Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Muhurat Trading 2026 : शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स चमकले?

Diwali Muhurat Trading 2026 :दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आणि नवीन 'संवत' वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष 'मुहूर्त ट्रेडिंग' सत्रात भारतीय शेअर बाजाराने तेजीत सुरुवात केली आहे. या पारंपारिक एका तासाच्या विशेष ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सकारात्मक वाढ पाहायला मिळाली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 08, 2026 | 04:00 PM
शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा!
  • दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तेजीत सुरुवात
  • मुहुर्तावर कोणते शेअर्स चमकले?
Diwali Muhurat Trading 2026 : आज रविवारी असून सुद्धा दिवाळीच्या निमित्ताने शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली. आजच्या दिवशी शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा दिसली. सेन्सेक्स २७१.३२ अंकांच्या वाढीसह ८१,२९९.३४ वर उघडल तर निफ्टी ५० देखील सुमारे ४० अंकांच्या वाढीसह २५,०७०.४५ वर उघडला. सेन्सेक्स अल्पावधीत ४०० हून अधिक अंकांनी वाढला. या काळात काही शेअर्समध्ये बरीच वाढ झाली. या कोणत्या शेअर्सचा समावेश होता? मुहुर्त ट्रेडिंग म्हणजे काय? सगळं जाणून घेऊयात. ( Diwali Muhurat Trading 2026 ) 

Bank Holidays November : काय सांगता? बँकेची कामं तातडीने उरकून घ्या… पुढच्या आठवड्यात 6 दिवस बँका राहणार बंद

शुक्रवारी, सेन्सेक्स १७३१ अंकांनी वाढून १४२३६४ वर बंद झाला. निफ्टी ५० मध्येही मोठी वाढ दिसून आली आणि तो ४९३.७५ अंकांच्या वाढीसह २५,०३०.३५ वर बंद झाला होता. मात्र रविवारी दिवाळीच्या मुहुर्तावर ट्रेडिंगनिमित्त लक्ष्मीजी प्रसन्न झाल्याचं दिसून आलं. या काळात टाटा स्टील, सन फार्मा, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक इत्यादींच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

पैशांचं सेटलमेंट कधी होणार?

मुहूर्त ट्रेडिंग दरम्यान झालेल्या व्यवहारांची सेटलमेंट एक्सचेंजच्या नियमांनुसार केली जाईल. एनएसई क्लिअरिंगच्या २१ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार, ८ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात झालेल्या व्यवहारांची सेटलमेंट सोमवार, ९ नोव्हेंबर रोजी केली जाईल.पे-इनची वेळ सायंकाळी ४:३० आणि पे-आउटची वेळ रात्री ९ वाजता निश्चित करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदारांच्या व्यवहारांशी संबंधित रक्कम आणि शेअर्सची सेटलमेंट टी+१ सेटलमेंट नियमानुसार केली जाणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात आयोजित केले जाणारे एक विशेष ट्रेडिंग सत्र आहे. हे सत्र दरवर्षी लक्ष्मी पूजेच्या निमित्ताने आयोजित केले जाते. हा दिवस हिंदू पंचांगातील नवीन संवत वर्षाची सुरुवात देखील दर्शवतो. भारतीय गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगला शुभ मानतात. अनेक लोक परंपरेनुसार या दिवशी नवीन गुंतवणूक सुरू करतात आणि शेअर्स खरेदी करतात. पण, हे एका सामान्य ट्रेडिंग सत्रासारखेच आहे आणि यातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीनच असते.

बाजारात दिवाळीपूर्व तेजी

दिवाळीच्या अगदी आधी भारतीय शेअर बाजारात विक्रमी तेजी नोंदवली गेली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही सलग सात ट्रेडिंग दिवसांपासून वाढीसह बंद झाले. या कालावधीत, सेन्सेक्सने १०.६% (७,७८२ अंकांची) नेत्रदीपक उसळी घेतली, जी गेल्या ३५ वर्षांतील सर्वात मोठी दिवाळीपूर्व तेजी मानली जाते. निफ्टीमध्येही १०.२७% ची वाढ झाली. शेअर बाजारातील या प्रचंड तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे २९.५७ लाख कोटी रुपयांची भर पडली आहे.

Gold Prices Global Vs India : जगभरात तब्बल 24% तर घसरले सोन्याचे भाव! मग भारतात फक्त 20% घसरण का? या फरकामागचं मोठं कारण समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: दिवाळीच्या दिवशी होणाऱ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'चे महत्त्व काय असते?

    Ans: हिंदू कॅलेंडरनुसार नवीन संवत वर्षाची सुरुवात म्हणून या विशेष सत्रात शेअर बाजारात व्यवहार करणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्याला 'लक्ष्मीपूजन ट्रेडिंग' किंवा मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात.

  • Que: मुहूर्त ट्रेडिंगच्या या विशेष सत्रात कोणत्या प्रमुख शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली?

    Ans: टाटा स्टील, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स यांसारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली गेली

  • Que: या सत्रादरम्यान शेअर बाजाराची वेळ काय असते?

    Ans: दिवाळीच्या दिवशी राष्ट्रीय व मुंबई शेअर बाजाराद्वारे संध्याकळी एका तासासाठी हे विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित

Web Title: Diwali muhurat trading 2026 sensex nifty gains marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Diwali 2026
  • trading news

संबंधित बातम्या

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी
1

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
3

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Naraka Chaturdashi:  नरक चतुर्दशीला चिराट फोडल्यानंतर त्यातील बियांच काय करतात? जाणून घ्या खास परंपरा
4

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला चिराट फोडल्यानंतर त्यातील बियांच काय करतात? जाणून घ्या खास परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.