Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 14 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bank: एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

ST Bank: एसटी बँकेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या अपघाती विमा पॉलिसीच्या नूतनीकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे. २०२६-२७ या वर्षासाठी झुनो जनरल इन्शुरन्स कंपनीला कोणतीही ई-निविदा प्रक्रिया न राबवता ५ कोटी ९६ लाख ४९ हजार ७१० रुपये देण्यात आल्याचा आरोप....

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 14, 2026 | 12:49 PM
एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

एसटी बँकेच्या अपघाती विमा पॉलिसीत गैरव्यवहाराचा संशय; ५.९६ कोटींच्या व्यवहाराची चौकशी करण्याची श्रीरंग बरगे यांची मागणी!

Follow Us
Follow Us:
  • ६२ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या विम्यासाठी तब्बल ५.९६ कोटी रुपये
  • झुनो इन्शुरन्सला मुदतवाढ देताना नियम धाब्यावर?
  • सभासदांच्या पैशांवर डल्ला?
ST Bank: एसटी बँकेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या अपघाती विमा पॉलिसीच्या नूतनीकरणावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या विमा योजनेत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला आहे. विमा पॉलिसीचे नूतनीकरण करताना नियम आणि अटींचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे.(ST Bank )

५.९६ कोटींचा विमा प्रीमियम; ई-निविदा प्रक्रिया कुठे?

एसटी बँकेच्या सभासद कर्मचाऱ्यांसाठी २०२६-२७ या कालावधीतील अपघाती विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यासाठी झुनो जनरल इन्शुरन्स लिमिटेड या कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. मात्र, ही मुदतवाढ देताना नियम, अटी आणि शर्तींचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे, यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. रटीजीएसच्या माध्यमातून विमा कंपनीला तब्बल ५ कोटी ९६ लाख ४९ हजार ७१० रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम अवाजवी असून, कमिशनच्या संशयास्पद व्यवहारासाठी एवढा मोठा खर्च करण्यात आल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे.

ST News : NCMC कार्डचा घोळ? पैसे कट, पण तिकीट निघेना; श्रीरंग बरगेंची चौकशीची मागणी

सभासदांच्या खिशाला कात्री!

एसटी बँकेची अपघाती विमा योजना सभासदांसाठी उपयुक्त असली, तरी या योजनेचा आर्थिक भार कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचे बरगे यांनी निदर्शनास आणले आहे. विमा हप्त्यापैकी ७५ टक्के रक्कम सभासदांच्या रुपया निधी खात्यातून वजा केली जाते, तर उर्वरित २५ टक्के रक्कम बँकेकडून भरली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्याच पैशातून विमा योजनेचा मोठा खर्च केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याउलट, सभासदांना मिळणाऱ्या अपघाती विम्याची रक्कम वाढवून २५ लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

६२ हजार सभासदांसाठी विमा योजना

एसटी बँकेचे राज्यभरात सुमारे ६२ हजार सभासद आहेत. या योजनेनुसार एखाद्या सभासदाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाते. बरगे यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी सरासरी सुमारे १० सभासदांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांच्या आसपास विमा क्लेम झाला होता.

मात्र, यंदा त्याच विमा योजनेच्या नूतनीकरणासाठी तब्बल ५.९६ कोटी रुपयांचा प्रीमियम भरला जात असल्याने त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. विम्याचा हप्ता ठरवताना केवळ एका वर्षातील आकडेवारी विचारात न घेता तीन वर्षांची सरासरी विचारात घेणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरवर्षी साधारण १५ अपघाती मृत्यू गृहीत धरून त्यानुसार विमा प्रीमियम निश्चित करायला हवा होता, असेही त्यांनी म्हटले आहे.

सहकार विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार

झुनो जनरल इन्शुरन्स कंपनीला एवढी मोठी रक्कम का देण्यात आली? हा निर्णय कोणी घेतला? विमा पॉलिसीला मुदतवाढ देताना निविदा प्रक्रिया का राबवण्यात आली नाही? असे सवाल श्रीरंग बरगे यांनी उपस्थित केले आहेत. सभासदांच्या कष्टाच्या पैशातून चालणाऱ्या बँकेत अशा प्रकारचा संशयास्पद व्यवहार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहकार विभाग आणि पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला पत्र देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दरम्यान, विमा प्रीमियमची रक्कम, निविदा प्रक्रिया आणि कंपनीला दिलेल्या मुदतवाढीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या आरोपांवर संबंधित बँक प्रशासन आणि विमा कंपनीची अधिकृत बाजू उपलब्ध झालेली नाही.

ST Bank Investigation : एसटी बँकेतील कथित गैरव्यवहारांची चौकशी; सहकार विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई, नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: एसटी बँकेच्या विमा पॉलिसीत किती रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे?

    Ans: २०२६-२७ या वर्षासाठी अपघाती विमा पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी ५ कोटी ९६ लाख ४९ हजार ७१० रुपये देण्यात आले आहेत. या रकमेवरून गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

  • Que: एसटी बँकेच्या विमा पॉलिसीबाबत श्रीरंग बरगे यांनी कोणते आरोप केले आहेत?

    Ans: विमा पॉलिसीला मुदतवाढ देताना ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात आली नाही. तसेच अवाजवी प्रीमियम देऊन कमिशनचा व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

  • Que: या प्रकरणाची चौकशी कुठे करण्याची मागणी करण्यात आली आहे?

    Ans: सहकार विभाग आणि पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देऊन या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: St bank accident insurance policy irregularities shrirang barge demands probe sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Bank
  • Shrirang Barge
  • ST Employees

संबंधित बातम्या

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर
1

NPST Q2 Results 2027 : एनपीएसटीच्या नफ्यात 34 टक्क्यांची झेप; सहामाही उत्पन्न 134 कोटींवर

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ
2

Banking Sector Mass Layoffs : अरे देवा… बँकांमधील नोकऱ्यांवरही AI ची टांगती तलवार! तब्बल 70% काम यंत्र करणार; अहवालाने खळबळ

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स
3

Bank Job: बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे का? परीक्षा क्रॅक करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.