Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Central Govt Employeesच्या DA Hike मध्ये होणार मोठी वाढ? जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी

Central Govt Employees DA Hike : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी DA Hike बाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या सुधारित महागाई भत्त्याच्या दरांवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी केली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 27, 2026 | 11:56 AM
जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी ( सौजन्य - सोशल मीडिया )

जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • DA Hike मध्ये होणार मोठी वाढ?
  • जुलै 2026 च्या सुधारित दरांवर तात्काळ निर्णयाची मागणी
  • युनियनच्या पत्रात नेमकं काय?
Central Govt Employees DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सध्या प्रतिक्षा आहे ती म्हणजे महागाई भत्त्याबाबत गोड बातमी येण्याची. यावर सगळ्यांच्या नजरा टिकून राहिल्या असताना एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या सुधारित महागाई भत्त्याच्या दरांवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी केली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार महासंघाने अर्थ मंत्रालयाला १ जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता DA आणि महागाई सवलत DR मधील पुढील दरवाढीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ( Central Govt Employees DA Hike ) 

EPF Claim : तुमच्याशी थेट वरिष्ठ अधिकारी बोलणार… PF चे पैसे अडकलेत, क्लेम रिजेक्ट झालाय? मग 28 तारखेला या ठिकाणी होईल काम

एका वृत्तसंस्थेनुसार, खर्च विभागाच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात, कर्मचारी संघटनेने ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे असेही म्हटले आहे की, संबंधित ग्राहक किंमत निर्देशांक CPI आकडेवारी आणि स्थापित सूत्राच्या आधारे नवीन दर निश्चित झाल्यावर ते सक्षम प्राधिकरणासमोर सादर केले पाहिजेत.

वाढत्या किमतींचा सततचा परिणाम

युनियनने स्पष्ट केलं की जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणजे DA आणि DR चा सध्याचा दर 60% इतका आहे. हा दर जुलै 2023 मधील 46% वरुन जानेवारी 2024 मध्ये 50%, तर जुलै 2024 मध्ये 53 %, जानेवारी 2025 मध्ये 55 %, जुलै 2025 मध्ये 58% आणि जानेवारी 2026 पासून 60% पर्यंत वाढला आहे. त्यांनी सांगितलं की, ही 60% वाढ वाढत्या किमतींचा सततचा परिणाम दर्शवते.

प्रक्रिया विनाकारण विलंब न लावता पूर्ण करा

युनियनने सांगितले की, त्यांची मागणी कोणत्याही आगाऊ रकमेसाठी किंवा अतिरिक्त लाभांसाठी नाही, तर १ जुलै २०२६ पासून देय असलेल्या हप्त्याशी संबंधित औपचारिक प्रक्रिया विनाकारण विलंब न लावता पूर्ण करण्याची आहे. त्यांनी सांगितले की, यानंतर थकबाकी आणि पगाराचे वाटप नेहमीप्रमाणे करता येईल. युनियनने शिक्षण, घरगुती गरजा, प्रवास आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांवरील वाढलेल्या खर्चाचाही उल्लेख केला, विशेषतः सणासुदीचा काळ जवळ येत असल्याने याकडे विशेष लक्ष्य द्यावा असं प्रकर्षाने मांडण्यात आलं आहे.

पत्रात युनियनच्या मागण्या

युनियनचे सरचिटणीस एम. एस. वेंकटेशन यांच्या स्वाक्षरीने लिहिलेल्या या पत्रात, संबंधित अधिकाऱ्यांना पुढील महागाई भत्ता/महागाई सवलत (DA/DR) हप्ता लवकरात लवकर जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या पत्रात युनियनच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. ही जुलै २०२६ साठीच्या महागाई भत्ता/घट भत्ता दराची सरकारी घोषणा नाही.

काय सांगता… आता नवीन गॅस कनेक्शन मिळणार नाही? e-KYC न केल्यामुळे LPG लाभार्थ्यांची संख्या घटली

Web Title: Central govt employees demand quick decision on july 2026 da hike marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 11:56 AM

Topics:  

  • central government employee
  • Dearness Allowance
  • Salary Hike

संबंधित बातम्या

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या
1

RAW vs IB Chief Salary : देशाच्या सुरक्षेची धुरा सांभाळणाऱ्या गुप्तचर प्रमुखांची सॅलरी किती? जाणून घ्या

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट
2

8th Pay Commission 2026: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर? फिटमेंट फॅक्टर अन् HRAवर महत्त्वाची अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.