फोटो सौजन्य- iStock
आज, ( दि. ५ सप्टेंबर) स्टेट ऑफ स्पोर्टस् अँड फिजिकल अॅक्टिव्हीटी (एसएपीए)च्या लाँचप्रसंगी डालबर्गने निदर्शनास आणले की, किमान १५५ दशलक्ष भारतीय प्रौढ व्यक्ती आणि ४५ दशलक्ष किशोरवयीन शारीरिक अॅक्टिव्हीटीबाबत डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करण्यामध्ये अयशस्वी ठरले आहेत. ओमीड्यार नेटवर्क इंडिया व अजित इसाक फाऊंडेशन यांच्या पाठिंब्यासह स्पोर्टस् अँड सोसायटी अॅक्सेलेरेटरसोबत सहयोगाने विकसित करण्यात आलेला हा अहवाल क्रीडा व शारीरिक अॅक्टिव्हीटीवर त्वरित फोकस आणि सहभाग घेण्याची त्वरित गरज निदर्शनास आणतो, तसेच त्यांचे फायदे दाखवतो आणि त्यासंदर्भात येणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी मार्गांना प्रकाशझोतात आणतो.
भारत चिंताजनकपणे निष्क्रिय स्थितीत आहे
एसएपीए अहवालामधून निदर्शनास येते की, भारताला सक्रिय देश बनण्यासाठी अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. शारीरिक व्यायाम करत असलेल्या व्यक्तींच्या व्यायाम पद्धतींमध्ये वैविध्यता नाही. डेटामधून निदर्शनास येते की ऑफिस व घरातील कामांव्यतिरिक्त प्रौढ व्यक्ती फक्त चालणे हा व्यायाम प्रकार करतात, जे लाभदायी आहे, पण पुरेसे नाही. देशातील फक्त १० टक्के प्रौढ व्यक्ती खेळ खेळतात. नियमितपणे खेळ खेळणाऱ्या व्यक्तींची आकडेवारी यापेक्षाही कमी आहे. अधिकाधिक किशोरवयीन (६६ टक्के) नियमितपणे खेळ खेळत असले तरी त्यांच्या खेळाच्या निवडीमध्ये मर्यादित विविधता आहे. पन्नास टक्के मुले क्रिकेट खेळतात, तर इतर खेळ खेळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.
एसएपीएमध्ये सामील होण्याच्या भारतीयांच्या पद्धतीतील लिंग-विभाजन स्पष्ट आहे – सरासरी, मुले व महिला मुले व पुरूषांच्या तुलनेत दर आठवड्याला एसएपीएमध्ये ५ ते ७ तास कमी (जवळपास २० टक्के कमी) वेळ व्यतित करतात. शहरी भागांमधील आकडेवारी पाहता ही तफावत अधिक वाढत जाते, जेथे मुलींना सर्वाधिक धोका आहे. किमान एक-तृतीयांश मुली व महिला शारीरिक क्रियाकलापासंदर्भातील डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शकतत्त्वांची पूर्तता करत नाहीत.
विशेषत: निष्क्रियतेचा शहरी महिलांवर अधिक परिणाम झाला आहे
शहरी महिला ग्रामीण महिलांच्या तुलनेत सक्रियतेसंदर्भात दर आठवड्याला ३८५ मिनिटे कमी वेळ व्यतित करतात आणि शहरी पुरूषांच्या तुलनेत दर आठवड्याला २४९ मिनिटे कमी वेळ व्यतित करतात. या तफावतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत जसे पायाभूत सुविधेचा अभाव, सुरक्षितता आणि उपलब्धता, ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एसएपीएमध्ये २० टक्के कमी महिला सामील होतात. याव्यतिरिक्त, मासिक पाळी व गर्भधारणेदरम्यान एसएपीए धोकादायक आहे, असे गैरसमज या तफावतीमध्ये अधिक भर करतात.
