Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांनी चेन्नईत चाहत्यांसोबत दिवाळी साजरी केली. पोएस गार्डन येथील निवासस्थानाबाहेर शेकडो चाहते जमले होते. रजनीकांत यांनी घराबाहेर येत सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 08, 2026 | 03:55 PM
Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी

Follow Us
Follow Us:
  • रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत रजनीकांत
  • चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण
  • देशभरात दिवाळीचा उत्साह
 

दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची लोकप्रियता किती प्रचंड आहे, याचा प्रत्यय अनेकदा येतो. या दिवाळीतही तसंच काहीसं घडलं. दिवाळीच्या निमित्ताने या आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी थलैवाचे हजारो चाहते चेन्नईतील पोएस गार्डन परिसरातील रजनीकांत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले होते.
यावेळी रजनीकांत यांनी स्वतः घराबाहेर येत, आपल्या लाडक्या चाहत्यांना हात उंचावत अभिवादन केले. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. मागील अनेक वर्षे रजनीकांत यांच्याबाबत असलेली क्रेज अद्याप संपलेली नाही, हे याचे जीते जागते उदाहरण ठरले.

रसिक प्रेक्षकांचे लाडके आहेत रजनीकांत

रजनीकांत व टॉलीवूडचे रसिकप्रेक्षक, हे रसायनंच वेगळं आहे. दक्षिणेतील कलाकारांची क्रेज नेहमीच पाहण्यास मिळते. ही क्रेज कोणापासून सुरू झाली, तर नक्कीच ती रजनीकांत यांच्यापासून असंच म्हणावं लागेल. या कलाकारानं मागील अनेक दशक टॉलीवूडप्रमाणेच बॉलीवूडमधीलही अनेक दमदार चित्रपटांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांची एक झलक पाहण्यास मिळावी म्हणून आजही लाखो चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर घुटमळत असतात.
रविवारीही त्याचे प्रत्येय आले. रजनीकांत यांच्या घराबाहेर चाहत्यांचा उत्साह पाहण्यास मिळाला. यावेळी अनेक चाहत्यांनी आपल्या अभिनेत्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अनेक चाहत्यांनी त्यांच्यासाठी भेटवस्तूही आणल्या होत्या. रजनीकांत यांनी त्या भेटवस्तू आनंदाने स्वीकारल्या. आपल्या आवडत्या अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाल्याने चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

Katrina Kaif-Vicky Kaushal: दिवाळीच्या खास दिवशी कतरिना-विकीने दिलं चाहत्यांना सरप्राइज; लेक विहानचा फोटो केला शेअर

चाहत्यांसाठी अविस्मरणीय क्षण

तसं पाहता, रजनीकांत सार्वजनिक ठिकाणी आले की त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दी जमते. तमिळनाडूमध्ये त्यांची लोकप्रियता अनेक पिढ्यांमध्ये कायम आहे. चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी चाहत्यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे.

दिवाळीसारख्या खास सणाच्या दिवशी रजनीकांत यांनी स्वतः घराबाहेर येऊन चाहत्यांची भेट घेतल्याने हा क्षण त्यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पोएस गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर सण, वाढदिवस आणि अन्य महत्त्वाच्या प्रसंगी चाहत्यांची गर्दी होणे ही नेहमीची बाब आहे.

Shahrukh Khan King Movie: ‘भगव्याचा अपमान सहन करणार नाही’; शाहरुखच्या ‘किंग’मधील दीपिकाच्या लूकवरून वाद पेटला

देशभरात दिवाळीचा उत्साह

दरम्यान, रविवारी संपूर्ण तामिळनाडूसह देशाच्या विविध भागांत दिवाळी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. घरांना आकर्षक रोषणाई आणि पणत्यांनी सजवण्यात आले होते. नागरिकांनी नवीन कपडे परिधान करून मंदिरांमध्ये दर्शन घेतले. एकमेकांना मिठाई आणि भेटवस्तू देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

राजकीय नेते, चित्रपट कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, चेन्नईतील रजनीकांत आणि त्यांच्या चाहत्यांची भेट हा दिवाळीतील विशेष आकर्षणाचा क्षण ठरला.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रजनीकांत यांनी दिवाळी कशी साजरी केली?

    Ans: रजनीकांत यांनी चेन्नईतील आपल्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद साजरा केला.

  • Que: रजनीकांत यांचे चाहते कुठे जमले होते?

    Ans: चेन्नईतील पोएस गार्डन परिसरातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो चाहते जमले होते.

  • Que: रजनीकांत यांनी चाहत्यांना काय शुभेच्छा दिल्या?

    Ans: घराबाहेर येऊन त्यांनी हात उंचावत चाहत्यांचे अभिवादन केले आणि सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

Web Title: Rajinikanth celebrates diwali with fans chennai poes garden rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • chennai
  • Diwali 2026
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
2

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Naraka Chaturdashi:  नरक चतुर्दशीला चिराट फोडल्यानंतर त्यातील बियांच काय करतात? जाणून घ्या खास परंपरा
3

Naraka Chaturdashi: नरक चतुर्दशीला चिराट फोडल्यानंतर त्यातील बियांच काय करतात? जाणून घ्या खास परंपरा

US Diwali : अमेरिकेत हिंदूं उत्सवावर वंशद्वेषाचे सावट; ट्रम्प यांच्या समर्थकांचा सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमात गोंधळ
4

US Diwali : अमेरिकेत हिंदूं उत्सवावर वंशद्वेषाचे सावट; ट्रम्प यांच्या समर्थकांचा सिएटलमध्ये दिवाळी कार्यक्रमात गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.