फोटो सौजन्य- सोशल मीडिया
आपल्या देशात सोन्यापाठोपाठ महत्व दिलेला धातू हा चांदीच आहे. चांदीचे अलंकार हे आपल्या परंपरेचा घटक झाले आहे. या चादींचे अलंकार करताना त्यावरही सोन्या प्रमाणेच हॉलमार्किंग केले जाण्याची तयारी सुरु झाली आहे. चांदी आणि त्यापासून निर्मित दागिने खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी नियमांमध्ये बदल करण्याची तयारी सध्या सुरू आहे. मुळात ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याकरिता सोन्यानंतर चांदीची नाणी आणि दागिन्यांवरही हॉलमार्किंगचा नियम लवकरच लागू केला जाऊ शकतो. सरकारकडून यावर अतिशय वेगाने काम सुरू आहे. सोन्याकरिता हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) प्रणाली लागू केल्यानंतर, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) आता चांदीच्या वस्तूंवर हॉलमार्किंग लागू करण्याची योजना आखत आहे.
चिन्ह दीर्घकाळ टिकण्यामध्ये येऊ शकते अडचण
सोन्याप्रमाणेच ज्यावेळी चांदीवर हॉलमार्किंग लागू करायचे झाल्यास त्यासंबंधी सर्वात मोठे आव्हान म्हणजे चांदीपासून बनवलेल्या वस्तूंवर दीर्घकाळ HUID चिन्ह (हॉलमार्किंग) राहणे . धातू तज्ज्ञांनी म्हणणे आहे की सोन्यापेक्षा चांदी पर्यावरणीय घटकांसाठी अधिक संवेदनशील आहे. यामुळे, चांदीच्या वस्तूंवर बनवलेले HUID चिन्ह कालांतराने खराब होऊ शकते किंवा नाहीसे होऊ शकते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, एक विशिष्ट पद्धत शोधली जात आहे ज्याद्वारे HUID चिन्ह दीर्घकाळ टिकवून ठेवता येईल.
HUID चिन्ह नाहीसे होण्यासाठी
वातावरणातील प्रतिक्रियांच्या प्रभावापासून चांदीचे संरक्षण करण्याकरिता महत्वाचे संशोधन केले जात आहे. चांदीपासून निर्मित केलेल्या वस्तूंचा दर्जा सुनिश्चित करण्यासाठी हॉलमार्किंग असणे फार महत्वाचे आहे. सध्या हॉलमार्किंग हा प्रकार सोन्याच्या दागिन्यांसाठी असला तरीही तांत्रिक समस्येवर तोडगा निघाल्यानंतर, चांदीवर हॉलमार्किंग लागू केला जाणार आहे. मार्किंग करण्यात येणारा HUID हा भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे सत्यापित केलेला सहा-अंकी कोड आहे, त्याची कोणत्याही अलकारांवर पुनरावृत्ती होत नाही.
हॉलमार्किंगमुळे होणारा फायदा
हॉलमार्किंगचा ग्राहकांना होणारा फायदा म्हणजे भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे सत्यापित सहा अंकी कोड असणार आहे. त्यामुळे दागिन्यांच्या मालकाला दागिन्यांची योग्य आणि पूर्ण किंमत मिळू शकेल. एवढेच नाही तर गरज भासल्यास ते दागिने पुन्हा बनवता येतात किंवा सहज विकता येऊ शकतात. त्या दागिन्यांवर BIS प्रमाणपत्र दिले जाते . याशिवाय, जर कोणत्याही ग्राहकाला दागिन्यांच्या शुद्धतेबद्दल काही शंका असेल, तर तो त्या विशेष आयडीवरून कायदेशीर मदत घेऊ शकतो.
सोन्या नंतर चांदीच्या दागिन्यांसंबंधी करण्यात येणाऱ्या हॉलमार्किंगमुळे ग्राहकांना चांदीचे योग्य आणि सुरक्षित उत्पादने मिळू शकतात. सरकारकडून हॉलमार्किंगचा निर्णय हा येत्या काळात जाहीर केला जाऊ शकतो.
आजचे सोने चांदीचे दर
मुंबईत, आज सोन्याचा दर 77487 रुपये 10 ग्रॅम आहे, तर चांदीचा दर प्रतिकिलो 94 हजार इतका आहे. दोन्हींच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.