Share Market Today: आर्चियन केमिकल इंडस्ट्रीजसह खरेदी करा हे महत्त्वाचे स्टॉक्स, बाजार तज्ज्ञ वैशाली पारेख यांनी केली शिफारास
२४ सप्टेंबर रोजी आज बुधवारी शेअर बाजाराची सुरुवात नाकारात्मक दिशेने होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार खालील पातळीवर उघडण्याची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवात दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,१७७ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ ७९ अंकांनी कमी होता.
मंगळवारी, देशांतर्गत शेअर बाजाराच्या निर्देशांकात सलग तिसऱ्या सत्रात घसरण वाढली आणि किरकोळ तोट्यासह संपले, बेंचमार्क निफ्टी ५० २५,२०० च्या पातळीच्या खाली घसरला. सेन्सेक्स ५७.८७ अंकांनी म्हणजेच ०.०७% ने घसरून ८२,१०२.१० वर बंद झाला, तर निफ्टी ५० ३२.८५ अंकांनी म्हणजेच ०.१३% ने घसरून २५,१६९.५० वर बंद झाला. मंगळवारी बँक निफ्टी निर्देशांक २२५.०० अंकांनी किंवा ०.४१% ने वाढून ५५,५०९.७५ वर बंद झाला. (फोटो सौजन्य – Pinterest)
आजच्या व्यवहारात गुंतवणुकदारांसाठी स्विगी, टाटा मोटर्स, भारतीय हॉटेल्स, बजाज इलेक्ट्रिकल्स, येस बँक, टोरेंट पॉवर, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टोरेंट फार्मा, माझगाव डॉक, दिलीप बिल्डकॉन हे शेअर्स फायद्याचे ठरणार आहेत. त्यामुळे आज गुंतवणूकदार या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात. प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधनाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी तीन इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये आर्चियन केमिकल इंडस्ट्रीज, ओरिएंट सिमेंट आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी (HCC) यांचा समावेश आहे.
चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया यांनी गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच ब्रेकआउट स्टॉकची शिफारस केेली आहे. यामध्ये अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया, सुप्रजित इंजिनिअरिंग, बोरोसिल, लुमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज आणि रेमसन्स इंडस्ट्रीज यांचा समावेश आहे.
आज खरेदी करायच्या स्टॉकबाबत बाजारातील तज्ञ आणि चॉइस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमित बगडिया, आनंद राठी येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील तांत्रिक संशोधनाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपलक्कल यांनी आठ इंट्राडे स्टॉकची शिफारस केली आहे. यामध्ये उषा मार्टिन लिमिटेड, अशोक लेलँड लिमिटेड, पंजाब नॅशनल बँक, बजाज ऑटो लिमिटेड, पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, मोइल लिमिटेड, वास्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड आणि संघवी मूव्हर्स लिमिटेड यांचा समावेश आहे.
VMS TMT च्या सुरुवातीच्या सार्वजनिक ऑफरिंग (IPO) ला १०० पेक्षा जास्त वेळा सबस्क्रिप्शन मिळाल्यानंतर, आज भारतीय शेअर बाजारात VMS TMT चे शेअर्स सूचीबद्ध होणार आहेत. VMS TMT IPO लिस्टिंगची तारीख आज, २४ सप्टेंबर २०२५ आहे. थर्मो मेकॅनिकली ट्रीटेड बार्स (टीएमटी बार्स) उत्पादक व्हीएमएस टीएमटी लिमिटेडचा सार्वजनिक इश्यू १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान खुला होता आणि आयपीओ वाटपाची तारीख २२ सप्टेंबर होती. व्हीएमएस टीएमटी आयपीओ लिस्टिंगची तारीख २४ सप्टेंबर आहे आणि व्हीएमएस टीएमटीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध केले जातील.