Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Strike Update : संप टळण्याऐवजी आणखी चिघळला? युनियनने दिली अनिश्चितकालीन संपाची चेतावणी, नवीन तारीख जाहीर

Bank Strike Update : बँक कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्याची चिन्हे दिसू लागली असून बँक युनियनने संपाची नवीन तारीख जाहीर करत आता अनिश्चितकालीन विरोधाचा इशारा दिला आहे. शासनाकडून मागण्यांवर योग्य तो तोडगा न निघाल्यास देशभरातील बँकिंग सेवा दीर्घकाळासाठी ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 28, 2026 | 12:48 PM
युनियनने दिली अनिश्चितकालीन संपाची चेतावणी ( सौजन्य - सोशल मीडिया )

युनियनने दिली अनिश्चितकालीन संपाची चेतावणी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • संप टळण्याऐवजी आणखी चिघळला?
  • युनियनने दिली अनिश्चितकालीन संपाची चेतावणी
  • नवीन तारीख जाहीर
Bank Strike Update : बँक कर्मचारी आज म्हणजेच 28 सप्टेंबरपासून ३ दिवसांच्या संपावर जाणार होते. पण रविवारी रात्री उशिरा इंडियन बँक्स असोसिएशन IBA आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स UFBU यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा संप स्थगित करण्यात आला आहे. बँकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. रविवारी रात्री ९:३० वाजता झालेल्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली. पण तरीही संपाबाबत युनियनने नवी चेतावणी का दिली? नव्या तारीखही घोषित करण्यात आली आहे. काय आहे या मागचं कारण? ( Bank Strike Update ) 

Share Market मध्ये हाहाःकार! मार्केट उघडताच 600000 कोटी स्वाहा… निफ्टी 22,850 अंकांनी तर Sensex 1000 अंकांनी कोसळला

रविवारी रात्री ९:३० वाजता झालेल्या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याच्या मुद्द्यावर गंभीर चर्चा झाली. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन AIBEA चे सरचिटणीस सी. एच. व्यंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार, पाच दिवसांच्या बँकिंगच्या मागणीवर विचार करण्यासाठी आणि तिची अंमलबजावणी करण्यासाठी एक संयुक्त उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजना आणि इतर प्रलंबित मुद्द्यांवर पुढील द्विपक्षीय चर्चा सुरू ठेवण्यासही सहमती झाली आहे.

कामगार संघटनांचा इशारा

२८-३० सप्टेंबर रोजी नियोजित असलेला प्रस्तावित संप जरी पुढे ढकलण्यात आला असला तरी, प्रकरण अजून थंड झालेलं नाही. कामगार संघटनांनी आधीच इशारा दिला आहे की, नव्याने स्थापन झालेल्या समिती आणि सरकारसोबतच्या पुढील चर्चेतून त्यांच्या मागण्यांवर ठोस तोडगा काढला नाही तर २६ ऑक्टोबर २०२६ पासून अनिश्चित काळासाठी देशव्यापी बँक संप सुरू होऊ शकतो.

बैठकीत काय चर्चा झाली?

UFBU च्या परिपत्रकानुसार, दुसरा आणि चौथा शनिवार वगळता इतर सर्व शनिवार सुट्टी म्हणून घोषित करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी, IBA आणि UFBU च्या प्रतिनिधींचा समावेश असलेली एक उच्चस्तरीय समिती तात्काळ स्थापन केली जाईल. ही समिती संभाव्य पर्यायांचा विचार करेल, सर्व संबंधित घटकांशी सल्लामसलत करेल आणि ग्राहकांसह सर्व संबंधित घटकांना मान्य होईल अशा तोडग्यासाठी काम करेल. UFBU ची पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याची मागणी विचाराधीन आहे. सरकारने या प्रकरणी अद्याप कोणतेही ठोस विधान केलेले नाही.

नाहीतर अनिश्चित काळासाठी संपावर जातील

IBA ने असेही आश्वासन दिले आहे की, युनियन आणि संघटनांनी उपस्थित केलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारने बदल प्रस्तावित केल्यास, स्केल ४ आणि त्यावरील अधिकाऱ्यांसाठीच्या कामगिरी-आधारित प्रोत्साहन PLI योजनेवर चर्चा सुरू होऊ शकते. ८ मार्च २०२४ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तात नमूद केलेल्या उर्वरित मुद्द्यांवरही दोन्ही बाजू चर्चा करतील, जेणेकरून ते लवकरात लवकर सोडवता येतील. जर हे मुद्दे सुटले तर उत्तम; अन्यथा, बँक कर्मचारी अनिश्चित काळासाठी संपावर जाऊ शकतात.

UPI वर लागणाऱ्या Charges चा गोंधळ Share खरेदीतही! ब्रोकर भरणार की गुंतवणूकदारांच्या खिशाला बसणार फटका?

Web Title: Bank strike new dates announced unions warn of indefinite protest marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • Bank Employee
  • Employees on Strike

संबंधित बातम्या

Bank Strike आधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणत्याही ATM मधून Free पैसे काढा, सरकारी बँकांनी हटवले चार्जेस
1

Bank Strike आधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता कोणत्याही ATM मधून Free पैसे काढा, सरकारी बँकांनी हटवले चार्जेस

Bank Strike Update : 3 दिवस बँका बंद राहणार! UPI आणि ATM वर काय परिणाम होणार? व्यवहार करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा
2

Bank Strike Update : 3 दिवस बँका बंद राहणार! UPI आणि ATM वर काय परिणाम होणार? व्यवहार करण्यापूर्वी ‘ही’ माहिती नक्की वाचा

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’  सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार
3

Bank Strike Update : बँक ग्राहकांना मोठा दिलासा! 28, 29 अन् 30 सप्टेंबरला ‘या’ सहकारी बँकांचं काम नियमित सुरु राहणार

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार
4

अरे देवा… मग Salary चं काय? Bank Strike मुळे पगारावर परिणाम? आता वाट बघावी लागणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.