
डिसेंबर महिन्यात तब्बल १८ दिवस राहणार बँक बंद (Photo Credit- X)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) अद्ययावत हॉलिडे कॅलेंडरनुसार, प्रादेशिक सुट्ट्यांमुळे (Regional Holidays) डिसेंबर महिन्यात अनेक राज्यांमध्ये बँका १८ दिवस बंद राहतील.
नियमित शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांव्यतिरिक्त, हॉलिडे कॅलेंडरनुसार सार्वजनिक सुट्ट्यांमुळे अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या असतील. महत्त्वाचे म्हणजे, २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस असल्यामुळे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँका बंद राहतील.
डिसेंबर २०२५ मधील बँक सुट्ट्या (RBI यादी)
आरबीआयच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच चार रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
| तारीख | दिवस | कारण/सुट्टी | ठिकाण |
| १ डिसेंबर | सोमवार | स्टेट इनॉगरेशन डे/इंडिजिनस फेथ डे | अरुणाचल प्रदेश आणि नागालँड |
| ३ डिसेंबर | बुधवार | सेंट फ्रान्सिस झेवियरचा सण | गोवा |
| ७ डिसेंबर | रविवार | साप्ताहिक सुट्टी | देशभरात |
| १२ डिसेंबर | शुक्रवार | पा तोगन नेंगमिनजा संगमा यांची पुण्यतिथी | मेघालय |
| १३ डिसेंबर | शनिवार | दुसरा शनिवार | देशभरात |
| १४ डिसेंबर | रविवार | साप्ताहिक सुट्टी | देशभरात |
| १८ डिसेंबर | गुरुवार | यू सोसो थाम यांची पुण्यतिथी | मेघालय |
| १९ डिसेंबर | शुक्रवार | गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day) | गोवा |
| २१ डिसेंबर | रविवार | साप्ताहिक सुट्टी | देशभरात |
| २५ डिसेंबर | गुरुवार | ख्रिसमस (Christmas) | देशभरात |
| २७ डिसेंबर | शनिवार | चौथा शनिवार | देशभरात |
| २८ डिसेंबर | रविवार | साप्ताहिक सुट्टी | देशभरात |
ऑनलाइन सेवा सुरू राहणार
सर्व बँक हॉलिडेजच्या दिवशी बँकांच्या शाखांमधील सेवा बंद असल्या तरी, ग्राहकांना त्यांचा बँक व्हिजिटचा प्लान संबंधित राज्याच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार करण्याची शिफारस करण्यात येते. आनंदाची बाब म्हणजे, सर्व बँक हॉलिडेजच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. ग्राहक युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) पेमेंट, नेट बँकिंग आणि एटीएम (ATM) ट्रान्झॅक्शनसारख्या ऑनलाइन सेवांचा वापर करू शकतात.