Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरची हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत भागीदारी, पुण्यामध्ये उभारणार मेगा टाऊनशिप प्रकल्प

या टाऊनशिपची आधुनिक ऑरगॅनिक आणि ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चरल आणि डिझाईन शैली अनुभवात्मक जगणे, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन संपत्ती वृद्धी यांना महत्त्व देणाऱ्या घरमालकांच्या व गुंतवणूकदारांच्या नवीन पिढीच्या सौंदर्याशी

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 08, 2025 | 06:19 PM
डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरची हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत भागीदारी, पुण्यामध्ये उभारणार मेगा टाऊनशिप प्रकल्प (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरची हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत भागीदारी, पुण्यामध्ये उभारणार मेगा टाऊनशिप प्रकल्प (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरने हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत प्रोप्रायटरी सीडीडीएमओTM मॉडेलसाठी हातमिळवणी केली आहे. तब्बल ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेली रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप उभारण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रात हे पाऊल पहिल्यांदाच उचलले गेले आहे.

विशिष्ट संकल्पनेवर आधारित, हॉस्पिटॅलिटी-चलित मॉडेलने स्थावर मालमत्ता क्षेत्रात एक नवीन गुंतवणूक वर्ग खुला आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर ९% पर्यंत परतावा देण्याची क्षमता आहे. या मॉडेलमुळे हा मूल्य प्रस्ताव स्थावर मालमत्तेच्या पलीकडे जाऊन, एक खास निवडण्यात आलेली लाईफस्टाईल इकोसिस्टिम निर्माण करतो, ज्यामध्ये अतुलनीय लक्झरी, कम्युनिटी आणि अनुभवात्मक हॉस्पिटॅलिटी यांचा मिलाप आहे.

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती

पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या उत्तर हिंजवडीमध्ये तब्बल ४० एकरांहून मोठ्या परिसरात वसवण्यात येणार असलेल्या या टाऊनशिपमध्ये ८ एकरांचे रेसकोर्स आणि इंटरनॅशनल पोलो क्लब, १२८ खाजगी व्हिला प्लॉट्स, ११२ रिसॉर्ट खाजगी निवास, ३०० खोल्यांचे पंचतारांकित लक्झरी रिसॉर्ट, ९ वेडिंग डेस्टिनेशन व्हेन्यू, १२ कॉर्पोरेट आणि माईस व्हेन्यू, एक्स्ट्रीम ऍडव्हेंचर पार्क, डेला रेन्ज गोल्फ, वेलनेस सुविधा आणि डेलाची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिझाईन संवेदनांनी सजलेल्या एक्स्पेरिएन्शियल जागा यांचा समावेश असेल.

या टाऊनशिपची आधुनिक ऑरगॅनिक आणि ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चरल आणि डिझाईन शैली अनुभवात्मक जगणे, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन संपत्ती वृद्धी यांना महत्त्व देणाऱ्या घरमालकांच्या व गुंतवणूकदारांच्या नवीन पिढीच्या सौंदर्याशी संबंधित आवडीनिवडींना पुरेपूर अनुरूप आहे.

डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच या महत्त्वपूर्ण विकासामागे ज्यांची दूरदृष्टी आहे असे श्री जिमी मिस्त्री यांनी सांगितले, “ही केवळ एक टाऊनशिप नाही तर भारतामध्ये आजवर कधीही पहिले न गेलेल्या स्थावर मालमत्ता मॉडेलचा हा उदय आहे. सीडीडीएमओ दृष्टिकोनासह आम्ही स्थावर मालमत्तेला केवळ उत्पादन नव्हे तर अनुभव म्हणून निर्माण करू इच्छितो.

आमची इच्छा आहे की, स्थावर मालमत्ता ही केवळ एक स्थिर संपत्ती बनून राहू नये तर, गतिशील, परतावा मिळवून देणारी गुंतवणूक बनावी. पहिल्यांदाच निवासी स्थावर मालमत्तेमध्ये उद्योगक्षेत्रातील आजवरच्यापेक्षा म्हणजे ३% पेक्षा जास्त परतावा मिळत आहे, स्थावर मालमत्ता गुंतवणुकीवर पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त ९% पर्यंत खात्रीशीर परतावा दिला जात आहे. हे लक्झरी फ्यूचर फिट लिव्हिंग आहे, अचूकपणे डिझाईन करण्यात आले आहे आणि डिझाईन, नावीन्य व संचालनातील उत्कृष्टता याचा आधार आहे.”

उद्योगक्षेत्रातील दिग्गज, हिरानंदानी कम्युनिटीजचे अध्यक्ष डॉ निरंजन हिरानंदानी यांनी या भागीदारीविषयी सांगितले, “भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून येत आहे, एकात्मिक, वन-स्टॉप डेस्टिनेशन्समध्ये जीवनशैलीवर भर देणाऱ्या जगण्याबाबत घरखरेदीदारांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा या परिवर्तनाला दिशा आणि चालना देत आहेत. ग्राहककेंद्रितता वाढवण्यासाठी जागा आणि सेवा यांचे एकीकरण करणारे ट्रेंड्स उद्योगक्षेत्राने स्वीकारले पाहिजेत. आधुनिक घरखरेदीदारांच्या आवडीनिवडी बदलत आहेत, त्यालाच अनुसरून स्थावर मालमत्ता विकासक महत्त्वाकांक्षी भारतीय घरमालकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अभिनव इकोसिस्टिम तयार करण्यासाठी पूरक उद्योगांसोबत हातमिळवणी करत आहेत.

