Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

100 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्मितीची डील रद्द; वाचा… केंद्र सरकारने का केलीये डील रद्द!

केंद्र सरकारने १०० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्मितीची डील रद्द केली आहे. महागडी किंमत असल्याने भारतीय रेल्वेकडून हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून या १०० वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी आणि देखभालीसाठी ३० हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, फ्रेंचची बहुराष्ट्रीय कंपनी एल्सटॉम इंडियासोबत बोलणी फिस्कटल्याने हे टेंडर रद्द झाले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 14, 2024 | 03:30 PM
100 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्मितीची डील रद्द; वाचा... केंद्र सरकारने का केलीये डील रद्द!

100 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्मितीची डील रद्द; वाचा... केंद्र सरकारने का केलीये डील रद्द!

Follow Us
Close
Follow Us:

देशभरात मागील काही काळापासून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ही भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती रेल्वे सेवा चांगलीच चर्चेत आहे. मात्र, आता केंद्र सरकारने नव्याने निर्माण केल्या जाणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या १०० ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ट्रेन खरेदी करण्याची डील रद्द केली आहे. महागडी किंमत असल्याने भारतीय रेल्वेकडून हे टेंडर रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडून या १०० वंदे भारत ट्रेन तयार करण्यासाठी आणि देखभालीसाठी ३० हजार कोटींचे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, आता ते रद्द करण्यात आले आहे.

नेमकी का झाली डील रद्द?

फ्रेंचची बहुराष्ट्रीय कंपनी एल्सटॉम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ओलिवियर लॉयसन यांनी म्हटले आहे की, कंपनीने भारत सरकारसोबत प्रति वंदे भारत ट्रेनसाठी 150.9 कोटींची डील केली होती. मात्र, सरकारने 140 कोटींची मागणी लावून धरली होती. मात्र, आता ही निविदा रद्द झाली आहे. सरकार नव्याने या रेल्वे प्रोजेक्टसाठी निविदा काढू शकते. पुढील सात वर्षात या १०० वंदे भारत ट्रेन तयार होऊन रेल्वेच्या ताफ्यात सहभागी होणार आहे.
(फोटो सौजन्य : istock)

हेही वाचा : टॅक्स शुन्यावर आणावा, ही माझीही इच्छा! पण… अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितली अडचण

मागील टेंडर 120 कोटी रुपये प्रति ट्रेन

मात्र, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून या रद्द झालेल्या निविदेबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी भारत सरकारने २०० वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन निर्मिर्तीचे टेंडर 120 कोटी रुपये प्रति ट्रेन या हिशोबाने देण्यात आले होते. ज्यातील सर्व वंदे भारत ट्रेन या स्टीलच्या बनवण्यात आल्या होत्या. मात्र, आता नव्याने रेलवेच्या ताफ्यात येणाऱ्या ट्रेनसाठी सरकारने अल्युमिनियमच्या ट्रेनची डील केली आहे.

३५ वर्षांपर्यंत मिळणार देखभाल खर्च

भारतीय रेल्वेला अपेक्षा होती की, या टेंडरसाठी कमीत कमी ५ कंपन्या समोर येतील. मात्र, टेक्निकल राउंडमध्ये अनेक कंपन्या निविदा प्रक्रियेतून बाहेर फेकल्या गेल्या. केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, कंपन्यांना प्रत्येक वर्षी कमीत कमी १० ट्रेन सरकारला द्यायची आहेत. हे टेंडर मिळवलेल्या कंपन्यांना ट्रेनच्या डिलिव्हरीसाठी १३ हजार कोटी रुपये आणि बाकी १७ कोटी रुपये हे पुढील ३५ वर्षांसाठी देखभालीसाठी देखील दिले जाणार आहे.

Web Title: Deal to build 100 vande bharat express trains cancelled indian railways due to high price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Indian Railways
  • vande bharat express

संबंधित बातम्या

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪
1

Ahilyanagar : नागपूर–पुणे वंदे भारतचे अहिल्यानगरमध्ये जल्लोषात स्वागत ‪

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील
2

पुणे ते नागपूर प्रवास होणार सुपर फास्ट; PM मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला दाखवला हिरवा कंदील

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
3

नागपूर-पुणे वंदे भारतचंं स्वप्न पूर्ण, १० ऑगस्टला PM नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन
4

1500 किमी अंतर फक्त ६ तासांत; या दोन शहरांदरम्यान धावणार भारतातील दुसरी बुलेट ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.