अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केला पहिला आर्थिक सर्वेक्षण, काय आहे Economic Survey आणि त्याचं महत्त्व? (फोटो सौजन्य-एएनआय)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या 23 जुलैला म्हणजेच उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांचा हा सहावा पूर्ण अर्थसंकल्प असून अंतरिम अर्थसंकल्पासह त्यांचे सातवे अर्थसंकल्पीय भाषण ठरणार आहे. अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी म्हणजे आज (22 जुलै) संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला. यामध्ये देशासमोरील आर्थिक आव्हानांवर चर्चा केली जाते. तसेच मागील वर्षाचं आर्थिक विश्लेषण देण्यात येते. दरम्यान आजपासून (22 जुलै) संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण ठेवण्यात येणार आहे. यानंतर 23 जुलै रोजी अर्थमंत्री केंद्र सरकारच्या खर्चाचा आणि कमाईचा संपूर्ण हिशेब देणार आहेत. आज आर्थिक सर्वेक्षण सादर होणार आहे.