Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Canva Massive Layoffs : Tech जगतात खळबळ! Canva चा मोठा झटका… तब्बल 1200 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Canva Massive Layoffs : लोकप्रिय ग्राफिक डिझाईन प्लॅटफॉर्म कॅनव्हाने कंपनीत मोठ्या प्रमाणावर Layoffs ची तयारी केली असून, यामुळे १,२०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 04, 2026 | 01:23 PM
1200 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात ( सौजन्य - सोशल मीडिया )

1200 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • Tech जगतात खळबळ!
  • Canva चा मोठा झटका…
  • 1200 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
Canva Massive Layoffs : टेक कंपन्यांमध्ये सध्या खळबळ माजली आहे. नोकरकपात हा मुद्दा प्रत्येक सध्या बराच चर्चेत आहे. त्याच जगातील सर्वात लोकप्रिय डिझाइन प्लॅटफॉर्म असलेल्या कॅनव्हा कंपनीने आपली कर्मचारी संख्या कमी करण्याचा आणि काही कर्मचाऱ्यांची बदल करण्यासंदर्भात मोठा निर्णय घेण्याचा तयारीत आहे. या निर्णयाचा परिणाम 1200 हून अधिक कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. ( Canva Massive Layoffs ) 

Share Market Today: शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक लागणार? सेन्सेक्स-निफ्टीबाबत तज्ज्ञांनी दिले मोठे संकेत

टेक्नॉलॉजीचा परिणाम म्हणून काय गेले वर्ष कॅनव्हासाठी बरंच आव्हानात्मक राहिलं आहे. यामुळेच कंपनीने आपल्या कामकाजात आणि संघटनात्मक रचनेत बदल करणअयाच्या दिशेने पुढे पाऊलं उचलली आहेत. या निर्णयामुळे चर्चांना उधाण आलं आहे त्यात तंत्रज्ञान उद्योगातील नोकरीच्या स्थिरतेबद्दल पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.

कंपनीच्या काम करण्याच्या पद्धतीत होणार बदल

Canva आता आपल्या संघटनात्मक रचनेत बदल करत ती आणखी सुलभ करण्याची योजना आखत आहे. यामुळे त्याचे प्रॉडक्ट, ग्रोथ आणि प्लॅटफॉर्म विभाग एकाच प्रॉडक्ट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे सगळे बदल करणार आहे. विविध टीम्समधील समन्वय सुधारणे आणि निर्णय प्रक्रियेला गती देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, कंपनी अधिक मर्यादित विशेष पदांचे अधिक व्यापक भूमिकांमध्ये रूपांतर करण्यावर आणि व्यवस्थापनाचे स्तर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रकल्पाच्या सुरुवातीपासून ते पूर्ण होईपर्यंत अधिक जबाबदारी सोपवली जाईल.

निर्णयाचा परिणाम तब्बल 1271 कर्मचाऱ्यांवर

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या बदलाचा परिणाम एकूण १,२७१ कर्मचाऱ्यांवर होणार आहे. जे कॅनव्हाच्या जागतिक कर्मचारी संख्येच्या अंदाजे २२% आहे. पण, या सर्व कर्मचाऱ्यांची नोकरी जाणार नाही. काहींच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल केला जाईल, तर इतरांना कंपनीच्या नियुक्त कार्यालयांमध्ये स्थलांतरित होण्यास सांगितले जाऊ शकते. काही कर्मचाऱ्यांना संस्था सोडावी लागेल.

कॅनव्हाच्या सह-संस्थापक आणि सीईओ मेलानी पर्किन्स यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या संदेशात या निर्णयाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी कबूल केले की, कंपनीच्या १३ वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात कठीण काळ आहे. त्यांच्या मते, या बदलापूर्वी संस्थेने अनेक पर्यायांचा विचार केला होता, परंतु सध्याच्या परिस्थितीत छोटे बदल पुरेसे नव्हते.

कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक सहयोग

कंपनीने नोकरी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एका सहाय्य पॅकेजची घोषणाही केली आहे. यामध्ये किमान सहा महिन्यांचा पगार देण्याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, करिअर आणि आरोग्यविषयक सहाय्य देखील पुरवले जाईल. कॅनव्हाने आपल्या अधिकृत निवेदनात कर्मचारी कपातीचे कारण म्हणून थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख केला नाही, परंतु नवीन तंत्रज्ञान डिझाइन आणि सॉफ्टवेअर उद्योगांमध्ये वेगाने बदल घडवत आहे. त्यामुळे, भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी आपल्या कार्यप्रवाहात आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकांमध्ये बदल करू पाहत आहे.

Food Inflation In India : महागाईचा मोठा फटका! साखरेच्या दरात 30% वाढ; धान्यापासून दूध आणि चिकनही महागलं

💡

Frequently Asked Questions

  • Que: Canva कंपनीने किती कर्मचाऱ्यांवर छंटनीची टांगती तलवार आणली आहे?

    Ans: कॅनव्हा कंपनीकडून तब्बल १,२०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची तयारी सुरू आहे.

  • Que: मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यामागचे मुख्य कारण काय आहे?

    Ans: कंपनीची अंतर्गत पुनर्रचना, व्यावसायिक रणनीतीमधील बदल आणि जागतिक आर्थिक परिस्थिती हे यामागचे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: निर्णयाचा कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे?

    Ans: कंपनीच्या वेगवेगळ्या विभागांमधील आणि विविध देशांतील कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर या जागतिक छंटनीचा परिणाम होणार आहे.

Web Title: Canva massive layoffs 1200 employees job cuts marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • layoffs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.