छोटा पॅकेट बडा धमाका! किती मजबूत आहे स्लिम iPhone Air, युट्यूबरने केली चाचणी! समोर आला धक्कादायक रिझल्ट
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Apple ने त्यांची नवीन आणि लेटेस्ट iPhone 17 सीरीज लाँच केली. या सिरीजमध्ये कंपनीने एका नवीन आयफोनचा समावेश केला आहे. हा आयफोन आतापर्यंतचा सर्वात स्लिम आयफोन आहे. कंपनीने जेव्हा ईव्हेंटमध्ये हा स्लिम आयफोन लाँच केला होता, त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की, iPhone Air स्मार्टफोन सर्वात ड्यूरेबल डिव्हाईस आहे. कंपनीने केलेल्या या दाव्यानंतर आता प्रत्येकजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे की, सर्वात स्लिम आयफोन किती मजबूत आहे?
कंपनीने केलेला हा दावा खरा आहे का? स्लिम आयफोन खरंच जास्त मजबूती ऑफर करू शकतो का? असे अनेक प्रश्न युजर्सच्या मनात आहेत. याच सर्व प्रश्नांची उत्तर एका युट्यूबरने दिली आहेत. कंपनीने केलेल्या या दाव्याला तपासण्यासाठी अमेरिकन YouTuber JerryRigEverything ने तयारी सुरु केली. त्याने युट्यूब अकाऊंटवर यासंबंधित एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. (फोटो सौजन्य – youtube)
व्हिडीओद्वारे युजर्सना समजू शकणार आहे की, सर्वात स्लिम iPhone Air किती मजबूत आहे. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की बँड चाचणीत अॅपलचा सर्वात स्लिम स्मार्टफोन मजबूतीच्या चाचणीत किती यशस्वी झाला आहे. iPhone Air ची जाडी केवळ 5.6mm पातळ आहे. या आयफोनमध्ये कंपनीने 6.5-इंचाचा OLED डिस्प्ले दिला आहे, जो Corning Ceramic Shield 2 प्रोटेक्शनसह येतो. हे डिव्हाईस मागील आवृत्तीपेक्षा तीन पट जास्त स्क्रॅच रजिस्टेंट आहे.
ड्यूरेबिलिटी टेस्टबद्दल बोलयचं झालं तर YouTuber ने या फोनच्या डिस्प्ले समोर बराच वेळ लाइटर ठेवला होता. मात्र यानंतर फोनचा डिस्प्ले चेक केला असता, या पातळ आयफोनच्या डिस्प्लेवर कोणताही डॅमेज नव्हता. त्यानंतर त्याने बटणे, फ्रंट कॅमेरा सेन्सर आणि खालच्या स्पीकर ग्रिलवर स्क्रॅच केले. फोनच्या टायटॅनियम फ्रेमला काही स्क्रॅच आले होते, पण हा फोन सहजासहजी स्क्रॅच होत नाही. त्यामुळे स्क्रॅच प्रूफच्या बाबतीत स्लिम आयफोनने त्याची चाचणी उत्तमरित्या पूर्ण केली.
JerryRigEverything ने लेटेस्ट iPhone Air ला हाताने वाकवण्याचा प्रयत्न केला मात्र असं करणं शक्य झालं नाही. अॅपलने 2014 मध्ये iPhone 6 आणि iPhone 6 Plus ला स्लिम डिझाईनसह सादर केले होते. पण हे आयफोन खिशामध्येच वाकायचे. मात्र नुकताच लाँच करण्यात आलेला स्लिम आयफोन पूर्णपणे वेगळा आहे. तथापि, नवीन आयफोन एअरच्या बाबतीत असे नव्हते. नवीन फोन वाकवण्यासाठी मशीनने अंदाजे 130 पाउंड दाब दिला. Apple चा लेटेस्ट iPhone Air जाडीच्या बाबतीत कंपनीचा सर्वात पातळ आयफोन असला तरी देखील ड्यूरेबिलिटीच्या बाबतीत हा आयफोन युजर्सना अजिबात निराश करत नााही.