आयकराच्या नियमात बदल
31 जुलै 2024 ही आयटीआर भरण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. अशातच आता आयकराच्या संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आल आहे. त्यामुळे आता करदाते म्हणून तुम्हाला याबाबत संपूर्ण माहिती असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे आता तुम्हीही 31 जुलै पूर्वी आयटीआर भरणार असाल तर या नियमांबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. ज्यामुळे तुमचा कर परतावा थांबवला जाण्यास मदत होणार आहे.
नियमांकडे दुर्लक्ष केल्यास होईल नुकसान
बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, ऑल इंडिया आयटीआरचे संचालक विकास दहिया यांनी म्हटले आहे की, आयकराच्या संबंधित बदललेलया नियमांकडे दुर्लक्ष केल्यास, तुमच्या आयकर परताव्यावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, आयकराच्या संबंधित बदल हे तुमच्या आयटीआरवर देखील परिणाम करू शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे.
कर स्लॅब आणि दरात बदल
2024 मध्ये केंद्र सरकारने पर्यायी नवीन कर प्रणालीअंतर्गत नवीन कर स्लॅब सादर केले आहेत. ज्यामध्ये तुम्ही कोणत्याही सूट आणि कपातीशिवाय कमी कर दर ठेऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास, तुम्हाला त्यात विविध कपात आणि सवलतींमध्ये सूट मिळू शकते. मात्र, नवीन कर प्रणाली प्रक्रिया सुलभ ठरणार आहे. मात्र, यामुळे एक नुकसान देखील होणार असून, ज्यातून अनेक कपाती संपणार आहे. त्यामुळे तुम्ही आढावा घेऊन आपल्यासाठी कोणती करप्रणाली अधिक फायदेशीर आहे? याबाबत समजून घेऊ शकतात.
(फोटो सौजन्य : istock)
गृहकर्जाच्या व्याजावर जास्त सूट
प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी कलम 80 ईईएअंतर्गत घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजासाठी 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त कपात करण्यात आली आहे. नवीन गृहकर्जासह करदात्यांना पुरेसा सवलत देणे हा त्यामागील उद्देश आहे.
पेन्शनधारकांसाठीची कपात
निवृत्तीनंतर ज्या लोकांना पेन्शन मिळते. अशा पेन्शनधारकांसाठी 50,000 रुपयांची मानक कपात सुरू करण्यात आली आहे. ही पेन्शन पगारावर लागू होते, ज्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांच्याकडे फक्त पेन्शन आणि व्याजाचे उत्पन्न आहे. त्यांना आयटीआर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. परंतु, बँक आवश्यक कर कापते. यामुळे थेट उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कराचा बोजा कमी होणार आहे.