घरभाडे महिना 40 लाख; स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा, सिनेमागृहासारख्या सुविधा; मुंबईतील 'या' घराची जगभर चर्चा!
देशभरातील अनेक भागातून अनेक जण मुंबईत येत असतात. मुंबई हे शहर गरीब, मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत, अतीश्रीमंतांचे देखील आहे. आशिया खंडात सर्वांत श्रीमंत म्हणून ओळख असलेले अंबानी कुटुंब याच शहरात राहते. स्वप्नांची नगरी असलेल्या या मुंबई शहराचे वैभव अनेकांचे डोळे विस्फारतात. अशातच आता याच मुंबईत एका आलिशान घराची सध्या सर्व स्तरामध्ये चर्चा पाहायला मिळत आहे.
घरभाडे महिना 40 लाख रुपये
स्विमिंग पूल, प्रायव्हेट स्पा, सिनेमागृह अशा सर्व सुविधा असलेल्या या घरात तुम्हाला भाड्याने राहायचे असेल तर त्यासाठी महिन्याकाठी तुम्हाला तब्बल 40 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याच पार्श्वभुमीवर आज आपण मुंबईतील या सर्वात महागड्या भाडोत्री घराबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का… डिज्नी हॉटस्टार बंद होणार; वाचा… नेमकं काय आहे कारण!
घराची किंमत तब्बल 120 कोटी रुपये
दक्षिण मुंबईतील लोअर परळ उच्चभ्रू भागात हे महागडे घर आहे. या घरातून तुम्हाला किनारपट्टीसह अरबी समुद्र दिसतो. हे घर साधसुधे नसून, त्यामध्ये तुम्हाला प्रायव्हेट स्वीमिंग पूलची सुविधा आहे. प्रायव्हेट स्पा, सिनेमागृह, प्रायव्हेट जीम यासह अन्य सुविधा देखील आहेत. हे घर खरेदी करायचे असेल तर तुम्हाला एक दोन नव्हे तर तब्बल 120 कोटी रुपये मोजावे लागतील.
काय आहे ‘या’ घराची विशेषत:?
लोअर परळ या भागात असलेल्या अविघ्न इमारतीत हा ट्रिप्लेक्स पेंट हाऊस आहे. या घरात एकूण सहा बेडरुम्स आहेत. या सहा बेडरुम्समध्ये तुम्हाला सहा आलिशान बाथरुम देण्यात आलेले आहेत. तब्बल 1600 स्क्वेअर फूट परिसरात हे घर पसरलेले आहे. या घरातून तुम्हाला पश्चिम आणि पूर्व अरबी समुद्र दिसतो. याशिवाय सोईसुविधांनीयुक्त असे हे घर आहे. घरातील बहुसंख्य वस्तू या तंत्रज्ञानाच्या मदतीने जगातून कुठूनही कंट्रोल करता येतात. या घरात तुम्हाला वायफआय, मल्टी टायर सुरक्षा सुविधा आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील या घराची सध्या जगभरात चर्चा होत आहे.
प्रायव्हेट स्पा, स्वीमिंग पूल, प्रायव्हेट जीम
महिना ४० लाख रुपये घर भाडे असलेल्या या घरात तुम्हाला आठ कारसाठी पार्किंगची सोय आहे. या घराचे उत्तम सजावट केलेले इंटेरिअर आहे. घरात तुम्हाला तुमची प्रायव्हेट लिफ्ट मिळेल. प्रायव्हेट छत, प्रायव्हेट स्वीमिंग पूल, प्रायव्हेट जीम, प्रायव्हेट पूल टेबल, प्रायव्हेट इंटरटेन्मेंट रुम, प्रायव्हेट स्पा, फॉर्मल-इन्फॉर्मल लिव्हिंग रुम तसेच संपूर्ण साहित्य असलेले सुसज्ज किचन अशा उच्च प्रतिच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत.