SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का! UPI सेवा होणार बंद, मोबाईल पेमेंट्सवर परिणाम होण्याची शक्यता (फोटो सौजन्य - Pinterest)
SBI UPI Downtime Marathi News: जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. SBI ने UPI सेवेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. बँकेने त्यांच्या ग्राहकांना सेवा व्यत्यय आणि नियोजित देखभालीमुळे त्यांच्या डिजिटल व्यवहार प्लॅटफॉर्म UPI वर होणाऱ्या परिणामाची माहिती दिली आहे.
SBI च्या सोशल मीडिया पोस्टनुसार, हे अपडेट्स अशा SBI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचे आहेत जे प्रामुख्याने त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आणि डिजिटल बँकिंग सेवांवर अवलंबून असतात.
SEBI च्या मंजुरीनंतर Jane Street चे भारतात पुनरागमन, व्यवहारांवर आता बारकाईने लक्ष
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै २०२५ रोजी, नियोजित देखभालीमुळे भारतीय प्रमाणवेळेनुसार ००:१५ ते ०१:०० वाजेपर्यंत यूपीआय सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नसतील. म्हणजेच, या काळात तुम्ही यूपीआय वापरून व्यवहार करू शकणार नाही. एसबीआय वापरकर्ते नियोजित देखभालीदरम्यान डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय लाईट सेवा वापरणे सुरू ठेवू शकतात.
Due to scheduled maintenance activity, SBI UPI services will be temporarily unavailable from 00:15 hrs to 01:00 hrs on 22.07.2025 (IST).
Customers may continue to use UPI Lite Services for uninterrupted service.
We regret the inconvenience caused to our customers.
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 20, 2025
BHIM SBI PAY अॅप डाउनलोड करा आणि ते उघडा.
अॅपमध्ये दिलेल्या “UPI LITE” या ऑप्शनवर टॅप करा.
हे अॅप तुम्हाला प्रथम UPI LITE वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यास सांगेल.
तुम्ही पैसे लोड करताच, UPI LITE फीचर वापरता येईल.
कमाल एक-वेळ पैसे लोड करण्याची रक्कम: ₹२,०००
एका व्यवहाराची कमाल मर्यादा: ₹५००
एका दिवसात कमाल एकूण खर्च मर्यादा: ₹४,०००
तुम्ही UPI LITE वापरत असाल तर UPI Lite ला पिनची आवश्यकता नाही. BHIM SBI Pay द्वारे लहान पेमेंट जलद आणि सहजपणे करता येतात. BHIM SBI Pay अॅपद्वारे तुम्ही कधीही UPI LITE बंद करू शकता.
तर नाही, तुम्ही UPI LITE वरुन आर्थिक व्यवहार केले असतील तर ते व्यवहार तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये ते व्यवहार दिसत नाहीत कारण ते थेट वॉलेटमधून कापले जातात. फक्त वॉलेट लोड व्यवहार दिसतात. जर एखाद्या ग्राहकाचे सक्रिय UPI LITE खाते असेल आणि त्याच्या मोबाइल डिव्हाइसमध्ये शिल्लक असेल आणि तो त्याचे मोबाइल डिव्हाइस बदलू इच्छित असेल तर त्यासाठी देखील app मध्ये तरतूद केली आहे.