BSNL, MTNL, BPCL Why no one is interested in buying companies for sale by Modi government? New plan to sell companies
मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिकॉम निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी दूरसंचार कंपन्यांच्या नॉन-कोअर मालमत्तांचा लिलाव करण्याच्या पहिल्या प्रयत्नाला थंड प्रतिसाद मिळाला. अशा स्थितीत सरकारने आता या मालमत्तांसाठी पुन्हा बोली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील काही फ्लॅटसाठी काही निविदा आल्या आहेत, परंतु राजपुरा आणि हैदराबादमधील जमिनीसाठी कोणीही बोली लावली नाही. आम्ही या मालमत्तांसाठी पुन्हा बोली मागवू, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले(BSNL, MTNL, BPCL Why no one is interested in buying companies for sale by Modi government? New plan to sell companies).
सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या सहा मालमत्ता एमएसटीसी पोर्टलवर 970 कोटी रुपयांच्या मूळ किमतीसह लिलावासाठी ठेवल्या होत्या. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक अॅसेट मॅनेजमेंटच्या (दिपम) नेतृत्वाखाली ही बोली प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. एमटीएनएल दिल्ली आणि मुंबई येथे दूरसंचार सेवा पुरवते, तर बीएसएनएल ही शहरे वगळता संपूर्ण देशात दूरसंचार सेवा पुरवते. या सहा मालमत्तांच्या विक्रीतून दूरसंचार विभागाला 3 हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा होती.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) विक्रीचा सरकार अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. आता त्याची विक्री करण्याचा नवा मार्ग काढण्यासाठी सरकारच्या अंतर्गत चर्चा सुरू आहेत. दीपमचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी या प्रकारचे संकेत दिले आहेत. आम्हाला भारत पेट्रोलियमच्या निर्गुंतवणुकीसाठी प्रारंभिक बोली प्राप्त झाल्या आहेत. परंतु या बोली फायनॅन्शिअल बिड्समध्ये बदलू शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत, विद्यमान बोलीदारांनी आर्थिक बोली पुढे न केल्यास, सरकार पुन्हा नव्याने बोली मागवेल. याबाबतची स्थिती काही दिवसांत स्पष्ट होईल, असे पांडे म्हणाले. आतापर्यंत वेदांता समुह, खासगी इक्विटी फर्म अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेयर्ड कॅपिटलचे थिंक गॅस युनिटने बीपीसीएलमध्ये सरकारची 52.98 टक्के भागीदारी विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे. ही कंपनी मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत विकली जाण्याची शक्यता आहे.
[read_also content=”कुठे मृतदेहाचे लहान लहान तुकडे करतात, कुठे मृतदेह उंचावर लटकवतात तर कुठे होतात आकाशात अंतिम संस्कार; अंत्यसंस्काराच्या क्रूर आणि भयानक चालीरीती https://www.navarashtra.com/world/cruel-horrible-funeral-rituals-nrvk-236247.html”]
[read_also content=”घ्या… आता एवढंच करायचं बाकी राहिल होतं; कंडोम कंपनीही मोदी सरकारने विकायला काढली https://www.navarashtra.com/delhi/delhi/the-modi-government-also-started-selling-condoms-nrvk-226742.html”]
[read_also content=”मृत्यूची भविष्यवाणी; डोळ्यांकडे पाहून समजणार मृत्यू कधी होणार? https://www.navarashtra.com/science/science/it-is-possible-to-predict-death-by-looking-at-the-eyes-226184.html”]
[read_also content=”ही कसली डेंजर फॅशन ! पोरीने डोळ्यांमध्येही काढून घेतला टॅटू https://www.navarashtra.com/latest-news/fashion-beauty/kiersten-milligan-tattoos-in-the-eyes-nrvk-217438.html”]
[read_also content=”‘या’ जुन्या वस्तु अजिबात घरात ठेवू नका आत्ताच फेकून द्या; नाही तर मागे अशी पणवती लागेल की… https://www.navarashtra.com/religion/religion/vastu-tips-avoid-keeping-old-things-at-home-for-better-luck-nrvk-211406.html”]
[read_also content=”आई-वडिल बेडवर झोपायचे आणि भाऊ-बहिण खाली जमिनीवर; रोज रात्री बहिण असं काही करायची की… मुलीचा निर्लज्जपणा पाहून पोलिसही हादरले https://www.navarashtra.com/latest-news/in-mumbai-a-sister-raped-her-brother-nrvk-172906.html”]