BSNL Recharge Plan: वारंवार रिचार्ज करण्याची चिंता मिटली! BSNL घेऊन आला 11 महिन्यांचा स्वस्त प्लॅन, हाय-स्पीडसह मिळणार हे फायदे
प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. कंमनीने त्यांच्या करोडो युजर्ससाठी एक स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन आणला आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, जे दिर्घ व्हॅलिटीडी असलेला प्लॅन शोधत आहेत आणि ज्या युजर्सना वारंवार रिचार्ज करण्यासाठी कंटाळा येतो. अशाच युजर्ससाठी कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन अतिशय उपयोगी ठरणार आहे.
कंपनीने लाँँच केलेल्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 330 दिवस म्हणजेच 11 महीने आहे. त्यामुळे हा रिचार्ज प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सना 11 महीने रिचार्जचे टेंशन नाही. कंपनीने लाँच केलेल्या या दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेल्या प्लॅनमध्ये केवळ डेटाच नाही तर अनलिमिटेड कॉलिंगसह इतर अनेक फायदे देखील ऑफर केले जाणार आहेत. हा प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की यापूर्वी कंपनीने त्यांच्या काही रिचार्ज प्लॅनवर सूट देण्याची घोषणा देखील केली होती. कंपनीने लाँच केलेल्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरं तर बीएसएनएलने अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या नवीन रिचार्ज प्लॅनबद्दल सांगितलं आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन रिचार्ज प्लॅनची किंमत 1,999 रुपये आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 1.5GB हाय स्पीड डेटा ऑफर केला जातो. याचा अर्थ असा की या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज चांगला डेटा मिळतो.
No more monthly recharge hassles! Switch to the BSNL ₹1,999 Plan and enjoy unlimited voice calls, 1.5 GB/day data, and 100 SMS/day for 330 days. Recharge via BSNL Website or SelfCare App and save 2% instantly. Offer ends 15th October.https://t.co/yDeFrwK5vt #BSNL #BSNL4G… pic.twitter.com/rn13xjugdR — BSNL India (@BSNLCorporate) September 22, 2025
तथापि, जर तुम्ही जास्त डेटा वापरणारे असाल, तर ही डेटा मर्यादा थोडी कमी वाटू शकते. याव्यतिरिक्त, हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग देखील देतो, म्हणजे तुम्ही तुम्हाला हवे तितके कॉलचा आनंद घेऊ शकता. म्हणजेच या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ डेटाच नाही तर कालिंगची देखील सुविधा मिळते.
याशिवाय, या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचा समावेश आहे, ज्यामुळे तो आणखी खास बनतो. शिवाय, जर तुम्ही 15 ऑक्टोबरपूर्वी हा रिचार्ज प्लॅन खरेदी केला तर तुम्हाला बीएसएनएल वेबसाइट आणि सेल्फकेअर अॅपद्वारे 2% पर्यंत त्वरित सूट मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही हा प्लॅन आणखी कमी किमतीत खरेदी करू शकता.
सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत युजर्सना निवडक प्रीपेड प्लॅन्स आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कंपनी मर्यादित काळासाठी त्यांच्या काही प्रीपेड प्लॅन्सवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. या ऑफरअंतर्गत रिचार्ज प्लॅन खरेदी केल्यास ग्राहकांची 38 रुपयांची बचत होणार आहे. तथापि, ही ऑफर 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि फक्त 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत वैध आहे.