गावे शहरांवर पडतायेत भारी... ग्रामीण भागातील मागणीत मोठी वाढ, केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून माहिती समोर!
गावे किंवा गावकऱ्यांना नेहमी कमी लेखले जाते. मात्र, आता याच गाववासियांनी कमाल केली आहे. शहरी भागाला मागे टाकत ग्रामीण भागातील लोकसंख्येने विक्रम केला आहे. ग्रामीण भागात एफएमसीजी अर्थात प्रक्रियाकृत अन्नपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शहरी भागात एफएमसीजी प्रॉडक्ट्सची मागणी ही काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे सध्या ग्रामीण हा शहरी भागाला भारी पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा – सरकार केव्हा घेणार दखल? कुणाल कामरा-ओला वादात मंत्री नितीन गडकरींची एंट्री!
शहरी भागात मंदीचे स्वरूप
केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या या अहवालानुसार गेल्या महिन्यात ग्रामीण भागात एफएमसीजी अर्थात प्रक्रियाकृत अन्नपदार्थांच्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, याउलट शहरी भागात मागणीत घट झाल्याचे समोर आले आहे. असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे. “शहरी भागातील एफएमसीजी अर्थात प्रक्रियाकृत अन्नपदार्थांच्या विक्रीतील वाढ ही Q1FY2023-24 मध्ये 10.1 टक्क्यांवरून, Q1FY2024-25 मध्ये 2.8 टक्क्यांपर्यंत घसरली आहे.”
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)
मोटर वाहनांची विक्री का कमी झाली?
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन किंवा एफएडीएच्या डेटाचा हवाला देत सर्वेक्षणात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या सहामाहीत वाहन विक्री 2.3 टक्क्यांनी कमी झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत आर्थिक वर्ष 2023-24 च्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत शहरी भागात विक्री कमी झाली आहे. विशेष म्हणजे 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत घर विक्री आणि प्रकल्प लॉन्चमध्येही घट झाली आहे.
अवकाळी पावसाचा परिणाम?
वरील अहवालातील माहिती ही प्रामुख्याने ग्राहकांच्या भावना समजून घेणे, सामान्यपेक्षा जास्त पावसामुळे मर्यादित ग्राहक आणि हंगामी कालावधीत नवीन खरेदी करण्यापासून परावृत्त करणे याद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते,” असेही अहवालात म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार, सध्या सणासुदीचा हंगाम आणि ग्राहकांच्या भावना सुधारणे, यामुळे “शहरी ग्राहकांची मागणी वाढू शकते.” अशी आशाही या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.