देशातील प्रमुख बँका आणि टेलिकॉम कंपन्या 'सायलेंट ऑथेंटिकेशन' तंत्रज्ञानावर काम करत आहेत. सिम क्लोनिंग आणि ई-सिम फसवणूक रोखण्यासाठी हे ओटीपीची जागा घेणार आहे.
आरबीआय एप्रिलच्या पतधोरणात रेपो रेट ५.२५% वर स्थिर ठेवू शकते. इराण-अमेरिका युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे तूर्तास व्याजदर कपात नाही. वाचा सविस्तर
अमेरिका-इराण यांच्यातील संघर्षामुळे भारतीय शेअर बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, RBI ने भांडवली बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित नवीन नियमांच्या अंमलबजावणीची तारीख १ एप्रिलवरून १ जुलैपर्यंत वाढवली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एअरटेल पेमेंट्स बँक लिमिटेडच्या विरोधात कडक कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत काही तरतुदींचे पालन न केल्याने बँकेवर ३१.८० लाखांचा दंड ठोठावला आहे.
आरबीआय 'पेमेंट्स स्विचिंग सर्व्हिस (PaSS)' नावाची एक नवीन प्रणाली विकसित करत आहे. बँक खाते दुसऱ्या बँकेत बदलणे हे मोबाईल नेटवर्क पोर्टेबिलिटीसारखे असेल.
एप्रिल महिन्यात विविध राज्यांमध्ये बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. आरबीआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, पुढील महिन्यात चार रविवार आणि दुसऱ्या व चौथ्या शनिवार व्यतिरिक्त, विविध ठिकाणी बँका आठ दिवस बंद…
ऑनलाइन पेमेंटसाठी केवळ एकच OTP पुरेसा ठरणार नाही. RBI ने सर्व बँका आणि फिनटेक कंपन्यांना निर्देश दिले आहेत की, प्रत्येक व्यवहाराचे किमान दोन वेगवेगळ्या पद्धतींद्वारे प्रमाणीकरण होणे अनिवार्य आहे
एप्रिल २०२६ पासून ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित काही विशिष्ट बदल अंमलात येणार आहेत. फसवणुकीपासून तुमच्या निधीचे अधिक प्रभावीपणे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) काही कडक नवीन नियम तयार केले…
जर्मनी सध्या कुशल कामगारांच्या तीव्र कमतरतेचा सामना करित आहे. ज्येष्ठ कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे आणि तरुण उमेदवारांच्या कमतरतेमुळे देशातील अनेक उद्योगांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे तिथे भारतीयांची मागणी वाढली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आपल्या मासिक बुलेटिनमध्ये नमूद केले आहे की, मध्यपूर्वेतील सध्याचा संघर्ष आणि जागतिक बाजारांमधील वाढती अस्थिरता असूनही, भारताची अर्थव्यवस्था कणखर राहिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडियाची उपकंपनी असलेल्या सेंट्रल माईन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टट्यूट लिमिटेड (सीएमपीडीआयएल) च्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरला (आयपीओ) शुक्रवारी शेअर विक्रीच्या पहिल्याच दिवशी ७% बोली मिळाली.
मार्च महिन्यात तिसऱ्या आठवड्यात १६ मार्च पासून ते २२ मार्चपर्यंत बँका अनेक दिवस बंद राहतील. पण नेमकी काय कारणं आहे की बँकांना सुट्ट्या आहेत. ते जाणून घेऊनच कामाचं नियोजन करा.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ४.८८५ अब्ज डॉलर्सची मोठी वाढ झाली आहे.
सायबर गुन्हेगारांमुळे आपल्या कष्टाचे पैसे गमवावे लागतात. अशा पीडित ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक प्रस्ताव मांडला आहे.
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या युद्धामुळे आता इराणमधील दुसऱ्या क्रमांकाच्या खाजगी बँकेच्या मुंबई शाखेच्या मान्यतेवर RBI कडून निर्णय लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
लाखो बँक ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, बँकिंग सेवांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक ऐतिहासिक आणि अत्यंत आवश्यक पाऊल उचलले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे ग्राहक आनंदी आहेत.
बँक खाते गोठवणे हे कोणत्याही ग्राहकासाठी एक मोठी गैरसोय असू शकते, कारण त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार थांबतात. बँका सामान्यतः संशयास्पद हालचाली किंवा सुरक्षेचा मोठा धोका आढळल्यावर हे पाऊल उचलतात.
CPI आधारित महागाईत किंचित वाढ होण्याची अपेक्षा असल्याने, RBI चलनविषयक धोरण समिती (MPC) आर्थिक वर्ष २०२७ मध्ये धोरणात्मक व्याजदर स्थिर ठेवण्याची शक्यता आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने Assistant पदाच्या 650 जागांसाठी भरती जाहीर केली असून पदवीधर उमेदवारांना आकर्षक वेतन आणि विविध भत्त्यांसह सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.