
फोटो सौजन्य - Social Media
रेकिटच्या डेटॉल बनेगा स्वस्थ इंडिया (BSI) मोहिमेने जागतिक हँडवॉशिंग दिवस 2024 साजरा केला, ज्यामध्ये 30 दशलक्ष मुलांना हात धुण्याचे महत्त्व शिकवण्यात आले. या वर्षीची थीम “सर्वांसाठी हात धूवा: स्वच्छतेमधून आरोग्य समानता आधुनिक करणे” होती. या मोहिमेचा उद्देश होता, मागासवर्गीय भागातील मुलांना स्वच्छतेचे अत्यावश्यक ज्ञान देणे.
जागतिक हँडवॉशिंग दिवस 2024 प्रसंगी, BSI अंतर्गत डेटॉल स्कूल हायजिन एज्युकेशन प्रोग्रामने 100 हून भागीदारांच्या साहाय्याने 29 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश यांमधील 30 दशलक्षाहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. या मोहिमेने सार्वजनिक, खाजगी, शासकीय अनुदानित आणि विना-अनुदानिक क्षेत्रांमधील शाळांत सहभाग घेऊन योग्य पद्धतीने हात धूण्याच्या तंत्राची माहिती दिली, यामध्ये भारतभरातील सर्वोदय विद्यालय, नवोदय विद्यालय, आर्मी स्कूल आणि केंद्रिय विद्यालय यांचा समावेश होता.
हे देखील वाचा : सोन्यातील गुंतवणूकीसाठी नवा पर्याय ! मिरे अॅसेट म्युच्युअल फंडकडून गोल्ड ईटीएफ फंड ऑफ फंड लाँच
सातत्याने नवकल्पकता आणणाऱ्या उपक्रमाचा भाग म्हणून, डेटॉल BSI ने सुरुवात केली ती म्हणजे डेटॉल हायजिन चाटबोट, हायजिया फॉर गूड हायजिन, इंस्पायर्ड बाय हायजिया, दि ग्रीक गूडनेस ऑफ हेल्थ, क्लिनलिनेस आणि हायजिन. हे AI समर्थित, व्हॉट्सअप- एनेबल्ड चाटबोट 7 भाषांमध्ये गंभीर स्वरूपाचे हायजिनबाबत ज्ञान देईल ज्या भाषा आहेत – हिंदी, इंग्लीश, तामीळ, ओडिया, गुजराती आणि तेलगू – पुढे 22 अधिकृत भारतीय भाषांमध्ये विस्तार करण्याची योजना आहे. चाटबोट स्वयं-शिक्षण, स्वयं-साहाय्य साधने आणि परस्परसंवादी प्लॅटफॉर्म यांच्या आवश्यकतेवर भर देतो ज्यामुळे कृतिशीलता आणि जागरूकता वाढते.
रेकिट दक्षिण आशियाचे संचालक रवी भटनागर म्हणाले, “रेकिटमध्ये, प्रत्येक मुलाच्या निरोगी भविष्यासाठी आणि हायजिनबाबत शिक्षणासाठी अडथळे तोडण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. स्वच्छतेबाबत समानता ही आमची दिर्घकाळापासूनची वचनबद्धता दशकांपासून भारतीय शासनाच्या क्लिन इंडिया चळवळी समान आहे, ज्यामध्ये प्रत्येक मुलाला हात धूण्याची जीवनाचा बचाव करणारा सराव शिकू शकतो या गोष्टीवर भर दिला जातो. आम्ही नुकतेच या उपक्रमाच्या 11 व्या वर्षांत पदार्पण केले आहे, स्वच्छता समानतेवर आमचा भर आधीपेक्षाही बळकट झाला आहे, ज्यामुळे ‘कोणीही सूटणार नाही’ या आमच्या व्यापक ध्येयाला चालना मिळते.”
हे देखील वाचा : काय म्हणतंय NIFTY 50? कोणते शेअर तेजीत? जाणून घ्या
ग्रामलयाचे संस्थापक पद्मश्री एस. दामोदरन आणि प्लॅन इंडियाचे मोहम्मद आसिफ यांनी देखील स्वच्छतेच्या शिक्षणावर भर दिला. डेटॉल BSI ने 1 करोड मुलांना शिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.