Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canara Bank Home Loan: 60 लाखांचे गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? 25 वर्षांसाठी EMI किती, जाणून घ्या

Canara Bank Home Loan: घरांच्या वाढत्या किमतींमुळे गृहकर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशातच कॅनरा बँकेकडून ६० लाख रुपयांचे गृहकर्ज २५ वर्षांसाठी घेतल्यास किती EMI भरावा लागेल, याचे गणित समजून घेणे महत्त्वाचे आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 17, 2026 | 11:38 AM
Canara Bank Home Loan: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Canara Bank Home Loan: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ६० लाखांच्या गृहकर्जाचा EMI किती?
  • २५ वर्षांसाठी कर्जाचा हप्ता जाणून घ्या.
  • व्याजदरानुसार EMI मध्ये मोठा फरक!

आजकाल घर घ्यायचं म्हटलं की सगळ्यांना कर्जच घ्यावं लागतं. कारण घराच्या किमती एवढ्या वाढल्यात की रोख पैशाने घर घेणं जवळपास अशक्यच झालंय. दरम्यान, मालमत्तेच्या वाढत्या किमतींमुळे परवडणाऱ्या कर्जांचा शोध वाढत आहे. घर महाग झालंय, म्हणून लोक स्वस्त कर्ज शोधतायत. Canara Bank Home Loan:

गृहकर्ज घेण्यापूर्वी लोक सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँकांनी देऊ केलेले व्याजदर तपासत आहेत. कर्ज घेण्याआधी लोक 4-5 बँकांमध्ये जाऊन विचारतात, कुठे व्याज कमी आहे? त्यानंतर ते त्यांना आकर्षक वाटेल आणि परवडणारे असेल असे कर्ज निवडण्याची योजना आखतात. जिथे व्याज कमी, EMI कमी, तिथूनच कर्ज घ्यायचं, असा सगळ्यांचा विचार असतो.

60 लाखाचं कर्ज, 25 वर्षांसाठी, EMI किती?

जर एखाद्याला 25 वर्षांसाठी 60 लाख रुपयांच्या गृहकर्जाची गरज असेल, तर त्यांना दरमहा किती ईएमआय / हप्ता भरावा लागेल. समजा 60 लाख रुपये कर्ज घेतलं, आणि ते 25 वर्षात फेडायचंय, तर महिन्याला किती हप्ता जाईल? हाच प्रश्न सगळ्यांना पडतो. यासाठी, आपण कॅनरा बँकेच्या गृहकर्जाचे उदाहरण घेऊया. आता गृहकर्जावर आकारल्या जाणाऱ्या वार्षिक व्याजदराची तपासणी करूया. तसेच, आपण कॅनरा बँकेकडून 25 वर्षांसाठी (300 महिने) घेतलेल्या 60 लाख रुपयांच्या गृहकर्जासाठी किमान आणि कमाल मासिक ईएमआयची देखील तपासणी करू.

Savings Account Service Charges: खातेदारांनो सावधान! ‘या’ बँकेने वाढवले सर्व्हिस चार्ज, १ डिसेंबरपासून नवे दर

कॅनरा बँक किती व्याज घेते?

कॅनरा बँक पात्र ग्राहकांना गृहकर्ज देते. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, ही बँक पगारदार आणि स्वयंरोजगारित अशा दोन्ही व्यक्तींना समान व्याजदराने गृहकर्ज देते. कॅनरा बँकेची एक चांगली गोष्ट म्हणजे, नोकरी करणारा असो की स्वतःचा व्यवसाय करणारा, दोघांनाही सारखंच व्याज लावते. आमचे भागीदार, ईटी वेल्थ (ET Wealth) यांच्या अहवालानुसार, कॅनरा बँक गृहकर्जावर किमान वार्षिक 7.50% व्याजदर आकारते, तर कमाल व्याजदर वार्षिक 10.25% आहे. म्हणजे कमीत कमी 7.50% व्याज, आणि जास्तीत जास्त 10.25% व्याज.

60 लाखांवर 25 वर्षात किती EMI?

आता आपण जाणून घेऊया की, जर कॅनरा बँकेने 60 लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर केले, तर 25 वर्षांत किती ईएमआय भरावा लागेल.
आता थेट हिशोब बघू. बँकेचा वार्षिक व्याजदर 7.50% ते 10.25% पर्यंत असला तरी, बँकेच्या परवडणाऱ्या किंवा महागड्या गृहकर्जाच्या ऑफर्स तुमच्या पात्रतेवर, क्रेडिट स्कोअरवर आणि इतर घटकांवर अवलंबून असतात.

बँक कर्ज रक्कम कालावधी व्याज दर महिन्याचा EMI एकूण व्याज एकूण भरावे लागणारे पैसे
कॅनरा बँक 60 लाख रुपये 25 वर्षे 7.50% 44,339 रुपये 73,01,841 रुपये 1,33,01,841 रुपये
कॅनरा बँक 60 लाख रुपये 25 वर्षे 10.25% 55,583 रुपये 1,06,74,899 रुपये 1,66,74,899 रुपये

बघा, व्याज जर 7.50% असेल, तर महिन्याला 44,339 रुपये EMI येईल. 25 वर्षात तुम्ही एकूण 73 लाख रुपये फक्त व्याज म्हणून देणार. आणि एकूण 1 कोटी 33 लाख रुपये भरावे लागतील.आणि जर व्याज 10.25% लागलं, तर EMI थेट 55,583 रुपये होईल. म्हणजे महिन्याला 11 हजार जास्त.

Share Market Today: शेअर बाजारात आज चढ-उताराचे संकेत; तज्ज्ञांनी दिला ‘या’ स्टॉक्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला

25 वर्षात व्याजच 1 कोटी 6 लाख होईल. एकूण 1 कोटी 66 लाख रुपये भरावे लागतील.म्हणजे 60 लाखाचं घर, पण 25 वर्षात जवळपास दुप्पट-तिप्पट पैसे जातात. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बँकेच्या गृहकर्जाचे व्याजदर वेळोवेळी बदलू शकतात. येथे दिलेले आकडे केवळ उदाहरणादाखल आहेत आणि ते अचूक मानले जाऊ नयेत. नवीनतम माहितीसाठी तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.व्याजदर कधीही बदलू शकतो, म्हणून कर्ज घेण्याआधी बँकेत जाऊन नक्की विचारून घ्या.

Web Title: Canara bank 60 lakh home loan emi for 25 years rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • Bank
  • Home loan
  • Interest rate
  • new home

संबंधित बातम्या

Savings Account Service Charges: खातेदारांनो सावधान! ‘या’ बँकेने वाढवले सर्व्हिस चार्ज, १ डिसेंबरपासून नवे दर
1

Savings Account Service Charges: खातेदारांनो सावधान! ‘या’ बँकेने वाढवले सर्व्हिस चार्ज, १ डिसेंबरपासून नवे दर

FD करणाऱ्यांसाठी खुशखबर! 10 लाख FD मध्ये गुंतवा, 400 दिवसांत ‘एवढी’ कमाई होणार? ‘या’ बॅंकेची  भन्नाट ऑफर
2

FD करणाऱ्यांसाठी खुशखबर! 10 लाख FD मध्ये गुंतवा, 400 दिवसांत ‘एवढी’ कमाई होणार? ‘या’ बॅंकेची भन्नाट ऑफर

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!
3

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर
4

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.