Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCAS कडून मुंबईमध्‍ये सीए मॅरेथॉनचे आयोजन; 1600 हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग

बीसीएएसकडून आर्थिक स्‍वावलंबन व उत्तम आरोग्‍याला चालना देण्‍यासाठी मुंबईमध्‍ये पहिल्‍यांदाच सीए मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बीसीएएस फाऊंडेशनतर्फे वंचित महिलांना शिलाई मशिन्‍स देऊ केल्‍या.

  • By नारायण परब
Updated On: Dec 23, 2024 | 08:37 PM
BCAS कडून मुंबईमध्‍ये सीए मॅरेथॉनचे आयोजन; 1600 हून अधिक स्पर्धकांनी घेतला सहभाग
Follow Us
Close
Follow Us:

बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी (बीसीएएस) (Bombay Chartered Accountants’ Society (BCAS)) ने आयोजित केलेल्‍या सी-थॉन (CA-THON) रनच्‍या पहिल्‍या एडिशनचे २२ डिसेंबर २०२४ रोजी मुंबईमध्‍ये यशस्‍वीरित्‍या समापन झाले, जेथे संपूर्ण शहरातून व शहराबाहेरून १६०० हून अधिक सहभागी दिसण्‍यात आले. ही मॅरेथॉन चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्ससाठी, तसेच १८ ते ७० वर्ष वयोगटातील सामान्‍य लोकांसाठी खुली होती.

ना-नफा तत्त्वावर आधारित उपक्रम सीए-थॉनचा आरोग्‍य व फिटनेसबाबत जागरूकतेचा प्रसार करण्‍याचा, तसेच आर्थिक स्‍वावलंबीत्व, नैतिक व्‍यवसाय पद्धती आणि समुदाय सहभागाला चालना देण्‍याच्‍या बीसीएएसच्‍या समान मूल्‍यांशी संलग्‍न राहण्‍याचा देखील मनसुबा होता. तसेच, बीसीएएस फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून समुदाय सहाय्य उपक्रमाने वंचित महिलांना त्‍यांच्‍या उदरनिर्वाहाला पाठिंबा देण्‍यासाठी आणि आर्थिकदृष्‍ट्या स्‍वावलंबी करण्‍यासाठी शिलाई मशिन्‍स देऊ केल्‍या.

भारतातील चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सची सर्वात मोठी व सर्वात जुनी स्‍वयंसेवी व्‍यावसायिक संस्‍था बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी (बीसीएएस) चार्टर्ड अकाऊंटण्‍सी क्षेत्रात शिक्षण, नेटवर्किंग आणि सर्वोत्तमता या मूल्‍यांना चालना देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे. १९४९ मध्‍ये स्‍थापना करण्‍यात आलेली बीसीएएस भारतातील ३५० हून अधिक शहरे व नगरांमध्‍ये कार्यरत आहे आणि सर्वोत्तम नियामक धोरणे व शासनाला समर्थन देण्‍यामध्‍ये प्रमुख भूमिका बजावते. बीसीएएसने नुकतेच व्‍यवसाय व व्‍यापक समुदायाप्रती उल्‍लेखनीय योगदानांच्‍या ७५ वर्षांनिमित्त अमृत महोत्‍सव साजरा केला.

या इव्‍हेण्‍टच्‍या यशाबाबत मत व्‍यक्‍त करत बीसीएएसचे अध्‍यक्ष सीए आनंद भाटिया म्‍हणाले, “२०२४ बीसीएएससाठी ७५वे सेलिब्रेटरी वर्ष असल्‍याने ऐतिहासिक वर्ष ठरले आहे. पहिल्‍यांदाच आयोजित करण्‍यात आलेल्‍या सीए-थॉनसह वर्षाची सांगता उत्‍साहवर्धक झाली आहे, जेथे देशाच्‍या कानाकोपऱ्यामधून व विविध वयोगटांमधील १६०० हून अधिक रनर्सचा सहभाग दिसण्‍यात आला. रनिंगसह सीए-थॉनने व्‍यक्‍तींच्‍या जीवनात आणि आमच्‍या समुदायामध्‍ये लहान बदल घडवून आणण्‍यासाठी ‘रनिंग फॉर ए कॉज’ तत्त्व अंगिकारले. यासारखे इव्‍हेण्‍ट्स चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सच्‍या सर्वांगीण विकासाप्रती योगदान देण्‍याच्‍या आणि परिसंस्‍थेमध्‍ये मोठ्या उद्देशाला चालना देण्‍याच्‍या आमच्‍या मिशनला अधिक दृढ करतात.”

बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी (बीसीएएस) (Bombay Chartered Accountants’ Society (BCAS))
बॉम्‍बे चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्स सोसायटी भारतातील चार्टर्ड अकाऊंटण्‍ट्सची सर्वात मोठी व सर्वात जुनी स्‍वयंसेवी व्‍यावसायिक संस्‍था आहे. भारतातील ३५० हून अधिक शहरे व नगरांमध्‍ये असलेल्‍या व्‍यापक सबस्‍क्राबरवर्गासह बीसीएएस १९४९ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून व्‍यवसायाच्‍या विकासाप्रती कटिबद्ध आहे. बीसीएएसचे आपल्‍या सदस्‍यांना बहुआयामी दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून विकास व प्रगतीसाठी व्‍यापक संधी देत व्‍यावसायिकांचा विकास करण्याचे मुलभूत मिशन आहे. या मिशनमध्‍ये लर्निंग इव्‍हेण्‍ट्स, संशोधन प्रकाशन, समर्थन, नेटवर्किंग आणि सामुदायिक उपक्रमांचा समावेश आहे. ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍था बीसीएएस शेकडो स्‍वयंसेवकांच्‍या समर्पित प्रयत्‍नांवर अवलंबून आहे, जे नि:स्‍वार्थपणे त्‍यांचा वेळ व कौशल्‍य देतात, तसेच सामायिक मूल्‍ये व व्‍यावसायिक नैतिकतेचे पालन करतात. अग्रगण्‍य विचारसरणी-प्रमुख व समुदाय सक्षमकर्ता बीसीएएस भारतातील अकाऊंटिंग, कर, फायनान्‍स आणि आर्थिक क्षेत्र प्रबळ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

बीसीएएस सेमिनार्स, वर्कशॉप्‍स, रिफ्रेशर कोर्सेस व स्‍टडी सर्कल्स असे विविध लर्निंग इव्‍हेण्‍ट्स आयोजित करत आपल्‍या सदस्‍यांच्‍या व्‍यावसायिक विकासाला चालना देते, तसेच त्‍यांना त्‍यांची कौशल्‍ये निपुण करण्‍यास आणि उद्योग ट्रेण्‍ड्सबाबत अपडेटेड राहण्‍यास प्‍लॅटफॉर्म देते. बीसीएएसचा संशोधन प्रकाशनांमध्‍ये अपवादात्‍मक ट्रॅक रेकॉर्ड आहे, जे प्रामुख्‍याने बीसीए जर्नल (बीसीएजे) मध्‍ये दिसून आले आहे. बीसीएजे पाच दशकांहून अधिक काळ प्रकाशनासह लोकप्रिय मासिक नियतकालिक आहे. बीसीएएसच्‍या राष्‍ट्रनिर्मितीप्रती व्‍यापक आऊटरिच उपक्रमाला नियामक व सरकारी अधिकाऱ्यांप्रती त्‍यांच्‍या व्‍यापक प्रतिनिधीत्‍वाचे पाठबळ आहे. बीसीएएसचा व्‍यावसायिक विकासाप्रती सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे, तसेच त्‍यांचे समुदाय-केंद्रित उपक्रम अधिक प्रबळ व शाश्‍वत भविष्‍याला सक्षम करत आहेत.

 

 

Web Title: Ca marathon was organized by bcas in which more than 1600 competitors participated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 08:37 PM

Topics:  

  • Marathon

संबंधित बातम्या

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!
1

ALIBAUG : अलिबागमध्ये ‘रेड रन’ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.