नावीन्य आणि ट्रेंड्स निर्माण करणे हे नेहमीच हिरानंदानीचे हॉलमार्क्स म्हणून ओळखले जातात. उत्तर हिंजवडी, पुण्यामध्ये १०५ एकरांच्या टाऊनशिपसाठी क्रिसला डेव्हलपर्ससोबत आमची धोरणात्मक भागीदारी म्हणजे हिरानंदानी ग्रुपने पुण्यातील वेगाने वाढत असलेल्या स्थावर मालमत्ता बाजारपेठेत केलेले पदार्पण आहे. शिवाय डेला ग्रुपसोबत केलेला विकास व्यवस्थापन करार विशेष निवडण्यात आलेल्या, खास अनुभव देणाऱ्या, राहण्याच्या जागा पुरवण्याची आम्ही कटिबद्धता मजबूत करतो. जीवनशैलीची नवी व्याख्या रचणे, प्रत्यक्ष वापर करणारे आणि गुंतवणूकदार या दोघांसाठी देखील मूल्य प्रस्ताव वाढवणे आणि भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रात नवीन मानके स्थापन करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे.”

क्रिसला डेव्हलपर्सचे सीएमडी श्री सागर अगरवाल म्हणाले, “हिरानंदानी कम्युनिटीजसोबत आम्ही ज्या १०५ एकरांच्या एकीकृत टाऊनशिपची संकल्पना करत आहोत, ती स्केल, सस्टेनेबिलिटी आणि स्मार्ट शहरवादावर आधारित आहे. डेला टाऊनशिप्ससोबत ४० एकर परिसरासाठी आम्ही भागीदारी ही धोरणात्मक भागीदारी करण्याच्या क्रिसला डेव्हलपर्सच्या मूलभूत शक्तीमुळे शक्य झाले आहे ज्यामुळे व्हिजन आणि मूल्य या दोन्हींमध्ये वाढ झाली आहे. या सेगमेंटमुळे निवासी स्थावर मालमत्तेमध्ये अनेक गोष्टी या उद्योगक्षेत्रात पहिल्यांदाच आणल्या जातील, प्रीमियम खाजगी व्हिला प्लॉट्स, सिग्नेचर निवास, रेसकोर्स, रिसॉर्ट, ऍडव्हेंचर पार्क यांचा यामध्ये समावेश आहे, ज्यामुळे शहरी जीवनाच्या मध्यभागी हॉस्पिटॅलिटी प्रस्तुत केली जाईल.

उत्तर हिंजवडीमध्ये असल्याने मुंबई-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून अगदी जवळ आहे, ही टाऊनशिप घर खरेदीदार आणि गुंतवणूकदार दोघांसाठी देखील आकर्षक ठरेल. डेलासोबत आम्ही एक असे डेस्टिनेशन तयार करत आहोत ज्यामध्ये उत्तम राहण्याच्या जागा, महत्त्वाकांक्षा आणि उच्च मूल्य गुंतवणूक यांचा मिलाप असेल, निवासी स्थावर मालमत्तेची नवीन राष्ट्रीय मापदंड निर्माण केले जातील.”

सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या खूप वरच्या टप्प्यांवर आहे, जमीन अधिग्रहण पूर्ण झालेले आहे आणि डिझाईनला अंतिम मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. टाऊनशिपचा पहिला फेज तीन महिन्यांमध्ये लॉन्च होईल आणि रिसॉर्ट व व्हिला प्लॉट्ससाठी पुढील वर्षीच्या सुरुवातीला ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. २०२६ वर्षाच्या अखेरीस खाजगी निवासांचा ताबा दिला जाईल अशी अपेक्षा आहे. शहरी जगण्याची नवी व्याख्या तयार केली जावी आणि ही टाऊनशिप म्हणजे पुण्यातील एक सांस्कृतिक हॉटस्पॉट बनावा तसेच इतर उदयास येत असलेल्या भारतीय महानगरांसाठी एक अनुकरणीय मॉडेल तयार केले जाते हा या हॉस्पिटॅलिटीवर आधारित थीम्ड टाऊनशिपचा उद्देश आहे.

Share Market Closing Bell: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद

Web Title: Della resorts and adventures partners with hiranandani communities and krisla developers to build mega township project in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Business News
  • real estate
  • share market

संबंधित बातम्या

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा
1

विक्रम सोलर IPO चे सबस्क्रिप्शन दुसऱ्या दिवशी वाढले, नवीनतम GMP, ब्रोकरेज हाऊसचा सल्ला आणि इतर तपशील तपासा

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?
2

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या
3

मंगल इलेक्ट्रिकल IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी, GMP 4 टक्क्याने वाढला; सबस्क्राइब करावा की नाही? जाणून घ्या

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल
4

Share Market Today: इंडियन ऑईलसह आज खरेदी करा हे शेअर्स, तज्ज्ञांनी केली शिफारस; तुम्हीही होऊ शकता मालामाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.