Lufthansa कंपनी ४००० कर्मचाऱ्यांची करणार कपात (Photo Credit- X)
Lufthansa Layoffs: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या टीसीएस आणि अॅक्सेंचर यांच्या पाठोपाठ आता विमान वाहतूक उद्योगालाही मोठा धक्का बसला आहे. जर्मनीची प्रसिद्ध विमान कंपनी लुफ्थांसाने (Lufthansa) २०३० पर्यंत त्यांच्या प्रशासकीय स्तरावर ४,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनला चालना देण्याच्या नावाखाली उचललेले हे पाऊल लाखो नोकरदारांसाठी एक चिंताजनक बाब आहे.
गेल्या काही वर्षांपासून लुफ्थांसाला खर्चाचा दबाव आणि कामगार संघटनांच्या वादामुळे मोठे नुकसान सोसावे लागत होते. गेल्या वर्षी कंपनीने दोनदा नफ्याची अपेक्षित वाढ साध्य केली नाही आणि ८% ऑपरेटिंग मार्जिनचे लक्ष्यही सोडून दिले. आता मात्र, हे लक्ष्य गाठण्यासाठी कंपनीने नवीन योजना आखली आहे. या योजनेनुसार, २०३० पर्यंत ८-१०% ऑपरेटिंग मार्जिन मिळवण्यासाठी लुफ्थांसा डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशनवर भर देणार आहे. यामुळे कामकाज अधिक कार्यक्षम आणि किफायतशीर होईल. परिणामी, ‘नॉन-ऑपरेशनल’ म्हणजेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये २०% पर्यंत कपात केली जाईल, ज्यामुळे जर्मनीतील अनेक कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.
Lufthansa To Slash 4,000 Jobs By 2030https://t.co/0qLLMDG51M pic.twitter.com/721KbSGOFR — Channels Television (@channelstv) September 29, 2025
लुफ्थांसा कंपनीच्या या कर्मचारी कपातीमुळे प्रशासकीय विभागांतील नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे, विमान उड्डाणांशी थेट संबंधित असलेले कर्मचारी, जसे की पायलट आणि इतर कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसणार नाही. लुफ्थांसा ग्रुपमध्ये युरोविंग्ज, ऑस्ट्रियन, स्विस आणि ब्रुसेल्स एअरलाइन्सचाही समावेश आहे.
AI मुळे 5 लाख नोकऱ्यावर गदा! TCS ने 12,000 कर्मचाऱ्यांच्या कपातीनंतर तज्ज्ञांचा इशारा
कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या बातमीनंतरही लुफ्थांसावरील गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये २% ची वाढ झाली. लुफ्थांसाच्या मते, या उपायांमुळे कंपनी दरवर्षी सुमारे २.५ अब्ज युरो (जवळपास २५,७४० कोटी रुपये) रोख रक्कम मिळवू शकेल.
विशेष म्हणजे, एका बाजूला नोकऱ्या कमी करण्याची योजना असताना, लुफ्थांसाने २०३० पर्यंत २३० हून अधिक नवीन विमाने खरेदी करण्याचीही घोषणा केली आहे. कंपनी आपला नफा आणि जागतिक नेटवर्क वाढवण्यासाठी हे पाऊल उचलत आहे. लुफ्थांसाला विश्वास आहे की, उपकंपन्यांचे एकत्रीकरण करून आणि महागड्या विभागांमधून संसाधनांची योग्य वाटणी करून चांगला परतावा मिळू शकतो. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कर्मचाऱ्यांची कपात आणि विस्ताराची ही योजना त्यांच्या ‘टर्नअराउंड प्रोग्राम’चा भाग आहे, ज्याचा उद्देश गुंतवणूकदारांना कंपनीची दीर्घकाळ स्थिरता आणि वाढ दाखवून देणे आहे.