Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना दिलाय छप्परफाड परतावा; रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी!

रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी एजीआय इन्फ्रा लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्सनी 2677 टक्के परतावा दिला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 04, 2024 | 04:00 PM
'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

'या' सरकारी कंपन्यांचे शेअर वधारणार; गुंतवणुकीसाठी ब्रोकरेजने जारी केलीये लक्ष्य किंमत

Follow Us
Close
Follow Us:

रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी एजीआय इन्फ्रा लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. गेल्या 4 वर्षात कंपनीच्या शेअर्सनी 2677 टक्के परतावा दिला आहे. ज्यामुळे हा स्टॉक मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीदरम्यान कंपनीने आपल्या शेअर्ससाठी स्टॉक स्प्लिट जाहीर केले आहे.

स्टॉक स्प्लिट का केला जातोय?

एजीआय इन्फ्रा लिमिटेडच्या बोर्डाने अलीकडेच स्टॉक स्प्लिटला मान्यता दिली आहे. ही प्रक्रिया लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि शेअर्सची तरलता वाढवण्यासाठी केली जाते. स्टॉक स्प्लिट अंतर्गत, कंपनी एक विद्यमान शेअर लहान मूल्याच्या अनेक शेअर्समध्ये विभाजित करेल. ज्यामुळे त्यांची किंमत कमी होईल. यामुळे गुंतवणूकदार कमी किमतीत अधिक शेअर्स खरेदी करू शकतील.
(फोटो सौजन्य – istock)

उत्कृष्ट परतावा आणि गुंतवणूकदारांचा विश्वास

गेल्या 4 वर्षांत, एजीआय इन्फ्राने 2677 टक्क्यांचा परतावा दिला आहे. याचा अर्थ, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीत 4 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज त्याचे मूल्य सुमारे 27.77 लाख रुपये झाले असते. ही कामगिरी कंपनीची आर्थिक स्थिरता आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील तिची मजबूत पकड दर्शवते.

कितीये देवेंद्र फडणवीस यांची एकूण संपत्ती; जे घेणार आहे तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ!

रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी

एजीआय इन्फ्रा ही रिअल इस्टेट विकास प्रकल्पांमध्ये सक्रिय असलेली एक मोठी कंपनी आहे. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातील मागणी वाढली आहे. हे कंपनीच्या वाढीचे प्रमुख कारण आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील सुधारणा आणि सरकारने पायाभूत सुविधांचा विकास केल्याने हा उद्योग आणखी मजबूत झाला आहे.

शेअर विभाजनाचा फायदा गुंतवणूकदारांना

स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर शेअर्सचे ट्रेडिंग सोपे होईल. अधिक गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतील. तज्ज्ञांच्या मते, स्टॉक स्प्लिटचा कंपनीच्या बाजार भांडवलावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु गुंतवणूकदारांना शेअर्सची खरेदी आणि विक्री करणे सोपे होईल. एजीआय इन्फ्रा लिमिटेडच्या कामगिरीवरून असे दिसून येते की, कंपनी केवळ रिअल इस्टेट क्षेत्रातच वाढत नाही तर गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावाही देत ​​आहे. स्टॉक स्प्लिटच्या घोषणेनंतर, कंपनीच्या समभागांची तरलता आणि मागणीमध्ये काय बदल होतात? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Business multibagger share agni infra limited gave return of 2600 percent the company announced stock split

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 03:59 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.