
Big deal between Tata Projects and ASI Global
Tata Projects & ASI Global: भारतातील दिग्गज कंपन्या टाटा प्रोजेक्ट्स आणि एएसआय ग्लोबल यांनी भारतात विमान देखभाल सुविधांचे डिझाइन आणि बांधकाम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत टाटा प्रोजेक्ट्स आणि एएसआय ग्लोबल हे सर्व हँगर आणि एमआरओ पायाभूत सुविधांसाठी युतीने काम करणार आहेत.
टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड अर्थात TPL, EPC कंपनी आणि एएसआय ग्लोबल, विमान हँगर डिझाइन आणि फॅब्रिकेशनमधील जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त तज्ञ, या सगळ्यांच्या अभ्यासाने भारतात विमान देखभाल सुविधांचे डिझाइन आणि बांधकाम संयुक्तपणे ऑफर करण्यासाठी एक सामंजस्य करार MNO वर स्वाक्षरी केली आहे.
या भागीदारीमुळे दोन्ही कंपन्यांना विमान देखभाल हँगर्सची मागणी, व्यावसायिक विमान कंपन्या, संरक्षण क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित संधींची संयुक्तपणे काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या भागीदारीमुळे टाटा प्रोजेक्ट्स आणि एएसआय ग्लोबल हे भारतातील सर्व हँगर आणि एमआरओ पायाभूत सुविधा, स्पोर्ट्स सेंटर्स आणि बल्क स्टोरेज सुविधांसाठी एकमेव ठिकाण म्हणून स्थान मिळवतात. ज्यामुळे मोठ्या स्पॅन स्टील स्ट्रक्चर्सची देशातील वाढती मागणी पूर्ण होते, असे कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
एअरक्राफ्ट सपोर्ट इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मार्क लँगबेन यांनी “विमान हँगर डिझाइन आणि बांधकामातील आमचा व्यापक अनुभव आणि टाटा प्रोजेक्ट्सचा भरीव आणि गुंतागुंतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसोबत आम्ही महत्वपूर्ण काम करू. म्हणाले. तसेच, टाटा प्रोजेक्ट च्या इन-हाऊस स्टील फॅब्रिकेशन क्षमतेमध्ये आम्ही खरोखरच सुरुवातीपासून समर्थनासह एक-स्टॉप सोल्यूशन देत आहोत. असेही ते म्हणाले.
हेही वाचा : Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!
भारताच्या वेगाने वाढणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या, अत्याधुनिक एमआरओ सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने ही भागीदारी महत्त्वाची पायरी असून एएसआय ग्लोबलच्या विशेषज्ञ अभियांत्रिकी ताकदींसह टाटा प्रोजेक्ट्सच्या एकात्मिक ईपीसी कौशल्याचे संयोजन करत आहोत. त्यानुसार ग्राहकांना एक खरा वन-स्टॉप सोल्यूशन देऊ असे टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ विनायक पै म्हणाले