Photo Credit- X
Mid-West Gold Limited: गेल्या काही काळापासून शेअर बाजारात चढ-उतार होत असतानाही, एक असा ‘मल्टीबॅगर’ स्टॉक आहे ज्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकचे नाव आहे मिड-वेस्ट गोल्ड लिमिटेड (Mid-West Gold Limited). या शेअरने इतक्या कमी वेळात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून या शेअरला सतत ‘अप्पर सर्किट’ (Upper Circuit) लागत आहे. सोमवारीही या स्टॉकने जवळपास 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटला स्पर्श केला.
सोमवारी मिड-वेस्ट गोल्डचा शेअर 1.76% वाढीसह 2110 रुपयांवर बंद झाला. दिवसाच्या सुरुवातीला तो 2 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 2113 रुपयांवर उघडला. दिवसभर किंचित घसरण होऊन तो 2107 रुपयांवर आला, परंतु अखेर तो जवळपास 2 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
1990 मध्ये सुरू झालेली ही कंपनी मूळतः कर्नाटक राज्यात ‘नोव्हा ग्रॅनाइट्स (इंडिया) लिमिटेड’ या नावाने स्थापन झाली होती. सुरुवातीला ग्रॅनाइट दगडांवर प्रक्रिया करणे, खाणींमधून ग्रॅनाइट काढणे आणि त्यांना आकार देणे हे त्यांचे काम होते. नंतर, कंपनीने सोन्याच्या खाण व्यवसायातही प्रवेश केला. डिसेंबर 2010 मध्ये कंपनीने आपले नाव बदलून ‘मिड-वेस्ट गोल्ड लिमिटेड’ असे ठेवले. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 2,331.12 कोटी रुपये आहे.