सोन्याच्या दरात पुन्हा उसळी! चार दिवसांत तब्बल 'इतक्या' रुपयांची वाढ (फोटो-सोशल मीडिया)
Gold Price Today: अल्पशा विश्रांतीनंतर सोन्याच्या वाढत्या किमतींनी पुन्हा एकदा जोरदार उसळी मारली आहे. मागील चार दिवसानंतर सोन्याच्या दरात 3 हजारांची वाढ झाली आहे. परिणामी जीएसटीसह सोन्याचे दर 1,30, 300 वर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी सोन्याचे हेच दर 1,27, 300 रुपये होते. डॉलरच्या तुलनेत जागतिक पातळीवर रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या दर वाढीवर झाल्याचे सांगितले जात आहे. वाढलेल्या या दरवाढीमध्ये ग्राहक हिरमुसले आहेत.
सोन्याच्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार संभ्रमात
गेल्या दोन महिन्यामध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले असून सोन्याचे दर जीएसटीसह 1,35,000 रुपयांवर गेले आहे. याउलट, दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मात्र गेल्या चार दिवसात सोन्याच्या दरांनी झेप घेतली असून 3 हजारांनी भाव वाढले आहेत. म्हणजेच, दिवाळीच्या काळात सोने जीएसटीसह 1,25, 000 रुपये असून जवळपास महिनाभर यावरच स्थिर होते. मात्र, गेल्या 4 दिवसांपासून सोन्याचे भाव वाढून 1,30, 300 वर पोहोचले आहेत. या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Sahara Refund Process: गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ‘सहारा’ मध्ये अडकलेले पैसे परत कसे मिळवावे?
या दरम्यान, 2025 मध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अधिक परतावा मिळाला आहे. मागच्या वर्षी सोने 75 हजारांवर होते, आता ते 1 लाख 22 हजारांवर गेले आहे. आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित पर्याय म्हणून ग्राहक सोन्याची गुंतवणूक करतात. डिसेंबरमध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून पुन्हा व्याजदर कपात होणार असल्याची शक्यता वर्तवल्याने सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी, सुरक्षित मालमत्तांची गुंतवणूकदारांमध्ये मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा : Bank Loan New Rules: बँक कर्ज मंजुरीत मोठा बदल! आता कर्ज मिळण्यासाठी लागेल ‘क्लीन’ क्रिमिनल रेकॉर्ड
जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा, सामान्यतः सोन्याचे दर वाढतात. कारण, महागाईचा धोका वाढतो आणि सोने महागाईपासून बचाव करतात. वाढत्या खर्चामुळे त्या वस्तूंची मागणी वाढत असल्याने मागणी पूर्ण करण्यात व्यापारी अयशस्वी होतात. ज्यामुळे किमतीमध्ये अधिक वाढ होते ज्यामुळे त्याचा परिणाम महागाईवर होतो. या वाढत्या सोन्याच्या भावामुळे व्यापारी खुश असून सध्याच्या लगीनसराईत वाढत्या भावामुळे चिंतेत आहेत. सोन्याच्या किंमत वाढीचे फेडचे व्याजदर कमी झाल्याचे मुख्य कारण असून यामुळे सोन्याचे दर कायम बदलत असतात.






