Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 6 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 दिवसात पैसे दुप्पट; दोन दिवसात 20 टक्के परतावा; बजेटनंतर ‘या’ शेअरमध्ये जोरदार उसळी!

अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू आहे. मात्र, आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरने दोनच दिवसांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अर्थसंकल्पातील एका घोषणेमुळे या शेअरमध्ये 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. तर आजही जवळपास 10 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 24, 2024 | 07:04 PM
20 दिवसात पैसे दुप्पट; दोन दिवसात 20 टक्के परतावा; बजेटनंतर 'या' शेअरमध्ये जोरदार उसळी!

20 दिवसात पैसे दुप्पट; दोन दिवसात 20 टक्के परतावा; बजेटनंतर 'या' शेअरमध्ये जोरदार उसळी!

Follow Us
Follow Us:

मंगळवारी (ता.२४) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ज्यामुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. अर्थात बाजारात बड्या-बड्या शेअर्सची पडझड झाली. असे असतानाही एका शेअरने शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. विशेष म्हणजे बजेटमध्ये एक घोषणा होताच या शेअरने तब्बल १० टक्क्यांनी उसळी घेतली. इतकेच नाही तर आज देखील या शेअरमध्ये १० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.

दोन दिवसात 20 टक्के परतावा

उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. हीच बाब या शेअरमध्ये वाढ होण्यासाठी प्रभावी ठरली आहे. आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनी असे या कंपनीचे नाव असून, ती शिक्षण क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. कंपनीच्या शेअरमध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशी १० टक्के उसळी तर आज देखील कंपनीच्या शेअरमध्ये १० टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ज्यामुळे कंपनीने दोनच दिवसांत आपल्या गुंतवणूदारांना २० टक्के रिटर्न्स दिले आहे. विशेष म्हणजे हा पेंनी स्टॉक आहे. ज्याची किंमत ४ टक्क्यांहून कमी आहे.

हेही वाचा : अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशीही शेअर बाजाराची गटांगळी; वाचा… कोणते शेअर्स घसरले!

20 दिवसात पैसे दुप्पट

विशेष म्हणजे या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 20 दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जर आपण गेल्या 5 दिवसांबद्दल बोललो झाले तर या शेअरमधून 70 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. 4 जुलै रोजी या कंपनीचा शेअर 1.77 रुपयांवर होता. आज म्हणजेच बुधवारी तो 3.87 रुपयांवर पोहचला आहे.

अर्थात या शेअरने गुंतवणूकदारांना 20 दिवसांत सुमारे 118 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे 20 दिवसांपूर्वी एखाद्या व्यक्तीने आयईसीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्यास आता 2.18 लाख रुपये इतका परतावा मिळाला असता. अर्थात गुंतवणूकदारांना या शेअरमुळे तब्बल 1.18 लाख रुपयांचा फायदा झाला असता.

आयईसी एज्युकेशन लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप सध्या 5.91 कोटी रुपये आहे. कंपनीची स्थापना 1994 साली झाली. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे खूप धोकादायक असते. ज्यामुळे अनेक तज्ज्ञ पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाहीत आणि त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगतात. याचे कारण असे की हे शेअर्स जितक्या वेगाने वाढतात तितक्या वेगाने ते घसरतात.

Web Title: Double money in 20 days 20 percent return in two days by shares of iec education limited company

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 07:03 PM

Topics:  

  • bse
  • Nifty
  • sensex
  • share Market Live
  • Share Market Today
  • Stock market news

संबंधित बातम्या

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत
1

Share Market Today: कशी होणार शेअर बाजाराची सुरुवात? सेन्सेक्स-निफ्टीच्या ओपनिंगपूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे संकेत

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल, तज्ज्ञांनी केली शिफारस
2

Share Market Today: हिरव्या रंगात उघडणार शेअर बाजार! हे स्टॉक्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल, तज्ज्ञांनी केली शिफारस

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; ‘या’ शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा
3

Share Market Today: सेन्सेक्स-निफ्टी गॅप-अपने उघडण्याची शक्यता; ‘या’ शेअर्सवर मिळू शकतो दमदार परतावा

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?
4

Multibagger Stocks : मोठा धमाका! ₹20 पेक्षा स्वस्त शेअर्सनी दिला 6 महिन्यांत 198% पर्यंतचा रिटर्न; तुमच्याकडे आहे का यातला एखादा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.