Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीने आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्नात 50 टक्के आणि निव्वळ नफ्यात 34 टक्के वाढ नोंदवली. पहिल्या सहामाहीत कंपनीचे उत्पन्न 134.37 कोटी रुपयांवर पोहोचले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 12, 2026 | 06:29 PM
NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या तिमाही उत्पन्नात 50 टक्के वाढ
  • निव्वळ नफा 13.21 कोटी रुपये
  • सहामाही उत्पन्नात 60 टक्क्यांची वाढ
 

डिजिटल बँकिंग आणि पेमेंट्स तंत्रज्ञान क्षेत्रातील नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड (NPST) कंपनीने आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी (NPST Q2 Results 2027 ) नोंदवली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नात वार्षिक आधारावर 50 टक्के, तर निव्वळ नफ्यात 34 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 60 टक्क्यांनी वाढून 134.37 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

कंपनीने 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे अलेखापरीक्षित एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यानुसार, दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 72.95 कोटी रुपये राहिले. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत हे उत्पन्न 48.68 कोटी रुपये होते. त्यात वार्षिक आधारावर 50 टक्के वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीतील 61.42 कोटी रुपयांच्या तुलनेतही उत्पन्नात 19 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

कामकाजातून मिळणारा महसूल वार्षिक 45 टक्के आणि तिमाही आधारावर 20 टक्क्यांनी वाढून 67.74 कोटी रुपयांवर पोहोचला. कंपनीचा एबिटा 15.99 कोटी रुपये राहिला असून, त्याचे मार्जिन 26.60 टक्के होते. एबिटामध्ये वार्षिक 17 टक्के आणि तिमाही आधारावर 15 टक्के वाढ झाली. करपूर्व नफाही वार्षिक 26 टक्क्यांनी वाढून 16.94 कोटी रुपये झाला.

निव्वळ नफा 13.21 कोटी रुपयांवर

दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 13.21 कोटी रुपये नोंदवण्यात आला. मागील वर्षी याच तिमाहीत तो 9.84 कोटी रुपये होता. त्यामुळे निव्वळ नफ्यात वार्षिक 34 टक्के वाढ झाली आहे. मागील तिमाहीतील 11.05 कोटी रुपयांच्या तुलनेतही नफ्यात 20 टक्के वाढ झाली.

या तिमाहीत कंपनीचा प्रति समभाग उत्पन्न (ईपीएस) 6.34 रुपये राहिला. मागील वर्षी याच कालावधीत तो 5 रुपये होता. त्यामुळे ईपीएसमध्ये वार्षिक 27 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

Zurich Kotak General Insurance: विमा वितरणाला डिजिटल बळ! झुरिच कोटक जनरल इन्शुरन्स आणि फटकसिक्युअरमध्ये महत्त्वपूर्ण करार

सहामाही उत्पन्नात 60 टक्क्यांची वाढ

आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने भरीव वाढ नोंदवली आहे. या कालावधीत एकूण उत्पन्न 134.37 कोटी रुपये झाले. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील 83.76 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 60 टक्के वाढ झाली आहे.

कामकाजातून मिळणारा महसूल 55 टक्क्यांनी वाढून 124.22 कोटी रुपये झाला. एबिटामध्ये 27 टक्के वाढ होऊन तो 29.84 कोटी रुपये, तर करपूर्व नफा 36 टक्क्यांनी वाढून 31.43 कोटी रुपये झाला. निव्वळ नफ्यातही 42 टक्के वाढ नोंदवण्यात आली असून, तो 24.26 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 17.06 कोटी रुपये होता. ईपीएस 8.70 रुपयांवरून वाढून 11.63 रुपये झाला.

