Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! कांदा, बासमती तादुंळावरील ‘हे’ निर्बंध काढण्यात आले

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कांदा आणि बासमती तादुंळावरील निर्बंध काढण्यात आले आहे.DGFT ( Directorate General of Foreign Trade) द्वारे या निर्णयाची अधिसूचना जारी केली गेली आहे. येणाऱ्या विविध राज्यातील विधासभेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेल्याचे मानले जात आहे.

  • By नारायण परब
Updated On: Sep 13, 2024 | 11:32 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

काही काळापूर्वी भारत सरकारने  कांदा आणि तांदळाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी  किमान निर्यात किंमतीवर निर्बंध लादले होते. ते निर्बंध आता काढण्यात आले आहेत. या निर्णयामुळे कांदा आणि बासमती तांदुळाच्या निर्यातीला वाढ होणार आहे तसेच शेतकऱ्यांना यावर अधिक दर मिळू शकणार आहे. DGFT ( Directorate General of Foreign Trade) द्वारे आज दि. 13 सप्टेंबर 2024  रोजी एक अधिसूचना जारी करण्यात आली ज्यामध्ये किमान निर्यात किंमत काढून टाकल्याची घोषणा केली.

देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र सरकारने कांद्याची किमान निर्यात किंमत ही  550 डॉलर प्रति टन निश्चित केली होती. तर, बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत ही 950 डॉलर प्रति टन निश्चित करण्यात आली होती. यापेक्षा कमी दराने कांदा आणि बासमती तांदूळ परदेशात पाठवता येत नव्हता. त्यामुळे आतंरराष्ट्रीय बाजारपेठेतील निर्यातीवर याचा थेट परिणाम झाला होता. लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या पावसाळ्यामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ होण्याची भीती सरकारला वाटत होती.

हे देखील वाचा- आनंदाची बातमी ! शेतकऱ्यांना यंदा एफआरपीपेक्षा मिळणार अधिकची रक्कम

राज्यांच्या विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन निर्णय 

येत्या काळात  महाराष्ट्र आणि हरियाणा आणि इतर राज्यांमध्ये निवडणूका आहेत या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र, हरयाणा या राज्यातील कृषी क्षेत्र अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे त्यामुळे   या निर्णयामुळे तेथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  महाराष्ट्रामध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. नाशिक पट्टा तर कांद्याचा प्रमुख उत्पादक आहे. लोकसभेच्या निवडणूकीत या निर्बंधाचा परिणाम झाल्याचे बोलले गेले होते. यापूर्वी कांदा आणि बासमती तांदळाच्या निर्यातीवरही बंदी घालण्यात आली होती. ही बंदी उठवताना सरकारने किमान निर्यात मूल्याचा अडथळा आणला होता.

हे देखील वाचा- महायुतीमध्ये श्रेयवादाची चढाओढ कायम? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ण नाव घेण्याच्या सूचना

गहू साठ्यावरील मर्याद, वाढते दर कमी करण्याचा प्रयत्न

सर्वात महत्वाचे धान्य असलेल्या गव्हाच्या साठ्यावरील मर्यादा सरकारने कमी केली आहे. त्यामुळे आता व्यापाऱ्यांना फक्त 2000 मेट्रिक टन गव्हाचा साठा करता येणार आहे. या अगोदर ही मर्यादा 3000 मेट्रिक टन होती. सध्या गव्हाचे दर हे 2700 रुपये प्रति क्विंटल पोहचले आहेत. ते कमी करण्यासाठी सरकारकडून  प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: Central governments big announcement for farmers export restriction on onion basmati rice was lifted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 11:32 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.