Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर आणखी कर वाढवण्याच्या इशाऱ्यामुळे शेअर बाजारात उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घडामोडीचा थेट परिमाण बाजार भाव आणि रुपयांवर होताना दिसत आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 06, 2026 | 12:38 PM
Stock Market: जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

Stock Market: जागतिक घडामोडींचा देशांतर्गत बाजारावर ताण; कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदार सावध

Follow Us
Close
Follow Us:
  • शेअर बाजार घसरणीत, तर रुपयाचीही पिछाडी
  • अमेरिकेच्या इशाऱ्यांमुळे शेअर बाजार झाला लालेलाल
  • कर वाढीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी घेतला सावध पवित्रा
 

Stock Market: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय उत्पादनांवर आणखी कर वाढवण्याच्या ताज्या इशाऱ्यामुळे सोमवारी देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स ३२२ अंकांनी घसरला, तर निफ्टी ७८ अंकांनी घसरला. व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या ताज्या इशाऱ्याचा भावनेवर परिणाम झाला आणि बँकिंग, आयटी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आल्याचे विश्लेषकांनी सांगितले. ३० शेअर्सचा बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स ३२२.३९ अंकांनी किंवा ०.३८ टक्क्यांनी घसरून ८५,४३९.६२ वर बंद झाला. ट्रेडिंग दरम्यान एका टप्प्यावर, तो ४४६.६८ अंकांनी घसरून ८५,३१५.३३ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला. दरम्यान, एनएसईचा ५० शेअर्सचा बेंचमार्क निफ्टी २६,३७३.२० अंकांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्यानंतर, त्याची वाढ टिकवून ठेवू शकला नाही आणि ७८.२५ अंकांनी किंवा ०.३० टक्क्यांनी घसरून २६, २५०.३० वर बंद झाला.

हेही वाचा: India Manufacturing iPhone: ‘मेक इन इंडिया’चा मोठा चमत्कार; भारतातून आयफोन निर्यात ५० अब्ज डॉलर्स पार

विदेशी बाजार दक्षिण कोरियाचा कोस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाय निर्देशांक वाढीसह बंद झाला, तर हाँगकाँगचा हँग सँग किरकोळ वाढ झाल्याची दिसून आली. सोमवारी सलग चौथ्या व्यापार सत्रात रुपया घसरला, ८ पैशांनी घसरून ९०.२८ प्रति डॉलरवर बंद झाला. मजबूत अमेरिकन चलन आणि मंदावलेल्या देशांतर्गत शेअर बाजारांचा रुपयावर भार पडला. व्हेनेझुएलातील अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपामुळे उस्तक्षेपामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे जागतिक डॉलरची मागणी वाढली, असे फॉरेक्स व्यापाऱ्यांनी सांगितले. तथापि, कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींमुळे भारतीय चलनाला खालच्या पातळीवर काही आधार मिळाला.

हेही वाचा: India-Israel Trade: भारत–इस्रायल व्यापाराला मिळणार नवी चालना; एसबीआयकडून रुपयांत होणार व्यवहार सुलभ

मात्र, मंगळवारी भारतीय शेअर बाजार सकारात्मक उघडले असून गुंतवणूकदारांना आशेचा किरण दिसत आहे. तसेच, दिवसभर सकारात्मक परिस्थिति असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तज्ज्ञांनी वर्तवलेल्या काही अंदाजामुळे गुंतवणूकदार आनंदी असून आशियाई शेअर बाजारातील वाढत्या अथवा स्थिर तेजीचा मागोवा घेत, भारतीय शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीसह मिश्रित किंवा सकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने गुंतवणूकदार थोडी सावध पवित्रा घेत असल्याचेही दिसून येत आहे.

Web Title: Global ghadmodincha domestic share market tension

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • America
  • Nifty
  • sensex
  • share market

संबंधित बातम्या

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा
1

Venezuela त होणार निवडणुका? Maduro च्या कोर्टात सुनावणीनंतर ट्रम्प यांची मोठी घोषणा

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर
2

Nicolas Maduro : ‘मी निर्दोष आहे…’ ; हातकड्यांमध्ये मादुरो न्यूयॉर्कच्या कोर्टात हजर

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू
3

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आलं हसू

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च
4

दर तासाला 3 कोटी…; Nicolas Maduro च्या अटकेसाठी अमेरिकेने केला अब्जावधींचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.