. नागपुरातील बुटीबोरी येथील 600 मेगावॅटचा क्षमतेचा या औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी 3000 कोटींचा करार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लवकरच हा प्रकल्प पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 19, 2024 | 08:36 PM
अदानी समूहाचा मोठा करार, ही कंपनी विकत घेण्याची घोषणा; खुली ऑफरही जाहीर!

अदानी समूहाचा मोठा करार, ही कंपनी विकत घेण्याची घोषणा; खुली ऑफरही जाहीर!

Follow Us
Close
Follow Us:

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूह रिलायन्स पॉवरचा वीजनिर्मिती प्लांट खरेदी करणार आहे. अदानी समूह हा प्लांट खरेदी करण्यासाठी तब्बल 2,400 ते 3000 कोटी रुपयांचा करार करणार असल्याचे समोर आले आहे. रिलायन्सचा हा बंद असलेला प्लांट खरेदी करण्यासाठी अदानी पॉवरची सध्या सीएफएम ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीशी बोलणी सुरु आहे. त्यामुळे आता हा करार झाल्यास, या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार आहे.

600 मेगावॅटची आहे क्षमता

अदानी समुहाच्या अदानी पॉवरला नागपुरातील 600 मेगावॅटचा बुटीबोरी औष्णिक ऊर्जा प्रकल्प विकत घ्यायचा आहे. या उर्जा प्रकल्पाचे नियंत्रण पूर्वी अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरकडे होते. अदानी समूह या प्लांटसाठी प्रति मेगावॉट 4 ते 5 कोटी रुपये देण्यास तयार आहे. या प्रकल्पात दोन पॉवर प्लांट युनिट आहेत. यापूर्वी या प्रकल्पाचे मूल्यांकन 6000 कोटी रुपये इतके होते. मात्र, हा प्रकल्प बंद झाल्यानंतर, त्यांचे मूल्य निम्म्यावर आले आहे. हा प्लांट अदानी समूहाच्या धोरणात परफेक्ट बसतो.

हेही वाचा – घरभाडे महिना 40 लाख; स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा, सिनेमागृहासारख्या सुविधा; मुंबईतील ‘या’ घराची जगभर चर्चा!

जेएसडब्ल्यू एनर्जीचीही खरेदीसाठी चाचपणी

नागपुरच्या बुटीबोरी परिसरातील हा थर्मल पॉवर प्रकल्प रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरद्वारे चालवला जातो. रिलायन्स पॉवर आर्थिक संकटात सापडल्यानंतर हा प्रकल्पही बंद झाला. याआधी सज्जन जिंदाल यांची कंपनी जेएसडब्ल्यू एनर्जीनेही हा प्रकल्प खरेदी करण्यात रस दाखवला होता. परंतु, उच्च मूल्यांकन आणि ऑपरेशनल समस्यांमुळे त्यांनी हा व्यवहार केला नाही.

प्रकल्पाला मिळणार नवसंजीवनी

यापूर्वी रिलायन्स पॉवरने मुंबईतील वीज पुरवठ्यासाठी बुटीबोरी प्लांटचा वापर केला होता. पण त्यानंतर अदानी इलेक्ट्रिसिटीने मुंबईच्या वीज वितरण व्यवसाय आपल्याकडे घेत, त्यावर सध्या चांगली पकड निर्माण केली आहे. डिसेंबर 2019 मध्ये विदर्भ इंडस्ट्रीज आणि अदानी यांच्यातील वीज खरेदी कराराची मुदतही संपली. यानंतर बुटीबोरी प्रकल्प आर्थिक संकटात सापडला. कर्जदारांनी कंपनीविरुद्ध दिवाळखोरीची याचिका दाखल केली. परंतु, सध्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. अदानी समूह हा प्रकल्प विकत घेऊन, नागपूरजवळ असलेल्या तिरोडा पॉवर प्लांटशी जोडेल. त्यामुळे आता लवकरच या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळणार आहे.

Web Title: Adani group to buy reliance power plant deal likely to be 3000 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 08:36 PM

Topics:  

  • Adani Group
  • Gautam Adani
  • Reliance Power

संबंधित बातम्या

Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?
1

Gautam Adani : बिहार निवडणुकीत अदानींचे नाव चर्चेत, निकालानंतर फायदा झाला की तोटा?

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध
2

Bihar Election Result Market Impact: बिहारमध्ये NDA चा ‘विजयी’ झेंडा..! तरीही, शेअर बाजार का लाल रंगात? गुंतवणूकदार झाले सावध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.