Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

NFSA Update: सरकारचा मोठा निर्णय! मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई..; 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची वगळली नावे

मोफत मासिक रेशन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या २.२५ कोटी लोकांची नावे केंद्र सरकारने रेशन कार्डमधून काढून टाकली असून नावे काढण्यात आलेले लोक या योजनेसाठी अपात्र होते. या योजनेअंतर्गत दरमहा गरिबांना ५ किलो मोफत अन्नधान्य मिळते

  • By Priti Hingane
Updated On: Nov 19, 2025 | 10:02 AM
Antyodaya Anna Yojana

Antyodaya Anna Yojana

Follow Us
Close
Follow Us:
  • सरकारची मोफत रेशन योजनेत मोठी कारवाई
  • 2.25 कोटी अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळली
  • अपात्र लाभार्थी हटवल्याने पात्रांना मिळणार अधिक लाभ
 

NFSA Update: मोफत मासिक रेशन योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या २.२५ कोटी लोकांची नावे केंद्र सरकारने रेशन कार्डमधून काढून टाकली आहेत. नावे काढण्यात आलेले लोक या योजनेसाठी अपात्र होते. या योजनेअंतर्गत दरमहा गरिबांना ५ किलो मोफत अन्नधान्य मिळते. तथापि, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत अनेक अपात्र लोक ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, मासिक उत्पन्न मर्यादा ओलांडतात किंवा कंपन्यांचे संचालक आहेत यांचा या यादीत समावेश असल्याचे आढळून आले. अशा सुमारे २.२५ कोटी अपात्र लाभार्थ्यांना यातून वगळण्यात आले आहे, अशी माहिती अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी दिली.

संजीव चोप्रा म्हणाले की, राज्य सरकारांकडून पात्र लाभार्थी यादीत समाविष्ट केली जातात. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने अपात्र लाभार्थीची ओळख पटवली आहे.

हेही वाचा : Todays Gold-Silver Price: चांदी थेट 5 हजारांनी कोसळली, सोन्याच्या किंमतीही उतरल्या! जाणून घ्या सविस्तर

२०१३ मध्ये संसदेने मंजूर केलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात (एनएफएसए) ग्रामीण लोकसंख्येच्या ७५ टक्के आणि शहरी लोकसंख्येच्या ५० टक्के लोकसंख्येला या योजनेत समाविष्ट करण्याची तरतूद आहे. यामध्ये देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अंदाजे दोन तृतीयांश लोकसंख्येचा समावेश आहे, जी २०११ च्या जनगणनेनुसार ८१३.५ दशलक्ष आहे. लाभार्थी ओळखणे आणि रेशन कार्ड जारी करणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अपात्र लाभार्थी काढून टाकणे आणि कायद्याअंतर्गत पात्र लाभार्थी जोडणे ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे.

हेही वाचा : Share Market Today: गुंतणूकदारांनो, आज ‘या’ शेअर्सवर ठेवा फोकस! बाजार तज्ज्ञांनी केली शिफारस

कुटुंबांना दरमहा मिळणार ३५ किलो धान्य

कायद्यानुसार, अंत्योदय अन्न योजनाअंतर्गत प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो धान्य मिळण्यास पात्र आहे. प्रत्येक व्यक्ती दरमहा ५ किलो धान्य मिळण्यास पात्र आहे. देशात १९ कोटींहून अधिक रेशनकार्डधारक आहेत, तर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंदाजे ५ लाख रेशन दुकाने आहेत. या निर्णयामुळे जे पात्र आणि आर्थिकदृष्ट्या असक्षम असतील त्यांना याचा नक्की फायदा होईल. देशात जे कुपोषणाचे प्रमाण आहे ते काही प्रमाणात कमी होण्यासाठी या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. अपात्र लाभार्थी हटवल्याने पात्रांना अधिक लाभ मिळेल.

 

Web Title: Big action in free ration scheme names of 225 crore ineligible beneficiaries excluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 10:02 AM

Topics:  

  • Central Governement

संबंधित बातम्या

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर
1

मराठवाड्याला बुलेट गती! छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वे दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.