Stock Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? कोणते स्टॉक्स चमकवणार गुंतवणूकदारांचं नशिब? एका क्लिकवर जाणून घ्या
21 जुलै रोजी आज शेअर बाजार सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांनी सांगितलं आहे की, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,०१९ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १३ अंकांनी कमी होता.
गेल्या आठवड्यात शुक्रवारी, देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बेंचमार्क निफ्टी ५० २५,००० च्या पातळीच्या खाली घसरला. सेन्सेक्स ५०१.५१ अंकांनी म्हणजेच ०.६१% ने घसरून ८१,७५७.७३ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १४३.०५ अंकांनी म्हणजेच ०.५७% ने घसरून २४,९६८.४० वर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी ५४५.८० अंकांनी किंवा ०.९६% ने घसरून ५६,२८३.०० वर बंद झाला. त्यामुळे आठवड्याचा शेवट घसरणीने झाला. विप्रो, बजाज फायनान्स आणि टाटा स्टील हे शेअर्स शुक्रवारी तेजीत होते. तर अॅक्सिस बँक, श्रीराम फायनान्स आणि बीईएल या शेअर्समध्ये घसरणा झाली. (फोटो सौजन्य – Pinterest)
प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना सेल, आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज आणि हिमातसिंगका सेइदे या शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे. चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे उपाध्यक्ष मेहुल कोठारी, एसएस वेल्थस्ट्रीटच्या संस्थापक सुगंधा सचदेवा आणि लक्ष्मीश्री इन्व्हेस्टमेंटचे संशोधन प्रमुख अंशुल जैन यांनी गुंतवणूकदारांना १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्यासाठी सहा इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. ज्यामध्ये नोव्हा अॅग्रीटेक , मनाली पेट्रोकेमिकल्स , यस बँक , यूको बँक , श्रीराम प्रॉपर्टीज आणि जागरण प्रकाशन यांचा समावेश आहे.
आजच्या व्यवहारात गुंतवणूकदार इटरनल, आयडीबीआय बँक , अल्ट्राटेक सिमेंट, पीएनबी हाऊसिंग फायनान्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, जिओ फायनान्शियल, येस बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आरबीएल बँक, जेके सिमेंट, वॉरबग पिंकस, पंजाब अँड सिंध बँक, डॉ. रेड्डीज या स्टॉकवर लक्ष केंद्रित करू शकतात. चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी आज गुंतवणूकदारांना मॅक्स इस्टेट्स , आयजी पेट्रोकेमिकल्स, ब्लू जेट हेल्थकेअर , सनाथन टेक्सटाइल्स आणि सागर सिमेंट्स या शेअर्सची खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
लहान मुलांना iPhone द्यावा की Android? पालकांमध्ये सर्वात मोठा गोंधळ, अशी करा योग्य पर्यायाची निवड
आयडीबीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट , पीएनबी हाऊसिंग फायनान्स, इटरनल (झोमॅटो), क्रिसिल आणि हॅवेल्स या किमान २० कंपन्यांपैकी आहेत ज्या सोमवार, २१ जुलै रोजी त्यांचे उत्पन्न अहवाल जाहीर करणार आहेत. २१-२७ जुलै या आठवड्यात ९५ हून अधिक कंपन्या त्यांचे Q1FY26 निकाल जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये इन्फोसिस, पेटीएम , नेस्ले इंडिया, एटरनल, डिक्सन टेक्नॉलॉजीज आणि आयआरएफसी सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे.