Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबा रामदेव यांच्या पतंजलीने जाहीर केला लाभांश; प्रत्येक शेअरवर मिळणार आठ रुपये!

पतंजली फूड्स लिमिटेडने म्हटले की सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 21.4 टक्क्यांनी वाढून, 309 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 254.5 कोटी रुपये होता.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 28, 2024 | 06:42 PM
पतंजलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

पतंजलीला उच्च न्यायालयाचा दिलासा

Follow Us
Follow Us:

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडने आपल्या भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करताना कंपनीने सांगितले की ती तिच्या भागधारकांना प्रति शेअर 8 रुपये अंतरिम लाभांश देईल. कंपनीने यासाठी 4 नोव्हेंबर 2024 ही रेकाॅर्ड तारीखही निश्चित केली आहे.

लाभांश इतिहास

पतंजली फूड्स लिमिटेडने यापूर्वी आर्थिक वर्ष 2024 मध्ये आपल्या भागधारकांना दोनदा लाभांश देण्याची घोषणा केली होती. यापूर्वी कंपनीने 21 सप्टेंबर 2023 रोजी 6 रुपये लाभांश दिला होता. त्यानंतर 21 मार्च 2024 रोजी 6 रुपये लाभांश दिला. अशा प्रकारे आर्थिक वर्ष 2024 मध्ये प्रत्येक शेअरवर एकूण 12 रुपये लाभांश दिला. पतंजली फूड्सने 14 ऑगस्ट 2001 पासून एकूण 19 वेळा लाभांश दिला आहे. सध्या त्याचा लाभांश उत्पन्न 0.36 टक्के आहे.

हे देखील वाचा – दिवाळीपुर्वी शेअर बाजार सावरला, ओलांडला पुन्हा 80000 चा टप्पा; वाचा… कोणते शेअर्स राहिले तेजीत!

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

पतंजली फूड्सने गुरुवारी 24 ऑक्टोबर रोजी आर्थिक वर्ष 2025 च्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले की सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 21.4 टक्क्यांनी वाढून 309 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 254.5 कोटी रुपये होता. या कालावधीत कंपनीचा महसूल 4.2 टक्क्यांनी वाढून 8,154.2 कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत हा आकडा 7,821.9 कोटी रुपये होता.

कंपनीचा ऑपरेटिंग नफा किंवा EBITDA सप्टेंबर तिमाहीत 13.8 टक्क्यांनी वाढून 449.6 कोटी रुपये झाला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 395.2 कोटी रुपये होता. त्याच वेळी EBITDA मार्जिन वाढून 5.5 टक्के झाले, जे एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 5.1 टक्के होते.

हे देखील वाचा – गावे शहरांवर पडतायेत भारी… ग्रामीण भागातील मागणीत मोठी वाढ, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून माहिती समोर!

शेअर्सची कामगिरी

निकालानंतर पतंजली फूड्सचे शेअर्स शुक्रवारी, 25 ऑक्टोबर रोजी झपाट्याने घसरले आणि 7.9 टक्क्यांनी घसरून 1,639 रुपयांवर बंद झाले. तर साेमवारी शेअर्समध्ये माेठी तेजी आली. शेअर्स 1,720.50 रुपयांवर पाेहाेचला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 4.56 टक्के वाढ झाली आहे. तर गेल्या एका वर्षात शेअर्स 31.09 टक्क्यांनी वाढला आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Baba ramdev company patanjali foods limited announces dividend each share will get eight rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 06:41 PM

Topics:  

  • share market
  • Share Market Today

संबंधित बातम्या

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?
1

4 दिवसांत 1400000 कोटी स्वाहा; Sensex 2700 अंकांनी कोसळला, Share Market मध्ये नेमकं घडतंय काय?

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स
2

Share Market Today: शेअर बाजारात आज सपाट सुरुवातीची शक्यता; ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी सुचवले हे शेअर्स

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला
3

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स
4

Share Market Today: गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! लाल रंगात उघडणार आजचा शेअर बाजार, व्यवहारासाठी तज्ज्ञांनी निवडले हे शेअर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.