Donald Trump planning to impose 200 percent tarrif on Pharama
Tarrif On Medicine : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावर जास्तच नाराज असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. ट्रम्प पुन्हा एकदा भारतावर टॅरिफ (Tarrif) लावण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेत आयात होणाऱ्या औषध उत्पादनांवर टॅरिफ लादले जाणार असून २००% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यासाठी एक प्रस्तावही मांडण्यात आला आहे.
मात्र ट्रम्प यांच्या या निर्णायामुळे अमेरिकेत औषधांच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुरवठा देखील कमी होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. शिवाय याचा सर्वाधिक परिणाम भारतीय औषध कंपन्यांवरही होण्याची शक्यता आहे. कारण भारत अमेरिकेला सर्वाधित जेनेरिक मेडिसिन्स पुरवणारा देश आहे. या निर्णयावरुन ट्रम्प यांची भारताप्रती चांगली नाराजी दिसून येत आहे.
गेल्या अनेक दशकांपासून अमेरिकेन औषध उत्पानावर कोणताही कर लादला नव्हता, परंतु ट्रम्प प्रशासन यामध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे.
इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी २००% कराचे समर्थन करत १९६२ च्या व्यापार कायादा कलम २३२ चा हवाला दिला. या कायद्यानुसार, राष्ट्रीय सुरक्षेसाठी टॅरिफ लादता येतो.
ट्रम्प यांनी म्हटले की, कोविडच्या काळात अमेरिकेत औषधांचा तुटवडा पडला होता. मात्र यामुळे देशातील औषध उत्पादनाची क्षमता वाढली होती. यामुळे देशातील औषधांचे उत्पादन वाढवणे आणि परदेशी पुरवठ्यावर अवलंबून न राहणे असा याचा उद्देश असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
दरम्यान अमेरिकेच्या व्हाइट हाऊने या संदर्भात एक सूचना जारी केली आहे. व्हाइट हाउसने म्हटले आहे की, हे धोरण लागू करण्यापूर्वी, औषध कंपन्यांना १.५ वर्षांचा कालावाधी दिला जाणार आहे. यामुळे कर भरण्यासाठी ते स्वत:ला तयार करु शकतील.
मात्र ट्रम्प इतर क्षेत्रांपेक्षा औषध उत्पादनांवर अधिक शुल्क लादला जाण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक औषध कंपन्यांनी साठा वाढवण्यास आणि आयात करण्यास सुरुवात केली आहे. परंतु औषधांचे उत्पादनांची प्रक्रिया अत्यंत कठीण असते आणि यासाठी अनेक वर्षे लागतात. यामुळे इतक्या कमी वेळात देशात औषध उत्पादने वाढवणे कठीण असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
दरम्यान ट्रम्प यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण भारत हा अमेरिकेचा जेनेरिक मेडिसिन्सचा सर्वात मोठा आणि स्वस्त दरात पुरवठा करणारा देश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारत जवळपास ४० ते ५० टक्के जेनेरिक मेडिसिन्सचा पुरवठा करतो. यामुळे अमेरिकेच्या आरोग्य सेवा प्रणालीत ९० टक्क्यापेक्षा जास्त प्रिस्क्रिप्शनसाठी केला जातो.
शिवाय भारताची औषध निर्यात ही २०२४-२५ मध्ये ३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक पुरवठा अमेरिकेला करण्यात आला आहे. अशा वेळी ट्रम्प यांनी औषध उत्पादानांवर शुल्क लादल्या हा भारतीय औषध कंपन्यांसाठी मोठा धोका ठरण्याची शक्ता आहे. यामुळे कंपन्यांचा नफा कमी होईल. यामध्ये सिप्ला सारख्या भारतीय औषध कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कुबेराचा खजिना ठरला ‘हा’ शेअर, 5 वर्षांत 1 लाखाचे 1 कोटी रुपये केले! रोज लागतोय अप्पर सर्किट