Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लुब्रिझोलने औरंगाबादमध्ये खरेदी केली 120 एकर जमीन; उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट!

लुब्रिझोल कॉर्पोरेशनचा औरंगाबाद येथील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, हा प्लांट कंपनीची जागतिक स्तरावर दुसरी सर्वात मोठी उत्पादन सुविधा आणि भारतातील सर्वात मोठी उत्पादन सुविधा असणार आहे. पुढील काही वर्षे हे बांधकाम टप्प्याटप्प्याने सुरू राहील आणि भविष्यात त्याचा विस्तार केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 30, 2024 | 06:28 PM
लुब्रिझोलने औरंगाबादमध्ये खरेदी केली 120 एकर जमीन; उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट!

लुब्रिझोलने औरंगाबादमध्ये खरेदी केली 120 एकर जमीन; उभारणार जागतिक दर्जाचा प्लांट!

Follow Us
Close
Follow Us:

स्पेशॅलिटी केमिकल्समध्ये अग्रगण्य असलेल्या लुब्रिझोल कॉर्पोरेशनने आज (ता.३०) औरंगाबाद येथे 120 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्याची घोषणा केली. या क्षेत्राच्या वाढत्या वाहतूक आणि इंडस्ट्रियल फ्लुइड मार्केटला पाठिंबा देण्यासाठी एक नवीन उत्पादन सुविधा उभारण्याची त्यांची योजना आहे. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अंदाजे 200 मिलियन डॉलर्स गुंतवणुकीचा समावेश आहे. जी कंपनीची भारतात आजपर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे.

उज्ज्वल भविष्यासाठी कंपनीची गुंतवणूक

याबाबत बोलताना लुब्रिझोल कंपनीचे अध्यक्ष फ्लॅव्हियो क्लिगर यांनी सांगितले आहे की, “लुब्रिझोलने भारतात पाच दशकांहून अधिक काळ अर्थपूर्ण गुंतवणूक केली आहे. ही नवीन अत्याधुनिक उत्पादन सुविधा कंपनीला भविष्यात इतर लुब्रिझोल व्यवसायांना आणि क्षेत्राना पाठिंबा देण्याच्या क्षमतेसह, कंपनीच्या ॲडिटीव्स व्यवसायासाठी स्थानिक क्षमता आणि योग्यता वाढवण्यास मदत करेल.” असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!

“ल्युब्रिझोलला, भारत-आधारित उत्पादनापासून ते प्रादेशिक नवकल्पना आणि लोकल टॅलेंटमध्ये सतत गुंतवणूक करण्याचे महत्त्व समजले आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसोबत भागीदारी करणे आणि विकासासाठी आणि प्रेरणादायी यशासाठी उत्प्रेरक म्हणून काम करण्यास उत्सुक आहोत.” असे लुब्रिझोल आयएमईएच्या मॅनेजिंग डायरेक्टर भावना बिंद्रा यांनी म्हटले आहे.

भागीदार, ग्राहकांप्रती वचनबद्धता

“ही घोषणा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी, आमचे भागीदार आणि आमच्या क्षेत्रातील आमच्या ग्राहकांप्रती कायम असलेली वचनबद्धता अधोरेखित करते. भारतातील वाढती वाहतूक आणि औद्योगिक बाजारपेठ ही एक मोठी संधी आहे आणि लुब्रिझोल या उद्योगांच्या उज्ज्वल भविष्याचा एक भाग बनल्याबद्दल आनंदी आहे.” असे लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वाइस प्रेसिडेंट नितीन मेंगी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : भारतीय कंपन्यांसाठी खुशखबर..! ऑफिस रेंट संदर्भात महत्वाची बातमी समोर, वाचा… सविस्तर!

2023 मध्ये लुब्रिझोलने गुजरातमधील विलायत येथे जगातील सर्वात मोठ्या सीपीव्हीसी रेझिन प्लांट उभारण्यासाठी, दहेज येथील लुब्रिझोलची साइट क्षमता दुप्पट करण्यासाठी नवी मुंबईत ग्रीस लॅब उघडण्यासाठी आणि देशांतर्गत अतिरिक्त रोजगार वाढ आणि नवकल्पना सक्षम करण्यासाठी आपल्या 50 वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या इतिहासात या क्षेत्रातील 150 दशलक्ष अमेरीकी डॉलर इतकी महत्त्वपूर्ण गुंतवणूकीची घोषणा केली. या व्यतिरिक्त, या वर्षी कंपनीने या क्षेत्रातील विकासाला गती देण्यासाठी आणि ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील जवळचे सहकार्य सक्षम करण्यासाठी एक स्ट्रॅटेजिक हब म्हणून आपले पहिले ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पुण्यात उघडले आहे.

Web Title: Chhatrpati sambhaji nagar news lubrizol purchased 120 acres of land in aurangabad will build a world class plant

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 05:48 PM

Topics:  

  • maharashtra news
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
2

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
4

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.