
वाई-पाचगणी मार्गावर धुळीचं साम्राज्य (फोटो सौजन्य - बाळू कदम)
ठेकेदाराचा निष्काळजीपणा आणि संबंधित प्रशासनाचे संशयास्पद मौन यामुळे वाईकरांना रोज धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा विकास आहे की नागरिकांच्या जिवाशी सुरू असलेला खेळ, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे गेल्या अनेक महिन्यापासून या रस्त्याचे काम रखडले आहे. रस्ता खोदून त्यावर मुरूम आणि सिमेंटमिश्रित साहित्य टाकून ठेवण्यात आले आहे. मात्र, पुढील काम पूर्ण करण्याची ठेकेदाराला घाई नसल्याचे चित्र आहे.
या मार्गावरून एखादे वाहन गेले की धुळीचे मोठमोठे लोट हवेत पसरतात. परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दुकानदार आणि दुचाकीस्वारांना या धुळीचा सामना करावा लागत आहे. श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि आरोग्याच्या अन्य समस्या निर्माण होण्याची भीती आहे. एवढे होऊनही धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित पाणी मारण्याची साधी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही, ही बाब संतापजनक आहे.
रस्त्यापेक्षा दोन फूट उंच गटार नियोजनाचा नेमका पत्ता कुठे या कामातील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याच्या पातळीपेक्षा तब्बल दोन फूट उंचीवर गटार बांधण्यात आल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. रस्त्यापेक्षा गटारच उंच असेल तर पावसाचे पाणी वाहून जाणार कसे? उलट पाणी दुकानांमध्ये आणि घरांमध्ये शिरण्याची वेळ आली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? काम सुरू असतानाच अशा मूलभूत त्रुटींकडे लक्ष दिले जात नसेल, तर या कामाच्या दर्जाची तपासणी कोण करणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
Satara Forest Department: उसाच्या फडात सापडले बिबट्याचे २ बछडे! वन विभागाने घडवली आईशी भेट
वाई हे पाचगणी आणि महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. मात्र, याच मार्गाची दुरवस्था पर्यटकांच्या स्वागताला उभी ठाकली आहे. रस्त्यावरील धूळ, अडथळे आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे हॉटेल, टपऱ्या, किराणा दुकाने आणि इतर व्यावसायिकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
धुळीमुळे ग्राहक दुकानांकडे फिरकत नसल्याने अनेक व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. पर्यटकांनी वाईत थांबायचे की धुळीचा त्रास टाळण्यासाठी दुसरा मार्ग धरायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.ग्राहक पंचायतीचा आंदोलनाचा इशारा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
‘रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी नियमित पाणी मारावे आणि गटाराची उंची योग्य करून पावसाच्या पाण्याचा निचरा होईल, याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या आरोग्याशी आणि व्यावसायिकांच्या उदरनिर्वाहाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास ग्राहक पंचायतीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,’ असा इशारा सतीश जेबले, ग्राहक पंचायत, वाई यांनी दिला आहे.
आता प्रश्न एवढाच आहे की, प्रशासनाला नागरिकांचा त्रास दिसत नाही की ठेकेदाराच्या कामातील त्रुटींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? रस्त्याचे काम पूर्ण होण्याची आणखी किती दिवस वाट पाहायची? नागरिकांच्या आरोग्याचा आणि व्यावसायिकांच्या नुकसानीचा हिशेब कोण देणार संबंधित विभागाने तातडीने जागे होऊन कामाचा दर्जा तपासावा आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी वाईकरांमधून होत आहे.
Ans: रस्त्याच्या कामादरम्यान धूळ नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजना होत नसल्याने या मार्गावर धुळीचा त्रास वाढल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे
Ans: या मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि पादचारी यांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे
Ans: धूळ नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करणे, कामाच्या दर्जाची तपासणी करणे आणि ठेकेदाराला आवश्यक निर्देश देणे अपेक्षित आहे. प्रशासनाची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर ती समाविष्ट करावी