Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताच्या आसपासही नाही अमेरिका, चीन, जपान; शेअरबाजारातील भांडवल वाढीत देशाने मिळवले अग्रस्थान

भारताने अमेरिका, जपान, चीन या देशांना मागे टाकले असून शेअर बाजारातील भांडवलामध्ये मोठी वाढ झाली आहे. जगातील मोठ्या शेअर बाजारातील गुंतवणूक घसरणीकडे जात असताना भारताला गुतंवणूकदारांनी प्राधान्य दिले आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 26, 2024 | 06:39 PM
भारताच्या आसपासही नाही अमेरिका, चीन, जपान; शेअरबाजारातील भांडवल वाढीत देशाने मिळवले अग्रस्थान
Follow Us
Close
Follow Us:

भारतातील शेअर बाजारामध्ये होत असलेल्या जबरदस्त भांडवल वाढीमुळे सर्वच देश आवाक झाले आहेत. डिसेंबरमध्ये जगातील टॉप 10 देशांच्या शेअर बाजारापेक्षा भारतीय शेअर बाजारात झालेली भांडवल वाढ ही सर्वात जास्त होती. या महिन्यात भारतीय शेअर बाजारातील भांडवलात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 3 वर्षातील ही सर्वात जास्त वाढ आहे. सलग 4 महिने शेअर बाजारातील भांडवलामध्ये घट झाल्यानंतर ही वाढ दिसून येत आहे. ब्लूमबर्गने त्यांच्या  ताज्या अहवालात म्हटले आहे की,  भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवल सुमारे 4.93 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये डिसेंबरमध्ये 9.4 टक्के वाढ झाली,  ही वाढ मे 2021 नंतरची सर्वात जास्त वाढ आहे. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्यास प्राधान्य दिल्याे बाजारातील भांडवलात सातत्याने घट होत होती.

‘ही’ सरकारी कंपनी एका शेअरवर 2 बाेनस शेअर्स देणार; ‘ही’ असेल रेकाॅर्ड तारीख, वाचा… सविस्तर!

अमेरिका, चीन आणि जपानमधील शेअर बाजाराची स्थिती

भारतीय बाजाराच्या तुलनेमध्ये अमेरिका, चीन आणि जपान या जगातील मोठ्या बाजारपेठांची स्थिती पाहिली, तर डिसेंबरमध्ये त्यांची स्थिती ही फारच वाईट असल्याचे दिसून येते आहे.   63.37 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह जगातील सर्वात मोठा शेअर बाजार असणाऱ्या  अमेरिकन शेअर बाजारात 0.42 टक्क्यांची घसरण झाली आहे.दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीनच्या शेअर बाजारातील भांडवल हे 10.17 ट्रिलियन डॉलर्स आहे, त्या बाजारातही 0.55 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार असणाऱ्या जपानमधील शेअर बाजाराचे भांडवल 6.28 ट्रिलियन डॉलर्स आहे. जपानमध्येही या कालावधीत 2.89 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे या तीनही मोठ्या शेअर बाजारात घसरण होत असताना भारतीय शेअर बाजार मात्र वधारला आहे ही लक्षणीय बाब आहे.

परदेशी गुतंवणूकदार भारताकडे परतला

भारतीय बाजारामधील वाढ आणि त्याचे भांडवलीकरण डिसेंबरध्ये मजबूत झाले याचे प्रमुख  कारण हे  परदेशी गुंतवणूकदाराचे पुनरागमन आहे. या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 2.37 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर मागील दोन महिन्यात परदेशी गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक काढली होती.  ऑक्टोबरमध्ये 11.2 अब्ज डॉलर आणि नोव्हेंबरमध्ये 2.57 अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढले होते.

जगातील इतर शेअर बाजारातील गुंतवणूक

जगातील इतर शेअर बाजारातील गुंतवणूकीबद्दल विचार केल्यास, जगातील चौथ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्ये वाढ झाली आहे. 5.57 ट्रिलियन डॉलर्सच्या या बाजारपेठेत 4.13 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय कॅनडाच्या शेअर बाजाराच्या भांडवलात 5.56 टक्क्यांची घसरण झाली, तर ब्रिटनच्या बाजारात 2.84 टक्क्यांची घसरण झाली. स्वित्झर्लंडचे बाजार भांडवल 4.02 टक्क्यांनी घसरले. जर्मनीच्या शेअर बाजाराचे मार्केट कॅप 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. अनेक शेअर बाजारात घसरण झाल्याचेच दिसत आहे.

सोन्याप्रमाणेच आता चांदीवरही हॉलमार्किंगची तयारी ; फक्त ‘या’ कारणामुळे होतेय अडचण

Web Title: America china japan are not even close to india the country has taken the lead in capital growth in the stock market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 06:39 PM

Topics:  

  • China
  • USA

संबंधित बातम्या

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
1

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला
2

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
4

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.