एका लाखाचे झाले 11 लाख रुपये, 'या' मल्टीबॅगर स्टॉकद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच आता दिवाळीपुर्वी शेअर बाजारातील चमक पुन्हा परतली आहे. दरम्यान, चालू आठवड्यातील मुहूर्त ट्रेडिंग आणि दिवाळीचे पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी चांगले गेले आहे. चालू महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणारी विक्री ठप्प झाली आहे. मात्र, असे असले तरी स्थानिक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सने पुन्हा एकदा 80000 चा टप्पा ओलांडला आहे.
पुन्हा एकदा 80000 चा टप्पा पार
आज शेअर बाजारातील व्यवहारात बँकिंगसह सर्वच क्षेत्रांनी बाजाराच्या वाढीस हातभार लावला आहे. आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही खरेदी दिसून आली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स 603 अंकांनी वधारून, 80005 अंकांवर पोहोचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 158 अंकांनी वाढून, 24,339 अंकांवर बंद झाला आहे. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) 4147 शेअर्सपैकी 2565 शेअर्स हे तेजीसह बंद झाले आहे. तर 1424 शेअर्स हे घसरले आहेत. विशेष म्हणजे आज बीएसईच्या 158 शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 25 शेअर्स हे वाढीसह तर 5 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत.
कोणते शेअर्स राहिले तेजीत
दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 37 शेअर्स हे वाढीसह आणि 13 शेअर्स हे घसरणीसह बंद झाले आहेत. वाढत्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक 3.09 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 2.68 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.66 टक्के, अदानी पोर्ट्स 2.57 टक्के, टाटा स्टील 2.43 टक्के, सन फार्मा 2.24 टक्के, एचयूएल 2.12 टक्के वाढीसह बंद झाले आहे.
कोणते शेअर्स घसरले
तर घसरण झालेल्या शेअर्समध्ये ॲक्सिस बँक 1.30 टक्क्यांच्या घसरणीसह, कोटक महिंद्रा बँक 0.83 टक्क्यांच्या घसरणीसह, टेक महिंद्रा 0.72 टक्क्यांनी, एचडीएफसी बँक 0.46 टक्क्यांच्या घसरणीसह आणि मारुती 0.14 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले आहेत.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.50 लाख कोटी रुपयांची वाढ
भारतीय शेअर बाजारात स्थानिक गुंतवणूकदारांच्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध शेअर्सचे मार्केट कॅप 441.54 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील ट्रेडिंग सत्रात 436.98 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.54 लाख कोटी रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)