Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

December Deadline: ३१ डिसेंबरपूर्वी उरका ‘ही’ ३ महत्त्वाची कामे; अन्यथा १ जानेवारीपासून बसणार मोठा आर्थिक फटका

३१ डिसेंबर २०२५ पूर्वी पॅन-आधार लिंक करणे, गाडीला HSRP प्लेट लावणे आणि लाडकी बहीण योजनेचे e-KYC पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा नवीन वर्षात तुम्हाला मोठा दंड किंवा आर्थिक नुकसान सोसावे लागेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 24, 2025 | 06:42 PM
३१ डिसेंबरपूर्वी उरका 'ही' ३ महत्त्वाची कामे (Photo Credit- X)

३१ डिसेंबरपूर्वी उरका 'ही' ३ महत्त्वाची कामे (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • डेडलाईन अलर्ट!
  • अवघे काही दिवस शिल्लक
  • या’ ३ कामांकडे दुर्लक्ष केल्यास होईल मोठे नुकसान
Financial Deadlines December 2025: वर्ष २०२५ संपायला आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी सर्वसामान्यांना काही महत्त्वाची कायदेशीर आणि आर्थिक कामे पूर्ण करावी लागणार आहेत. जर तुम्ही ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ही कामे पूर्ण केली नाहीत, तर १ जानेवारी २०२६ पासून तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो किंवा सरकारी योजनांचे लाभ कायमचे बंद होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया

कोणती आहेत ही ३ महत्त्वाची कामे:

१. वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य

महाराष्ट्र परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व वाहनांना HSRP (High-Security Registration Plate) बसवणे अनिवार्य केले आहे. याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर नवीन वर्षात तुमच्या गाडीला ही नंबर प्लेट नसेल, तर वाहतूक पोलिसांकडून १,००० ते ५,००० रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

  • कसे करावे? वाहन मालकांनी ‘Book My HSRP’ पोर्टलवरून किंवा अधिकृत फिटमेंट सेंटरवर जाऊन ही प्लेट बसवून घ्यावी.
हे देखील वाचा: Aadhaar Pan Linking: पॅन-आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी! दुर्लक्ष केल्यास बसू शकतो मोठा आर्थिक फटका

२. आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची संधी

केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत दिली आहे. १ जानेवारी २०२६ पासून तुमचे पॅन कार्ड ‘निष्क्रिय’ (Inactive) होईल. यामुळे बँकेचे व्यवहार करणे, नवीन खाते उघडणे किंवा आयटीआर फाइल करणे अशक्य होईल. पॅन पुन्हा सक्रिय करण्यासाठी १,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दंड भरावा लागू शकतो.

  • कसे करावे? इनकम टॅक्सच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे स्टेटस तपासा आणि लिंक नसेल तर त्वरित प्रक्रिया पूर्ण करा.
  • ऑनलाइन लिंक करण्याची पद्धत (Step-by-Step)

    १. आयकर विभागाच्या e-Filing Portal वर जा.

    २. तिथे ‘Link Aadhaar’ हा पर्याय निवडा.

    ३. पॅन आणि आधार नंबर टाकून व्हॅलिडेट करा.

    ४. मोबाईलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा.

    लिंकिंग स्टेटस कसे तपासावे?

    तुमचे पॅन-आधार आधीच लिंक आहे का, हे तपासण्यासाठी आयकर पोर्टलवर ‘Check Aadhaar Link Status’ या पर्यायावर क्लिक करून माहिती भरा. तिथे तुम्हाला तुमचे स्टेटस लगेच कळेल.

३. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी e-KYC पूर्ण करा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी शासनाने e-KYC पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण होणार नाही, त्यांचा दरमहा मिळणारा १,५०० रुपयांचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो. राज्यातील सुमारे ४० लाख महिलांचे केवायसी अद्याप प्रलंबित असल्याने प्रशासनाने हा इशारा दिला आहे.

  • कसे करावे? लाभार्थी महिलांनी आपल्या मोबाईलमधील ‘नारीशक्ती दूत’ ॲप किंवा जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन अंगठ्याचा ठसा किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे केवायसी पूर्ण करावे.
हे देखील वाचा: 8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ शक्य? लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला

Web Title: Complete these 3 important tasks before december 31st otherwise you will face a major financial setback

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2025 | 06:42 PM

Topics:  

  • 31 December
  • new year 2025

संबंधित बातम्या

Year Ender : सोशल मीडियावर ‘या’ दागिन्यांची होती मोठी क्रेझ, पहा नीता अंबानी ते ऐश्वर्या राय यांचे महागडे युनिक दागिने
1

Year Ender : सोशल मीडियावर ‘या’ दागिन्यांची होती मोठी क्रेझ, पहा नीता अंबानी ते ऐश्वर्या राय यांचे महागडे युनिक दागिने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.