हायस्कुलला असतानाच शिक्षण सोडले; तरुणाने 19 व्या वर्षीच उभी केली 136 कोटींची कंपनी!
तुमच्याकडे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असेल. तर तुम्ही काहीही अशक्य ते शक्य करू शकतात. हेच सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या १९ व्या वर्षीच शिक्षणापासून दुरावलेल्या त्रिशनीत अरोरा या तरुणाने. विशेष म्हणजे या तरुणाने अगदी तरुण वयातच आपले शिक्षण सोडले होते. मात्र, आयटी क्षेत्रात कोडिंग आणि हॅकिंगमध्ये माहीर असलेल्या त्रिशनीत अरोडा याने वयाच्या १९ व्या वर्षी अर्थात 2013 मध्ये ‘TAC सिक्युरिटी’ नावाने आपली स्वतःची डेटा सिक्युरिटी कंपनी सुरु केली. जिचा वार्षिक टर्नओव्हर आज १३६ कोटीपर्यंत पोहचला आहे.
४ वर्षात बनला करोडपती
त्रिशनीत अरोरा याने वयाच्या १९ व्या वर्षी अर्थात 2013 मध्ये ‘TAC सिक्युरिटी’ नावाची कंपनी सुरु केली. अवघ्या ४ वर्षानंतर म्हणजे २०१७ मध्येच तो करोडपती झाला. तर आज त्याच्या कंपनीचा टर्नओव्हर १३६ कोटीपर्यंत गेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, गुगल, बीएसई, एनएसई, एअरटेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांसह सीबीआयसारख्या संस्थांना देखील त्रिशनीतच्या कंपनीने सेवा पुरविली आहे. ज्यामुळे त्याला अल्पावधीतच भारतातील सर्वात तरुण यशस्वी उद्योजकांमध्ये स्थान मिळाले आहे.
हेही वाचा : 1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; ‘या’ कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
नेमकं काय करते ही कंपनी?
त्रिशनीत अरोरा यांची TAC सिक्युरिटी ही कंपनी रिस्क आणि वल्नरेबिलिटी मॅनेजमेंटसाठी जगभर ओळखली जाते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ही कंपनी सिस्टीममधील कमजोरी शोधून काढते. विशेष म्हणजे या कंपनीने 500 फॉर्च्यून कंपन्यांना आणि जगभरातील सरकारी संस्थांसह अनेक ग्राहकांना आपली सेवा पुरवते. या कंपनीच्या ग्राहक यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, गूगल यासह भारतीय सरकारी संस्था सीबीआयचा देखील समावेश आहे.
त्रिशनीत अरोरा यांच्या कंपनीने अल्पावधीतच भारतासह जगभरात आपली ओळख निर्माण केली आहे. त्रिशनीतच्या TAC सिक्युरिटी कंपनीने पंजाब आणि गुजरात राज्य सरकारांसाठी आयटी सल्लागार म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे त्रिशनीतने हायस्कूलमध्येच आपले शिक्षण सोडले होते. ज्यामुळे त्याच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
किती होतोय वार्षिक टर्नओव्हर?
सध्याच्या घडीला त्रिशनीत अरोरा यांच्या TAC सिक्युरिटी या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 136 कोटी रुपयांपेक्षा अधिक होत आहे. ज्यामुळे अल्प शिक्षण झाले असले तरी त्रिशनीतच्या व्यावसायिक कौशल्याचा हा पुरावा आहे. विशेष म्हणजे अल्पावधीत त्याच्या कंपनीने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे.