1 लाख रुपये गुंतवले, 33 लाख कमावले; 'या' कंपनीच्या शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल!
शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत. ज्यांनी गुंतवणूकदारांना विक्रमी परतावा दिला आहे. यातीलच एक शेअर असलेल्या ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. विशेष म्हणजे या शेअरने मागील सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट रक्कम मिळवून दिली आहे. तर या शेअरमुळे 5 वर्षांत गुंतवणूकदारांच्या रकमेत 33 पटीने वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.२) जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मात्र, असे असतानाही ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरमध्ये शुक्रवारी तब्बल 10 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
6 महिन्यांत 94 टक्के परतावा
‘कम्फर्ट इंटेक लि’च्या एका शेअरची किंमत सध्या १७.३८ रुपये आहे. या शेअर मागील 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना सुमारे 94 टक्के परतावा दिला आहे. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत 8.96 रुपये होती. अर्थात तुम्ही 6 महिन्यांपूर्वी ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज तुमच्या एका लाखाचे 1.94 लाख रुपये झाले असते. म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 94 हजार रुपये नफा झाला असता.
वर्षभरात 2.92 लाख रुपये नफा
‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ४.४४ रुपये होती. अर्थात गुंतवणूकदारांना वर्षभरात सुमारे 292 टक्के परतावा मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या एका लाखाचे 3.92 लाख रुपये झाले असते. अर्थात तुम्हाला या शेअरमधून वर्षभरात 2.92 लाख रुपये नफा मिळाला असता.
५ वर्षात ३३ लाख रुपये नफा
याशिवाय ‘कम्फर्ट इंटेक लि’च्या शेअरने पाच वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. मागील वर्षभरात या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 3308 टक्के परतावा दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 51 पैसे होती. तुम्ही या कंपनीचे 1 लाख रुपयांचे शेअर्स पाच वर्षांपूर्वी खरेदी केले असते. तर आज त्यांची किंमत तब्बल 33 लाख रुपये इतकी झाली असती. म्हणजेच 5 वर्षांत 1 लाख रुपयांचे 33 लाख रुपयांमध्ये रूपांतर झाले आहे.
काय करते ही कंपनी?
कंफर्ट इंटेक लिमिटेड ही कंपनी मद्यनिर्मितीच्या व्यवसायात कार्यरत आहे. याशिवाय ही कंपनी पंखे, कपडे, वॉटर हीटर्स आणि मोनोब्लॉक पंप, कपडे इत्यादींचा देखील व्यापार करते. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 617.84 कोटी रुपये इतके आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)