एसएपीए भारताच्या विकसित भारतप्रती महत्त्वाकांक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकते
भारत निष्क्रिय स्थितीत राहिला तर आपल्याला सर्व घटकांबाबत तणाव वाढण्याचा धोका आहे. २०४७ पर्यंत, निष्क्रिय भारत स्थितीमुळे २०० दशलक्षहून अधिक प्रौढ व्यक्तींना असंसर्गजन्य आजार (एनसीडी) असेल, ४५ दशलक्षहून अधिक किशोरवयीन व्यक्ती लठ्ठ असतील आणि आजच्या तुलनेत आरोग्यसेवेवर अतिरिक्त ५५ ट्रिलियन रूपयांहून अधिक वार्षिक खर्च होईल. तसेच, भारत सध्या कमी कर्मचारी उत्पादकतेचा सामना करत आहे, जे जागतिक सरासरीच्या जवळपास निम्मे आहे, आरोग्य-संबंधित समस्यांमुळे अनुपस्थितीचे प्रमाण जास्त आहे आणि कामामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग कमी आहे.
एसएपीएमधील उच्च सहभागामध्ये या चित्राला पूर्णत: कलाटणी देण्याची क्षमता आहे. या अहवालानुसार, एसएपीए व्यक्तींना मोठ्या प्रमाणात फायदे देऊ शकते, तसेच व्यक्तींना उत्तम सामाजिक व राष्ट्रीय प्रगती करण्यासाठी सक्षम करू शकते. जगभरातील देशांना एसएपीएमधील वाढत्या गुंतवणूकीमधून फायदा मिळाला आहे, जेथे चीनने रूग्णाच्या हॉस्पिटलायझेशन खर्चामध्ये ४० टक्के घट व आरोग्यसेवा खर्चांमध्ये ३० टक्के घट नोंदवली आहे आणि यूकेने सामाजिक-आर्थिक मूल्यामध्ये ७२ बिलियन पौंडचा महसूल निर्माण केला आहे. अशी इतर अनेक उदाहरणे आहेत.
एसएपीए अहवाल भारतासाठी या निष्पत्तींच्या परिणामांना दाखवतो, तसेच साध्य करता येणारे लक्ष्य सादर करतो, जे देशाला खालील मार्गांद्वारे मदत करू शकतात:
1. आर्थिक प्रगती: २०४७ पर्यंत सर्व लोक सक्रिय राहिल्यास एसएपीए भारताचे जीडीपी वार्षिक १५ ट्रिलियन रूपयांहून अधिकपर्यंत वाढवू शकते. तसेच, कमी सिक लिव्ह आणि आजाराच्या कारणास्तव अनुपस्थिती यामुळे उत्पादकतेसंबंधित नुकसान २.५ ट्रिलियन रूपयांनी (३० बिलियन अमेरिकन डॉलर्स) होण्याला प्रतिबंध होऊ शकते.
2. आरोग्य व मृत्यूचे परिणाम: २०४७ पर्यंत एसएपीए जवळपास ११० दशलक्ष प्रौढ व्यक्तींना एनसीडी होण्याला प्रतिबंध करू शकते, ज्यामुळे ३०,००० कमी आत्महत्या होऊ शकतात आणि लठ्ठपणा, हृदयसंबंधित आजार व मानसिक आरोग्य समस्या कमी करत आरोग्यसेवा खर्चांमध्ये जवळपास ३० ट्रिलियन रूपयांची बचत होऊ शकते.
3. लिंग तफावत दूर करा: २०४७ पर्यंत एसएपीए ११ दशलक्ष मुलींना खेळाची निवड करण्यास प्रेरित करू शकते, ज्यामुळे त्यांचे मनोबल व आत्मविश्वास उंचावेल आणि शक्यतो ६००,००० अतिरिक्त महिला उद्योजक व प्रमुख घडतील.
4. क्रीडा देश म्हणून निपुण व्हा: एसएपीएच्या माध्यमातून आपण २०४७ पर्यंत क्रीडा उद्योगात वार्षिक ४.५ ट्रिलियन रूपये खर्च करू शकतो. क्रीडा क्षमता वाढवल्याने भारताची ऑलिम्पिक्सचे आयोजन करण्याची क्षमता देखील दृढ होऊ शकते, अधिकाधिक खेळांमध्ये विजय संपादित करता येऊ शकतात आणि आपली जागतिक क्रीडा फूटप्रिंट वाढवता येऊ शकते.