Kia India News : किया इंडियाचा भारतात मोठा विस्तार; आंध्र प्रदेशात दुसरा उत्पादन प्रकल्प उभारणार; २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

जागतिक बाजारपेठेत विस्तारावर भर

या आर्थिक कामगिरीबाबत एनपीएसटीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चंद ठाकूर म्हणाले की, टीएसपी व्यवसायासाठी आखलेल्या धोरणाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. भारतासोबतच जागतिक बाजारपेठेतही कंपनी आपली उपस्थिती वाढवत आहे. डिजिटल पेमेंट्स आणि बँकिंग क्षेत्रातील वाढत्या संधी लक्षात घेता टीएसपी व्यवसायात आणखी विस्तार करण्याची अपेक्षा आहे.

‘बँक-इन-अ-बॉक्स’ हे सबस्क्रिप्शन आधारित मॉडेल विकसित करण्याच्या निर्णयामुळे लहान आणि मध्यम आकाराच्या बँकांसाठी मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच, रेगटेक क्षेत्रात डीपीडीपी अनुपालन आणि जोखीम इंटेलिजन्स क्षमता विकसित करण्यावरही कंपनीचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एनपीएसटीचे सहसंस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल यांनी सांगितले की, भारतातील डिजिटल व्यवहारांचे वाढते प्रमाण आणि सरकारचा डिजिटायझेशनवरील भर यामुळे पेमेंट तंत्रज्ञान कंपन्यांसाठी नवीन संधी निर्माण होत आहेत. ऑक्टोबर 2026 मध्ये यूपीआयद्वारे विक्रमी 25.47 अब्ज व्यवहार झाले असून, त्यात वार्षिक 23 टक्के वाढ झाली आहे.

डिजिटल व्यवहार वाढत असताना आर्थिक फसवणुकीचे धोकेही वाढत आहेत. त्यामुळे सुरक्षित पेमेंट व्यवस्था, फसवणूक प्रतिबंधक यंत्रणा आणि डेटा संरक्षण नियमांचे पालन महत्त्वाचे ठरत आहे. एनपीएसटी एकाच व्यासपीठावर पेमेंट पायाभूत सुविधा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फसवणूक नियंत्रण यंत्रणा उपलब्ध करून देत असून, यामुळे आर्थिक संस्थांना सुरक्षित डिजिटल व्यवहार वाढवण्यास मदत होत असल्याचे अग्रवाल यांनी नमूद केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एनपीएसटी कंपनीच्या दुसऱ्या तिमाहीतील एकूण उत्पन्नात किती वाढ झाली?

    Ans: आर्थिक वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या एकूण उत्पन्नात वार्षिक 50 टक्के वाढ झाली असून, ते 72.95 कोटी रुपये झाले.

  • Que: एनपीएसटीचा दुसऱ्या तिमाहीतील निव्वळ नफा किती आहे?

    Ans: कंपनीचा निव्वळ नफा 13.21 कोटी रुपये असून, त्यात वार्षिक 34 टक्के वाढ झाली आहे.

  • Que: आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीतील उत्पन्न किती आहे?

    Ans: पहिल्या सहामाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 134.37 कोटी रुपये झाले असून, त्यात वार्षिक 60 टक्के वाढ झाली आहे.

Web Title: Npst q2 results 2027 net profit revenue growth rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Bank
  • cyber crime
  • UPI

संबंधित बातम्या

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ
1

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ

UPI Payment Charges Update : दिवाळीनंतर UPI युजर्सना मोठा धक्का? 2000 रुपयांपेक्षा जास्तच्या पेमेंटवर लागणार चार्ज?
2

UPI Payment Charges Update : दिवाळीनंतर UPI युजर्सना मोठा धक्का? 2000 रुपयांपेक्षा जास्तच्या पेमेंटवर लागणार चार्ज?

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
3

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Paraguay Crisis : ‘आमचे पैसे परत द्या!’ बँकिंग संकटामुळे पॅराग्वे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती; राष्ट्रपतींना सोडावे लागले पद
4

Paraguay Crisis : ‘आमचे पैसे परत द्या!’ बँकिंग संकटामुळे पॅराग्वे देशात आणीबाणीसारखी परिस्थिती; राष्ट्रपतींना सोडावे लागले पद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.