Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 24 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अकासा एअरचे राजस्थानात विस्तार; ११ ऑक्टोबरपासून जयपूर-मुंबई आणि जयपूर-बंगळुरू थेट विमानसेवा

अकासा एअरने आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये जयपूरचा २९वे डेस्टिनेशन म्हणून समावेश केला असून, ११ ऑक्टोबर २०२६ पासून जयपूर-मुंबई आणि जयपूर-बंगळुरू दरम्यान दैनंदिन थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 24, 2026 | 07:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या अकासा एअरने आपल्या देशांतर्गत नेटवर्कमध्ये जयपूरचा समावेश करण्याची घोषणा केली आहे. ११ ऑक्टोबर २०२६ पासून कंपनी जयपूरला मुंबई आणि बंगळुरूशी जोडणाऱ्या दैनंदिन थेट विमानसेवा सुरू करणार आहे. यामुळे अकासा एअरच्या देशांतर्गत नेटवर्कमधील जयपूर हे २९वे डेस्टिनेशन ठरणार असून, राजस्थानातील दुसरे गंतव्यस्थान असेल. या नव्या मार्गांसाठी तिकीट बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल अॅप आणि प्रमुख ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मवर सुरू झाले आहे.

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

जयपूर हे राजस्थानमधील महत्त्वाचे पर्यटन, सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र मानले जाते. त्यामुळे मुंबई आणि बंगळुरूसारख्या देशातील प्रमुख आर्थिक शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध झाल्याने व्यावसायिक प्रवासी, पर्यटक आणि उद्योजकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच पर्यटन, व्यापार, गुंतवणूक आणि प्रादेशिक आर्थिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उदयपूरच्या सेवांमुळे राजस्थानातील हवाई संपर्क आणखी मजबूत होणार आहे.

या विस्ताराबाबत अकासा एअरचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यावसायिक अधिकारी आनंद श्रीनिवासन यांनी सांगितले की, जयपूरचा नेटवर्कमध्ये समावेश हा कंपनीच्या विस्तारातील महत्त्वाचा टप्पा आहे. राजस्थान ही अकासा एअरसाठी महत्त्वाची बाजारपेठ असून, जयपूरमुळे प्रवाशांना अधिक पर्याय आणि उत्तम कनेक्टिव्हिटी मिळेल. प्रमुख आर्थिक आणि पर्यटन केंद्रांना जोडण्याच्या कंपनीच्या धोरणाला या सेवांमुळे अधिक बळ मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नवीन वेळापत्रकानुसार, मुंबईहून सकाळी ९.१० वाजता सुटणारे विमान ११.१० वाजता जयपूरला पोहोचेल, तर जयपूरहून दुपारी १२.०० वाजता सुटणारे विमान १.५५ वाजता मुंबईत दाखल होईल. बंगळुरूहून सकाळी ८.२० वाजता उड्डाण करणारे विमान १०.५० वाजता जयपूरला पोहोचेल, तर जयपूरहून ११.३० वाजता सुटणारे विमान २.०० वाजता बंगळुरूत पोहोचेल. या सर्व सेवा दररोज नॉन-स्टॉप स्वरूपात उपलब्ध असतील.

ताबा मिळून 6 वर्षे झाली तरी क्लबहाऊसचं बांधकाम पूर्ण नाहीच! MahaRERA चा बिल्डरला मोठा दणका, पैसे रिफंड करण्याचे आदेश

अकासा एअरने ग्राहकांच्या सोयीसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज विमानांचा ताफा उपलब्ध करून दिला आहे. प्रशस्त लेगरूम, बहुतांश विमानांमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट, कॅफे अकासामधील विविध खाद्यपदार्थ, तसेच ‘अकासा गेटअर्ली’, ‘सीट अँड मील डील’, ‘एक्स्ट्रा सीट’, ‘अकासा हॉलीडेज’, ‘स्कायस्कोर’, ‘स्कायलाइट्स’ आणि ‘क्वाएटफ्लाइट्स’ यांसारख्या सुविधा कंपनीच्या ग्राहकाभिमुख सेवांना अधिक बळ देतात. नव्या मार्गांमुळे देशांतर्गत हवाई प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर करण्याचा अकासा एअरचा प्रयत्न आणखी मजबूत झाला आहे.

Web Title: Akasa air expands in rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • rajasthan
  • Rajasthan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.